
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकी घटना?
ही घटना जांजगीर-चांपा जिल्ह्यातील धार्डेई गावात घडली. आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव कृष्ण पटेल आणि पत्नी रमाबाई असे आहे. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की कृष्ण पटेल गवंडी काम करत होते, तर रमाबाई घराची काळजी घेत होत्या. रविवारी रात्री उशिरा दोघांनीही त्यांच्या अंगणातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. सोमवारी सकाळी त्यांचे मृतदेह लटकलेले आढळले. शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुढील कारवाई करत आहे.
सुसाईड नोट आणि व्हिडिओत काय?
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती, तसेच व्हिडीओ देखील बनवले होते. पोलिसांनी चार पानांची सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. दाम्पत्याने सुसाईड नोटमध्ये लिहिले की, ‘आम्ही दोघेही पूर्ण जाणीवेने आणि आमच्या स्वेच्छेने भगवान शिवाला स्वतःला अर्पण करत आहोत.यासाठी कोणीही जबाबदार नाही. कृपया आनंदी मनाने निरोप द्या”. तर व्हिडिओत त्यांनी म्हंटले आहे की “जर आम्ही आता जिवंत नसलो तर आमच्या मुला आदित्यच्या क्लेमचे पैसे आमचे मोठे भाऊ कुलभरा पटेल आणि जलभरा पटेल यांना वाटून द्या”.
एकुलत्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला
आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याला एकुलता एक मुलगा होता. त्याचे नाव आदित्य होते. त्याचा २०२४ साली रस्ते अपघातात मृत्यू झाला. या घटनेने दाम्पत्याला मोठा धक्का बसला. मुलाच्या मृत्यूनंतर ते नैराश्यात गेले आणि समाजापासून पूर्णपणे दुरावून गेले होते.
Beed Crime: बीडमध्ये 30 जणांचा कुटुंबावर हल्ला; लाठ्याकाठ्यांनी मारहाण, तीन महिला जखमी
Ans: छत्तीसगडमधील जांजगीर परिसरात ही घटना घडली.
Ans: इकलौत्या मुलाच्या मृत्यूचा तीव्र मानसिक धक्का हे प्रमुख कारण मानले जात आहे.
Ans: शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.