हॉटेलवर धाडी टाकत ३८ घरगुती गॅस सिलेंडर जप्त (Photo Credit - X)
रविवारी (१५) शहरातील ६२ हॉटेल्सची तपासणी झाली. यात बुडीलाईन येथील आदिल टी हाऊस येथे तीन घरगुती गॅस सिलिंडर आढळले. सिलिंडर जप्त करण्यात आले. हाॅटेल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर सोमवारी (१६) ११ पथकांकडून जिल्हाभरात १६७हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. कन्नड, गंगापूर व सिल्लोड तालुक्यात जवळपास २३ ठिकाणी ३८ सिलेंडर जप्त करण्यात आले असून कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु असून त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची रीतसर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली. जप्त केलेले सिलिंडर हे घरगुती असून त्याचा व्यावसायिक कारणांसाठी वापर म्हणून जप्त करण्यात आले आहेत.
शहरात तपासणी करत असताना व्यवसायिक सिलिंडर मिळून येत आहे. सिलिंडर बंद असताना व्यावसायिकांना कुठून मिळतेय याचा तपास अद्याप शहर पुरवठा विभागाला लागलेला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्ह्यामध्ये गॅस तुटवड्यामुळे नागरिक त्रस्त आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा बंद असतानाही हॉटेल, टपरी, मेस आणि केटरिंगवर घरगुती गॅस सिलिंडर सुरु असल्याने पुरवठा विभागाकडून कारवाई सुरु आहे. गॅसची टंचाई मिटवण्यासाठी नागरिकांना आता रेशनकार्डवर बंद केलेले रॉकल पुन्हा सुरु करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.






