CM Yogi Death Threat: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात एका रॅलीदरम्यान योगी आदित्यनाथ यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका रॅलीतील मंचावर लोकांनी “आय लव्ह मोहम्मद” असे लिहिलेले पोस्टर हातात धरले होते आणि मुख्यमंत्री योगींना शिवीगाळही केली.
इतकेच नव्हे तर “जर तुमच्यात हिंमत असेल तर इथे महाराष्ट्रात या; आम्ही तुम्हाला गाडून टाकू.” असा इशाराही दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून बीड पोलिसांनी या व्हिडीओ प्रकऱणाची चौकशी सुरू केली आहे. तसेच या प्रकरणात लवकरच एफआयआर दाखल केला जाणार असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
MIG 21 Retirement: भारताचा ‘बादशाह’ निवृत्त! मिग-21 ने अनेकदा पाकड्यांना चारली धूळ; पहा Video
मिळालेल्या महितीनुसार, ही घटना बीडमधील एका धार्मिक कार्यक्रमात हा प्रकार घडला. मंचावरील एका वक्त्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना “टक्कल पडलेले” अशी उपहासात्मक टीक करत त्यांच्या धोरणांवर हल्ला केला. तर मायक्रोफोनवरील एका व्यक्तीने, “जर योगींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात यावे; आम्ही त्यांना येथेच गाडून टाकू.” अशी खुली धमकी दिली. या कार्यक्रमाच्या ठिकाणी “आय लव्ह मोहम्मद” चे मोठे पोस्टरही लावण्यात आले होते. या कार्यक्रमावा शेकडो लोक उपस्थित होते. धमकीवजा विधाने झाल्यानंतर लोकांनी टाळ्यांचा कडकडाटही केला.
दरम्यान, बीडमधून झालेल्या या विधानामागे योगी आदित्यनाथांचीअलीकडची भाषणे असल्याचे मानले जात आहे. योगी आदित्यनाथ यांच्या कट्टर धार्मिक भूमिकांमुळे ही संतप्त प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, बीडच्या पोलिस अधीक्षकांनी एक निवेदन जारी करून व्हिडिओची चौकशी सुरू असल्याचे म्हटले आहे. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. धमक्या देणाऱ्यांची ओळख पटवली जात आहे आणि लवकरच एफआयआर दाखल केला जाईल. हे कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन आहे.” असं पोलिसांनी म्हटलं आहे.
पोलिस सूत्रांनुसार, मेळाव्याच्या आयोजकांची चौकशी केली जात आहे आणि ज्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे त्यांचा तपास सुरू केला आहे. योगींना धमक्या मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलिकडेच मुंबईत बाबा सिद्दीकीसारख्या योगींना जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल एका महिलेला अटक करण्यात आली होती.
याबाबत भाजप नेते संजय पांडे म्हणाले की, जर आपल्या देशात पाकिस्तानी भाषा वापरली गेली तर आपला कायदा त्याला उत्तर देईल. योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध वापरलेली भाषा चुकीची आहे. जे म्हणतात की ते त्यांना दफन करतील त्यांनी प्रथम महाराष्ट्रातील लोकांना भेटावे. आम्हाला भेटा. आम्ही त्यांना सांगू की कोण कोणाला दफन करू शकते. अशा शब्दांत संजय पांडेंनी पलटवार केला आहे.