Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुरक्षारक्षकाची दगडाने ठेचून हत्या, छत्रपती संभाजीनगर येथील धक्कादायक घटना, नेमकं प्रकरण काय?

सुरक्षारक्षक जेवणाचा डबा घेऊन गॅरेजवर कामाला हजर झाले. तर दुसऱ्यादिवशी सकाळी गॅरेजचे मालक अशोक दाभाडे हे गॅरेज उघडण्यासाठी आले असता त्यांना शेडच्या समोरील जागेत पडुळकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर दाभाडे यांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 09, 2024 | 12:24 PM
सुरक्षारक्षकाची दगडाने ठेचून हत्या, छत्रपती संभाजीनगर येथील धक्कादायक घटना, नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य-ट्विटर)

सुरक्षारक्षकाची दगडाने ठेचून हत्या, छत्रपती संभाजीनगर येथील धक्कादायक घटना, नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य-ट्विटर)

Follow Us
Follow Us:

ट्रक बॉडी रिपेअरिंग वर्क्स गॅरेजच्या सुरक्षेसाठी नियुक्त असलेल्या सुरक्षारक्षकाच्या तोंडावर दगड टाकून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना सोमवारी (8 जुलै) सकाळी 9 वाजता उघडकीस आली. मृत सुरक्षारक्षकाचे नाव भाऊसाहेब नामदेव पडुळकर (वय 52, रा. श्रद्धा कॉलनी, वाळूज) असे आहे. सुरक्षा रक्षकाच्या हत्येनंतर मारेकारांनी पळ काढला असून घटनास्थळावर जाळपोळीच्या खुणाही आढळल्या आहे. या हत्येचा तपास करण्यासाठी सातारा पोलीस आणि गुन्हे शाखा कसोशीने प्रयत्न करत आहेत.

पोलिस निरीक्षक ब्रह्म गिरी यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, भाऊसाहेब नामदेव पडुळकर हे जालना जिल्ह्यातील काजळा येथील रहिवासी आहेत. गेली अनेक वर्षे ते व त्यांचे कुटुंब वाळूज येथील रहिवासी आहे. गेल्या आठ महिन्यांपासून भाऊसाहेब पडुळकर हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अशोक मुकुंदा दाभाडे (रा. उस्मानपूर) यांच्या ट्रक बॉडी रिपेअर वर्क्स या गॅरेजवर यांच्या बजाज कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते.

नेहमीप्रमाणे रविवारी (7 जुलै) सायंकाळी सहाच्या सुमारास भाऊसाहेब जेवणाचा डबा घेऊन गॅरेजवर कामाला हजर झाले. तर दुसऱ्यादिवशी सकाळी गॅरेजचे मालक अशोक दाभाडे हे गॅरेज उघडण्यासाठी आले असता त्यांना शेडच्या समोरील जागेत पडुळकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर दाभाडे यांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचताच सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्यासह एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे गुन्हे शाखेत पोहोचले. पोलीस घटनास्थळीची पाहणी केली असता पडुळकर यांचा चेहरा दगडाने ठेचून चेहऱ्याचे तुकडे केलेले दिसले. त्यानंतर पोलिसांनी भाऊसाहेब यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवला. घटनास्थळी मृतांच्या काही वस्तू सापडल्या आहेत. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सातारा पोलीस गुन्हे शाखेसह तपास करत आहेत.

पडुळकर यांच्या पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी जनाबाई हिच्याशी दुसरे लग्न केले. जनाबाई हिच्यापासून मुलगा आकाश, सोनूबाई, मोनूबाई या दोन विवाहित मुली आहे. अशी माहिती समोर आली.

वादानंतर हत्या

घटनास्थळी पडुळकर यांचा जेवणाचा डबा आणि त्यांच्या मोपेडचे स्पेअरपार्टस जळालेले आहेत. त्यांचा मोबाईल घटनास्थळापासून दूर सापडला. पडुळकर यांना आणि मरेकऱ्यांमध्ये वाद झाल्यानंतर त्यांचा खून करण्यात आला असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली.

Web Title: Chhatrapati sambhajinagar garage security guard was killed by throwing a stone on his face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2024 | 12:24 PM

Topics:  

  • sambhajinagar police

संबंधित बातम्या

Sambhajinagar Crime News : दारू प्यायला पैसे न दिल्याने मेडिकल दुकानदाराच्या पोटात चाकू खुपसला; काही तासांत तिघांना अटक
1

Sambhajinagar Crime News : दारू प्यायला पैसे न दिल्याने मेडिकल दुकानदाराच्या पोटात चाकू खुपसला; काही तासांत तिघांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.