
crime (फोटो सौजन्य: social media)
अफगाण आणि पाकमधील संबंध
एक महिला पंचतारांकित हॉटेलमध्ये तब्बल सहा महिने बनावट कागदपत्रांच्या आधारे मुक्काम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेचे नाव कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय 45) असे आहे. ती जालना रोडवरील अॅम्बेसेडर या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत होती. सिडको पोलिसांनी संशयाच्या आधारे कारवाई करत खोलीची झडती घेतली. महिलेच्या बॅगेत २०१७ च्या यूपीएससी निवड यादीची प्रत आढळली, ज्यात तिचे नाव ३३३ व्या क्रमांकावर होते. मात्र छाननीत ही यादीही बनावट असल्याचं निष्पन्न झालं आहे. आधार कार्डवरही खाडाखोड केल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत तिच्या खात्यात अफगाणिस्तानातील बॉयफ्रेंड अशरफ खलील व पाकिस्तानातील त्याचा भाऊ आवेद यांच्या खात्यांतून मोठ्या रकमा आल्याचे समोर आले. दोघांचे पासपोर्ट, व्हिसा आणि भारतात येण्याच्या अर्जाचे फोटोही तिच्या मोबाइलमध्ये आढळून आले आहेत. संपूर्ण प्रकरण अत्यंत संशयास्पद ठरल्याने एटीएस व आयबीकडून महिलेची कसून चौकशी सुरू आहे. बनावट ओळखपत्र देऊन हॉटेलमध्ये राहिल्याप्रकरणी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिला अटक केली आहे.
पोलीस तपासात काय काय समोर आलं
विजय कुंभार यांची सोशल मीडिया पोस्ट
विजय कुंभार यांनी या प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. याबाबतचे त्यांनी कागदपत्र शेअर केले आहेत. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, महाराष्ट्रात संशयास्पद परदेशी संबंध असलेल्या बनावट आयएएस अधिकाऱ्याला अटक केली आहे, कल्पना त्र्यंबकराव भागवत (४५) ही सहा महिने बनावट आधार वापरून एका आलिशान हॉटेलमध्ये राहिली. तिने विद्यापीठाची नोकरी सोडल्यानंतर तिने “यूपीएससी उत्तीर्ण” असल्याचा दावा करून आयएएस असल्याचे भासवले. पोलिसांनी बनावट आयएएस नियुक्ती पत्र आणि फोन जप्त केला. ती एका अफगाण नागरिकाच्या जवळच्या संपर्कात होती आणि कथितपणे #पाकिस्तान आणि #अफगाणिस्तानमध्ये त्याच्या कुटुंबासाठी व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न करत होती. केंद्रीय संस्था आता गंभीर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तपास करत आहेत. हे बनावटीकरणाच्या पलीकडे आहे – संभाव्य हेरगिरीचा रेड अलर्ट आहे, असंही विजय कुंभार यांनी म्हटलं आहे.
Fake IAS officer with suspicious foreign links arrested in Maharashtra! Kalpana Trimbakrao Bhagwat (45) stayed in a luxury hotel for 6 months using forged Aadhaar, posed as IAS after quitting her university job claiming she “cleared UPSC”. Police recover fake IAS appointment… pic.twitter.com/VOKrkDO0pD — Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) November 25, 2025
Ans: तिच्या खात्यात अफगाणिस्तानातील बॉयफ्रेंड आणि पाकिस्तानातील त्याच्या भावाकडून मोठ्या रकमेचे व्यवहार आढळले.
Ans: ती तब्बल सहा महिने पंचतारांकित हॉटेलमध्ये बनावट आधार कार्ड वापरून आणि चुकीची माहिती देऊन राहिली
Ans: अफगाण–पाकिस्तानातील व्यक्तींचे पासपोर्ट, व्हिसा दस्तऐवज, तसेच भारतात येण्यासाठी केलेल्या अर्जांचे फोटो मोबाइलमध्ये आढळले.