Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhanjinagar Crime: ‘तिने मला सोडलं’ या रागातून प्रेयसीची केली हत्या, न्यायालयाने दिला कठोर निकाल

छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेयसीने नातं तोडलं या संशयातून तरुणाने तिचा गळा आवळून खून केला. पुरावे सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने आरोपी भोलाकुमार कुंजल मास्टर कुमार याला जन्मठेप व 10 हजार दंडाची शिक्षा सुनावली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 20, 2026 | 12:04 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रेयसीने सोडल्याच्या संशयातून आरोपीने ओढणीने गळा आवळून हत्या
  • मृतदेह गुंडाळून मैदानात फेकला; शोधात आरोपीही सहभागी
  • न्यायालयाकडून आरोपीला जन्मठेप व 10 हजार रुपयांचा दंड
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने प्रेयसीचा गळा आवळून हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली होती. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे. संशयातुन आणि रागाच्या भरात त्याने हा टोकाचा निर्णनय घेतला होता. आरोपीचे नाव भोलकुमार कुंजल मास्टर कुमार (वय 28, रा. उत्तर प्रदेश, ह.मु. मुकुंदवाडी) असे नाव आहे.

Beed Accident: देवदर्शनाला निघालेल्या तरुणावर काळाचा घाला; बीडमध्ये ट्रकच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

काय नेमकं प्रकरण?

राहुल बरखू राय (रा. मुकुंदवाडी) हे कुटुंबासह मुकुंदवाडी येथे राहत होता. आरोपी भोलकुमार देखील त्यांच्यासोबत राहात होता. या घटनेतील मृत तरुणीसोबत भोलाचे प्रेमसंबंद होते. मात्र तरुणीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचा भोलाला संशय होता. याच संशयावरून भोलाचे आणि त्याच्या प्रेयसीचे वारंवारं वाद होत होते. एका वादात भोलाणे तरुणीचा मोबाईल जाळून टाकला होता.

हे प्रकरण राहुलच्या मोठा भाऊ सुनीलला लक्षात येताच सुनीलने भोलाला घर सोडण्यास सांगितले होते. त्यानंतर भोळा स्वराजनगर येथे राहायला गेला. प्रेयसीने आपल्याला सोडल्याचा राग भोलाच्या मनात होता. याच रागातून त्याने प्रेयसीची हत्या करण्याचा कट रचला. त्याने ८ नोव्हेंबरला सायंकाळी प्रेयसीला मारहाण केली आणि तिचा ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. हत्या केल्यानंतर मृतदेह गुंडाळून तो जवळच्या मैदानात आणून टाकण्यात आला.

आरोपी स्वतः गेला शोधायला

एवढेच नाही तर महिला घरी परतली नाही म्हणून भोला स्वतः राहुलसोबत तिचा शोध घेत फिरत होता. मात्र ती कुठे सापडली नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे दूध घेऊन जात असलेल्या एका महिलेला मैदानात मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करत भोलाला अटक केली.

न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा

पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. खटल्याच्या सुनावणी दरम्यान सहायक सरकारी लोकअभियोक्ता अरविंद बागूल यांनी एकूण 11 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यापैकी 3 साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. सर्व पुरावे व साक्षी तपासल्यानंतर न्यायाधीश आर. डी. खेडेकर यांनी सोमवारी भादंवि कलम 302 अन्वये आरोपी भोलाकुमार याला जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला अतिरिक्त तीन महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा भोगावी लागेल, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मालेगाव-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; पिकअप-ट्रॅव्हल्सच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी परिसरात.

  • Que: हत्येचं कारण काय होतं?

    Ans: प्रेयसीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय आणि नातं तुटल्याचा राग.

  • Que: न्यायालयाने काय शिक्षा सुनावली?

    Ans: आरोपीला जन्मठेप आणि 10 हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षा.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime enraged that she left me he murdered his girlfriend the court delivered a harsh verdict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर आरोपींचा होता आणखी मोठा कट? पुढचं टार्गेट कोण होतं? राजस्थान पोलिसांचा खळबळजनक खुलासा!
1

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर आरोपींचा होता आणखी मोठा कट? पुढचं टार्गेट कोण होतं? राजस्थान पोलिसांचा खळबळजनक खुलासा!

Tiger Shroff: आधी घराची रेकी, मग कारवर गोळ्यांचा वर्षाव? टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील 2 संशयित मुंबई पोलिसांच्या ताब्यात
2

Tiger Shroff: आधी घराची रेकी, मग कारवर गोळ्यांचा वर्षाव? टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील 2 संशयित मुंबई पोलिसांच्या ताब्यात

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
3

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.