Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: नर्सची गळफास घेऊन आत्महत्या, जातीवाचक शिवीगाळ अन्….; सिडको ठाण्यात गुन्हा नोंद

छत्रपती संभाजीनगरमधील एमजीएम रुग्णालयात नर्स असलेल्या सारिका कदम यांनी हुंडाबळी आणि जातीवाचक छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. सिडको पोलिसांनी पतीसह ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 17, 2026 | 04:44 PM
नर्सची गळफास घेऊन आत्महत्या, जातीवाचक शिवीगाळ अन् (Photo Credit- X)

नर्सची गळफास घेऊन आत्महत्या, जातीवाचक शिवीगाळ अन् (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • संभाजीनगरमध्ये नर्सची गळफास घेऊन आत्महत्या
  • जातीवाचक शिवीगाळ अन्….;
  • सिडको ठाण्यात गुन्हा नोंद
छत्रपती संभाजीनगर एमजीएम रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असलेल्या 27 वर्षीय विवाहितेने पती व सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या पैशांच्या मागणी, मारहाण व जातिवाचक छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना 14 मार्च रोजी पहाटे 1 वाजताच्या सुमारास एन-5 सिडको येथील अरुणोदय कॉलनीत घडली. या प्रकरणी पती अशोक अंकुश कदम (रा. अरुणोदय कॉलनी, एन-5 सिडको), सासरे अंकुश सर्जेराव कदम, सासू रुख्मिणीबाई अंकुश कदम आणि चुलत दीर संतोष सहादेव कदम (सर्व रा. सौदाना, ता. पाटोदा, जि. बीड) यांच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तसेच अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सारिका या एमजीएम रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत

मृत सारिका अशोक कदम (27) यांच्या आई बारकुबाई सोपान पवार (52, रा. दासखेडा, ता. पाटोदा, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रारीनुसार, सारिका या एमजीएम रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत होत्या. त्या पती अशोक कदम याच्यासोबत अरुणोदय कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होत्या. 1 सप्टेंबर 2025 रोजी पुणे येथील आळंदी येथे त्यांचा विवाह झाला होता. त्यानंतर 7 डिसेंबर 2025 रोजी दोघांनी कोर्ट मॅरेजची नोंदणी केली होती. सुरुवातीचे काही महिने संसार सुरळीत सुरू होता.

पैशासाठी करत होते छळ

लग्नानंतर काही महिन्यांतच पती अशोक कदम, सासरे अंकुश कदम व सासू रुख्मिणीबाई कदम यांनी कारचे कर्ज फेडण्यासाठी तसेच नवी टुरिस्ट गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावल्याचे तक्रारीत नमूद आहे. मुलीचा संसार टिकावा म्हणून तिच्या वडिलांनी प्रथम 50 हजार रुपये व नंतर 25 हजार रुपये दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

Chhatrapati Sambhajinagar: हॉटेलवर धाडी टाकत ३८ घरगुती गॅस सिलेंडर जप्त; जिल्ह्यात पुरवठा विभागाची मोठी कारवाई

दागिने ठेवलेत गहाण, जातीवाचक अपमान

काही दिवसांनी पतीने सारिकाचे एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवून तिच्या पगारातील पैसे काढून आई-वडिलांना दिले, याबाबत जाब विचारल्यावर तिला मारहाण करण्यात आली. ‘तू खालच्या जातीची आहेस, तुला आमच्या घरी राहायची लायकी नाही’ अशा शब्दांत वारंवार शिवीगाळ करण्यात येत होती.

छळामुळे टोकाचे पाऊल

सततचा मानसिक छळ, पैशांची मागणी व अपमान यामुळे सारिका तणावाखाली होत्या. अखेर 14 मार्च रोजी पहाटे त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी शहरात येत एमजीएम रुग्णालयात मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर घाटीत शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला, याप्रकरणी सिडको पोलिस पुढील तपास करत आहे.

आईची तक्रार, गुन्हा नोंद

या प्रकरणी मृताच्या आईच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त मनोज पगारे करीत आहेत.

Bhivandi Crime: धक्कादायक! 15 वर्षीय मुलीचे अपहरण; लग्नाच्या नावाखाली वृद्धाला विक्री, नंतर शेतात अत्याचार

Web Title: Chhatrapati sambhajinagar mgm hospital staff nurse suicide case cidco

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

‘माझं लेकरू परत आलं हो…’, छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या एका मोहिमेने १७ विखुरलेली कुटुंबे पुन्हा जोडली!
1

‘माझं लेकरू परत आलं हो…’, छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या एका मोहिमेने १७ विखुरलेली कुटुंबे पुन्हा जोडली!

संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर
2

संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर

दौंड नगरपरिषदेत खळबळ! महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; नेमकं काय घडलं?
3

दौंड नगरपरिषदेत खळबळ! महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७०% धान्य वितरण रखडले! ‘ई-पॉस’ प्रणालीची मुदत संपल्याने २४ लाख लाभार्थी संकटात
4

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७०% धान्य वितरण रखडले! ‘ई-पॉस’ प्रणालीची मुदत संपल्याने २४ लाख लाभार्थी संकटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.