नेमकं काय घडलं?
आरोपीचे नाव पियुष धामनोतिया असे आहे. तर मृतक ही एमबीए ची विद्यार्थिनी होती. १० फेब्रुवारी रोजी पियुष त्याच्या प्रेयसी सोबत तिच्या घरी गेला होता. त्याने तिच्याकडे शारीरिक मागणी केली. मात्र तिने याला नकार दिला. त्याने तिला दोरीने बांधले आणि तिचे डोळे झाकून तिला ‘गिफ्ट’ देण्याचे नाटक केले. तिने विरोध करताच त्याने तिच्या छातीवर बसून तिचा गळा दाबला. ती बेशुद्ध झाल्यावर त्याने तिच्या छातीवर चाकूने वार केला. या वार इतका जोरदार होता की चाकूचे थेट दोन तुकडे झाले. त्याच्या प्रेयसीचा यात मृत्यू झाला. या नंतर जे काही घडलं ते भयंकर घडलं.
दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 200 लिटर लिक्विडमधून तब्बल 2500 लिटर भेसळयुक्त दूध
बिअर प्यायली आणि…
हत्येनंतर तो बाहेर गेला, त्याने बिअर विकत आणली. त्याने मृतदेहाशेजारी बसून ती बिअर प्यायली. त्यांनतर त्याने मृदेहावर लैंगिक अत्याचार केले. त्यांनतर तरुणीला नग्न अवस्थेत सोडून तिथून पळून गेला.
अघोरी कृत्य
हत्येनंतर पियुष पनवेलमार्गे मुंबईला पळून गेला. तिथे तो हॉटेलमध्ये राहिला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने तिचा फोन तोडून टाकला. पनवेलमधील एका निर्जन कोपऱ्यात त्याने अगरबत्ती लावली, त्याने यूट्यूबवर ‘आत्मा कशी बोलावयाची’ याचे व्हिडिओ पाहून अघोरी कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्याला मृत मुलीच्या आत्म्याशी बोलायचे होते आणि तिची माफी मागायची होती, असा दावा त्याने केला आहे.
खाजगी फोटो केले व्हायरल
पियुषने मृत मुलीची बदनामी करण्यासाठी त्यांचे काही खाजगी व्हिडिओ कॉलेजच्या ग्रुपवर शेअर केले आणि तिच्या व्हॉट्सॲप स्टेटसवरही अपलोड केले.
दोघांमध्ये सुरु होते वाद
मृतक दुसऱ्या एका मुलाशी डेटिंग ॲपवरून बोलत होती, ज्यामुळे तो असुरक्षित झाला होता. तसेच लग्नासाठी तिच्या घरच्यांचा नकार असल्याने त्यांच्यात वाद सुरू होते. असे त्याने कारण सांगितले आहे.
पोलीस तपास सुरु
10 फेब्रुवारी हत्येच्या दिवशी पियुष त्या विद्यार्थिनीसोबत तिच्या घरी गेला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघे एकत्र घरात जाताना दिसले, मात्र अडीच तासांनंतर पियुष एकटाच बॅग घेऊन बाहेर पडताना दिसला. पोलिसांनी सांगितले की आरोपी मानसिकदृष्ट्या विचलित झाला असल्याचे भासवत आहे. मात्र, घटनेच्या वेळी त्याने केलेले नियोजन हे अतिशय थंड डोक्याने केलेला गुन्हा असल्याचे दर्शवते. पोलीस या हत्येचा सखोल तपास करत आहेत. आता या प्रकरणात आणखी काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Beed Crime: बीडमध्ये 30 जणांचा कुटुंबावर हल्ला; लाठ्याकाठ्यांनी मारहाण, तीन महिला जखमी
Ans: हत्या, मृतदेहाचा अवमान, पुरावे नष्ट करणे आणि सायबरद्वारे बदनामी.
Ans: पोलिसांनी मुंबईतून अटक करून कोठडीत घेतले.
Ans: हत्येनंतर मृतदेहाशेजारी बसून मद्यपान आणि अघोरी कृत्याचा प्रयत्न.






