Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई-पुणे मार्गावर ‘बर्निंग बस’चा थरार; पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसला अचानक आग

बसमधील सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. ही घटना रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. चालत्या बसला अचानक एवढी भीषण आग लागण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 25, 2026 | 11:28 AM
मुंबई-पुणे मार्गावर 'बर्निंग बस'चा थरार; पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसला अचानक आग

मुंबई-पुणे मार्गावर 'बर्निंग बस'चा थरार; पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसला अचानक आग

Follow Us
Follow Us:

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर ‘बर्निंग बस’चा थरार पाहायला मिळाला. पनवेलजवळ किलोमीटर १६ च्या आसपास पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव प्रवासी बसला अचानक भीषण आग लागली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने एक्स्प्रेसवेवर काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सुदैवाने सर्व प्रवाशांना वेळेतच बसमधून सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने एक मोठा अनर्थ टळला आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर धावत्या बसमधून अचानक धूर आणि आगीचे लोळ येऊ लागल्याने गाडी थांबवण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पनवेल आणि खोपोली नगर परिषदेचे अग्निशमन दल तसेच आयआरबीची ‘देवदूत’ रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. आगीची भीषणता पाहता अतिरिक्त गाड्याही मागवण्यात आल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत काही वेळातच या भीषण आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. दरम्यान, काहीकाळ मार्गावर वाहतूक थांबवली होती. दुर्घटनेत बस जळून खाक झाली असली तरी, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही सर्वात मोठी दिलासादायक बाब आहे.

Mumbai-Pune Highway : जुना मुंबई-पुणे महामार्ग अंधारात! देहूरोड ते वडगाव फाट्यावरील बंद पथदिव्यांमुळे अपघाताचा धोका 

दरम्यान, बसमधील सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. ही घटना रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. चालत्या बसला अचानक एवढी भीषण आग लागण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या पोलिसांकडून आगीच्या खऱ्या कारणांचा सविस्तर तपास केला जात आहे.

वाहतूक होती संथगतीने

या घटनेमुळे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक काही काळासाठी संथगतीने सुरू होती. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर ती पूर्ववत करण्यात आली.

यापूर्वी पुण्यात घडली होती दुर्घटना

यापूर्वी, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात चौफुला-सुपा घाट मार्गावर बसचा अपघात झाला होता. ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस होती आणि ती शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. १६ सप्टेंबर रोजी ही बस अचानक दरीत कोसळली, ज्यामध्ये १५ हून अधिक विद्यार्थी जखमी झाले होते. याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बसचालकाविरोधात गुन्हा दाखल

आर्या इंद्रभान शितोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून, बसचालक राहुल त्र्यंबक मडावी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि ३२४ (४) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४ आणि १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title: Bus heading towards pune suddenly catches fire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • Bus Fire
  • Mumbai - Pune Expressway

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.