Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: पाच हजारांची लाच घेणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल; नेमके प्रकरण काय?

ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 30, 2025 | 10:13 PM
Crime News: पाच हजारांची लाच घेणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल; नेमके प्रकरण काय?
Follow Us
Follow Us:

दौंड: गुन्ह्यातील जप्त असलेली गाडी न्यायालयातून सोडविण्यासाठी आवश्यक असलेला तपासी अधिकाऱ्यांचा लेखी जबाब न्यायालयात देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाचेची मागणी करून पाच हजार रुपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , तक्रारदार यांचेवर दौंड पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु.र.नं. ८८२/२०२५ या. गुन्ह्यात त्यांची महिंद्रा जीप क्र. MH 42 / AS 6658 ही गाडी जप्त होती. तक्रारदार यांनी गुन्ह्यातील जप्त गाडी परत मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर तपासी अधिकारी यांचे म्हणणे दाखल करण्यासाठी गुन्ह्याचे तपास अधिकारी लोकसेवक सहायक पोलीस निरीक्षक पाटील व लेखनिक पोलिस शिपाई रमेश करचे यांनी तक्रारदाराकडे १०,००० रुपयाची मागणी करुन, तडजोडीनंतर ५,००० रुपयाची लाच मागणी केल्याची तक्रार दि. ७  एप्रिल  रोजी तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे  येथे दिली होती.
या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि. ७ एप्रिल रोजी लोकसेवक पोलीस शिपाई रमेश करचे यांचेकडे पंचासमक्ष पडताळणी केली असता, त्यांनी तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली त्यांची महिंद्रा बोलेरो जीप ही न्यायालयातून परत मिळण्यासाठी तक्रारदाराने दाखल केलेल्या अर्जावर म्हणणे सादर केल्याचा मोबदला म्हणून लोकसेवक पोलिस शिपाई रमेश करचे यांनी तक्रारदाराकडे स्वतःसाठी व तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक पाटील यांचेसाठी सुरवातीस १०,००० रुपयाची लाचेची मागणी करुन, तडजोडीअंती ५,००० रुपयाची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने, लोकसेवक रमेश शिवाजी करचे याचेविरुद्ध आज दि. २९ मे रोजी दौंड पोलीस ठाण्यात  भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७, ७ अ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. लोकसेवक शासकीय अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन ला.प्र.वि. वि. पुण्याचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.याप्रकरणी पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक  विजय पवार हे करीत आहेत.

Web Title: Case registered against policeman for taking bribe of rs 5000 daund crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 10:13 PM

Topics:  

  • Bribe Case
  • Daund
  • Daund Crime

संबंधित बातम्या

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
1

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

केडगाव स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटमध्ये ‘एसआयटी’ची मोठी कारवाई; पोलिसांनी पारगावच्या डॉक्टरसह दोघांना ठोकल्या बेड्या
2

केडगाव स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटमध्ये ‘एसआयटी’ची मोठी कारवाई; पोलिसांनी पारगावच्या डॉक्टरसह दोघांना ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.