Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur Crime: पोटच्या मुलानेच केली वडिलांची हत्या; 19 वर्षीय मुलगा अटकेत

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात दारूच्या वादातून 19 वर्षीय मुलाने नायलॉन दोरीने वडिलांचा गळा आवळून खून केला. भिसी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 24, 2026 | 03:35 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वडिलांना दारूचे व्यसन; घरगुती वाद
  • नायलॉन दोरीने गळा आवळून हत्या
  • आरोपीने सुरुवातीला आत्महत्येचा बनाव सांगितला
चंद्रपूर: वडिलांना दारूचे व्यसन, दारू पिल्यावर कुटुंबाला शिवीगाळ व मारहाणीच्या त्रासाला कंटाळून लहान मुलाने नायलॉन दोरीने वडिलांचा गळा आवळत खून केला. ही घटना चिमूर तालुक्यातील भिसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मच्छिंद्र आनंदराव मेश्राम (५१) असे मृत वडिलांचे नाव आहे. तर संदेश मच्छिंद्र मेश्राम (१९) असे आरोपी मुलाचे नाव आहे.

भिसी येथील जुनी वस्तीमध्ये राहणाऱ्या मच्छिन्द्र यांना दारूचे व्यसन होते. त्यांना दोन मुले आहेत. ते नेहमी दारू पिऊन पत्नी व मुलाला शिवीगाळ व मारहाण करीत होते. रविवारी गावात साक्षगंधाचा कार्यक्रम होता. संदेश मेश्राम हा जेवण वाढण्यासाठी गेला होता. जेवण आटपल्यावर संदेश घरी परतला. त्यावेळी वडील घरी आले नव्हते. रात्री ११ वाजता वडील दारूच्या नशेत घरी आले. त्यावेळी संदेशने जेवण आणले आहे करून घ्या, असे म्हटले. मात्र मला अजून दारू प्यायची आहे, मी पुन्हा घेऊन येतो असे म्हटल्यावर मुलाने आता जाऊन नका, असा आग्रह केला. मात्र वडील ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यामुळे वडिलांनी मुलाला शिवीगाळी करणे सुरू केले, त्यावेळी संदेशचा राग अनावर झाल्याने घरातील नायलॉन दोरीने वडिलांचा गळा आवळत त्यांना ठार केले.

Crime News: कायद्याला खुलं आव्हान! एका दिवसात दोन ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ले; धक्कादायक घटनेने संभाजीनगर हादरले

घटनेची माहिती मिळताच भिसी ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मंगेश भोंगाडे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले, संदेशला ताब्यात घेत विचारपूस केली. मात्र त्याने असे काही केले नाही, वडिलाने गळफास घेत आत्महत्या केली असल्याचे सांगितले. सपोनि भोंगाडे यांनी आरोपीला पोलिस खाक्या दाखविताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. आरोपी संदेशवर पोलिसांनी कलम १०३ (१) अनव्ये गुन्हा दाखल करीत अटक केली.

४ दिवसातील तिसरी घटना: शुक्रवारी

मूल तालुक्यातील डोंगरगावात कारल्याची भाजी का केली म्हणून दारूड्‌या मुलाने आईला बेदम मारहाण करीत तिचा खून केल्याची घटना उघडीस आली. त्याच दिवशी वरोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत जेवणाला उशीर का झाला म्हणून दारूड्या मुलाने आई, वडिलांना बेदम मारहाण केली. या घटना ताज्या असताना भिसी येथे मुलाने वडिलांचा गळा आवळून खून केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनांमुळे जिल्ह्यात दारूमुळे गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येते. गाव तिथे अवैद्य दारूचे प्रमाण वाढलेले असतांना पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरीकांतून संताप व्यक्त केल्या जात आहे.

भावाला फोन करून दिली खुनाची माहिती

घटनेच्या दिवशी संदेश व वडील हे दोघेच घरी होते. वडिलांना ठार मारल्याची बाब स्वतः आरोपीने सिंदेवाही तालुक्यात राहणाऱ्या मोठ्या भावाला फोन करून सांगितली. वडिलांचा खून झाला अशी माहिती मिळाल्यावर पंचशील मेश्राम भिसीमध्ये दाखल झाला, तर त्याने वडील नेहमी दारू पिऊन मला व आईला शिवीगाळ करीत होते म्हणून मी रागाच्या भरात वडिलांचा गळा आवळला, असे संदेशने भावाला सांगितले. पंचशीलने तत्काळ भिसी पोलिसांना घडलेल्या प्रकारची माहिती दिली.

Pune Crime: धक्कादायक! बिल्डरच्या फसवणुकीच्या नैराश्यातून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची आत्महत्या; सातव्या मजल्यावरून मारली उडी

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्येचे कारण काय?

    Ans: दारूच्या नशेतून होणाऱ्या शिवीगाळ व मारहाणीच्या वादातून.

  • Que: हत्या कशी करण्यात आली?

    Ans: हत्या कशी करण्यात आली?

  • Que: आरोपीने काय सांगितले?

    Ans: सुरुवातीला आत्महत्येचा दावा; नंतर गुन्ह्याची कबुली.

Web Title: Chandrapur crime son kills father 19 year old arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Chandrapur Crime
  • crime

संबंधित बातम्या

Chandrapur News: चंद्रपूरच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर? दरवर्षी 99 कोटींचा खर्च, तरी विद्यार्थ्यांना पलंग
1

Chandrapur News: चंद्रपूरच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर? दरवर्षी 99 कोटींचा खर्च, तरी विद्यार्थ्यांना पलंग

बिल्डर असल्याचे सांगून 14.78 लाखांना गंडा; आरोपीला चंद्रपूरमधून केली अटक
2

बिल्डर असल्याचे सांगून 14.78 लाखांना गंडा; आरोपीला चंद्रपूरमधून केली अटक

Chandrapur News: अडीच महिने उलटले, तरी करार रखडला; चंद्रपुरातील शाळांमध्ये पोषण आहारासाठी शिक्षकांची उधारी
3

Chandrapur News: अडीच महिने उलटले, तरी करार रखडला; चंद्रपुरातील शाळांमध्ये पोषण आहारासाठी शिक्षकांची उधारी

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
4

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.