Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana Crime: चित्रपटालाही लाजवेल असा ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’! तीनदा विष देऊनही अपयश, शेवटी रचला भयानक कट

बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथे शिक्षिका वृषाली गावंडे यांच्या मृत्यूमागे अपघात नसून पतीने रचलेला कट असल्याचा उलगडा झाला. पतीने 1 लाखांची सुपारी देऊन टेम्पोने स्कुटीला धडक देत हत्या घडवून आणली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 10, 2026 | 09:38 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावातील धक्कादायक घटना
  • शिक्षिका वृषाली गावंडे यांचा सुरुवातीला अपघाती मृत्यू असल्याचा समज
  • पती प्रकाश गावंडे याने 1 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा उलगडा
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातून एक चित्रपटाला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. पतीने आपल्या शिक्षक पत्नीला मारण्याचा तीन वेळा प्रयत्न केला मात्र अपयश हाती आलं, शेवटी असा कट रचला की एखाद्या थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल. हत्या झालेल्या पत्नीचे नाव वृषाली प्रकाश गावंडे असे आहे. तर आरोपी नवऱ्याचे नाव प्रकाश गावंडे असे आहे. ही घटना संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात घडली आहे. नेमकं काय प्रकरण आहे? जाणून घ्या…

Thane Crime: उल्हासनगर हादरलं! ऑन ड्युटी सफाई कामगाराची निर्घृण हत्या; धक्का सहन न झाल्याने पत्नीची आत्महत्या

काय नेमकं प्रकरण?

मृतक वृषाली गावंडे या पिंपळगाव काळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका होत्या. 2 मार्च रोजी वृषाली गावंडे त्यांच्या स्कुटीवरुन शाळेत जात असताना त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती. यात त्यांचा मृत्यू झाला होता. याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. पोलीस घटनास्थळावर जेव्हा पोहोचेल तेव्हा आरोपी प्रकाश हा आपल्या पत्नीच्या मृतदेहाच्याशेजारी बसून रडत होते. त्यामुळे पोलिसांना सुरुवातीला हा दुर्दैवी अपघात असल्याचे वाटले आणि त्यांनी फार तपास काही केला नाही. मात्र वृषाली गावंडे यांच्या माहेरच्या मंडळींनी घातपाताचा संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि धक्कादायक माहिती समोर आली.

सुरुवातीला वाटले अपघात मात्र…

आरोपी प्रकाश गावंडे हा गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या पत्नीचा छळ करत होता. याआधीही त्याच्यावर 498 कलमाअंतर्गतचा गुन्हा दाखल झाला होता. तडजोड करून वृषाली पुन्हा नांदायला गेली होती. आरोपी प्रकाश गावडे याने पत्नी वृषालीला यापूर्वी तीनवेळा जेवणातून विष देऊन हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याबद्दल तक्रार वृशालीच्या भावाने पोलिसात दिली होती. मात्र, प्रकाश गावंडे याच्यावर ठोस कारवाई झाली नव्हती. यांनतर प्रकाश गावंडे याने थंड डोक्याने पुन्हा एक योजना आखली. त्याने आपला मित्र मंगेश चहुळकर याला पत्नीला मारण्यासाठी 1 लाखांची सुपारी दिली.

माहेरच्यांनी संशय व्यक्त केला आणि…

कटानुसार २ मार्चला वृषाली स्कुटीवरून जात असताना भरधाव वेगात पाठीमागून आलेल्या टेम्पोने धडक दिली. या अपघातात वृषाली यांचा मृत्यू झाला. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचेल तेव्हा प्रकाश हा वृशालीच्या मृतदेहाजवळ रडत बसला होता. म्हणून पोलिसांनी तपास केला नाही, मात्र माहेरच्यांनी संशय व्यक्त केल्यावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. अपघाताच्या दिवशीचे या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि काही फोन कॉलचे रेकॉर्ड तपासले. या तपासाच्या आधारे पोलिसांनी वृषाली गावंडे यांच्या स्कुटीला धडक देणारा वाहनचालक मंगेश सूर्यवंशी याला ताब्यात घेतले. मंगेश सूर्यवंशी याने पोलिसांनी केलेल्या चौकशीत वृषाली गावंडे यांचा पती प्रकाश गावंडे व मध्यस्थी मंगेश चहुळकर (रा.पातुर्डा, तालुका संग्रामपूर) या दोघांनी आपल्याला एक लाख रुपयांची सुपारी दिल्याचे कबूल केले.

कोल्ड ब्लडेड मर्डर

हि हत्या ठरवून केलेली ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ आहे. ज्याला अपघाताचा रंग देण्यात आला होता. पोलिसांनी मंगेश सूर्यवंशी, मंगेश चहुळकर आणि शिक्षिकेचा पती प्रकाश गावंडे यांना अटक केली आहे. हत्येसाठी वापरलेले वाहन आणि सुपारीचे पैसे देखील जप्त करण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहे.

Crime News: दिल्लीला नेले अन् अश्लील व्हिडिओच्या खेळात हिंदू मुलीला अडकवले; मग सुरू झाला धर्मांतराचा…

💡

Frequently Asked Questions

  • Que: वृषाली गावंडे यांचा मृत्यू कसा झाला?

    Ans: सुरुवातीला अपघात वाटणारा हा प्रकार नंतर सुपारी देऊन केलेली हत्या असल्याचे उघड झाले.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावाजवळ ही घटना घडली.

  • Que: हत्येमागे कोणाचा हात होता?

    Ans: मृत शिक्षिकेचा पती प्रकाश गावंडे याने मित्रांच्या मदतीने सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे पोलिस तपासात समोर आले.

Web Title: Buldhana crime a cold blooded murder that would put even a movie to shame failed after three attempts to administer poisonfinally a sinister plot was hatched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
3

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.