मिग-21 लढाऊ विमान निवृत्त (फोटो -ट्विटर)
भारतीय हवाई दलाची ताकद होते मिग – 21
मिग -21 ची जागा तेजस लढाऊ विमान घेणार
स्क्वाड्रन लीडर प्रिया यांनी केले मिग-21 च्या अखेरच्या उड्डाणाचे नेतृत्व
Indian Air Force: आज भारतीय वायू सेनेसाठी अत्यंत खास असा क्षण आहे. भारतीय वायुसेनेतील अत्यंत महत्वाचे असलेले मिग-21 हे लढाऊ विमान आज निवृत्त झाले आहे. भारतीय वायुसेनेत मिग – 21 या लढाऊ विमानाचे अत्यंत महत्वाचे योगदान आहे. अनेक महत्वाच्या कारवायांमध्ये मिग 21 ने महत्वपूर्ण योगदान दिले आहे. भारतीय संरक्षणदलाची ताकद असणारे मिग-21 आज निवृत्त झाले आहे.
तब्बल 60 वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर मिग – 21 आज निवृत्त झाले आहे. आज चंदीगड एअरबेसवर मिग 21 ने अखेरचे उड्डाण घेतले. मिग 21 च्या अखेरच्या उड्डाणाचे नेतृत्व स्क्वाड्रन लीडर प्रिया शर्मा यांनी केले. मिग-21 चे उड्डाण करणाऱ्या त्या शेवटच्या पायलट ठरल्या आहेत. 1960 च्या दशकापासून मिग 21 भारताची सेवा करत आले आहे.
CULMINATION OF MIG-21 OPERATION IN IAF https://t.co/jqqywWowrY — Indian Air Force (@IAF_MCC) September 26, 2025
इंडियन एअर फोर्सच्या मिग 21 लढाऊ विमानाने अनेक महत्वाच्या कारवायांमध्ये भाग घेतला आहे. तब्बल 60 वर्षांच्या सेवेनंतर हे लढाऊ विमान निवृत्त झाले आहे. या लढाऊ विमानाचा निवृत्ती सोहळा चंदीगड एअरबेसवर पार पडला. या कार्यक्रमाला सरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.
मिग 21 लढाऊ विमानाने अनेक महत्वाच्या युद्धांमध्ये योगदान दिले आहे. 1965 च्या युद्धात भारताच्या मिग 21 या लढाऊ विमानाने महत्वाची भूमिका बजावली होती. 1971 च्या युद्धात हे लढाऊ विमान पाकिस्तानसाठी अत्यंत घातक ठरले. कारगिल युद्धात देखील मिग 21 ने पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केले होते.
2019 मध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पुलवामा हल्ला घडवून आणला. यामध्ये भारतीय लष्कराचे अनेक जवान शहीद झाले होते. या भ्याड हल्ल्याचा बदला भारताने घेतला होता. भारताने पाकिस्तानवर हवाईहल्ला केला. बालाकोटमध्ये घुसून मिग 21 ने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते.
Tejas Mk-1A Jets: भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार; एचएएलसोबत ९७ ‘तेजस’ फायटर जेटसाठी मेगा डील
मिग 21 ची जागा कोण घेणार?
भारताचे मिग 21 लढाऊ विमान आज निवृत झाले आहे. दरम्यान आता या लढाऊ विमानाची जागा कोण घेणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर तेजस हे भारताचे अत्याधुनिक लढाऊ विमान आता मिग 21 ची जागा घेणार आहे. तेजस हे भारताच्या अत्यंत घातक आणि अत्याधुनिक असे फायटर जेट आहे.
भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने (MoD) गुरुवारी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सोबत एक ऐतिहासिक करार केला आहे. या करारानुसार, भारतीय वायुसेनेसाठी ९७ स्वदेशी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजस एमके१ए (Mk1A) विमानांची खरेदी केली जाणार आहे. या कराराची एकूण किंमत ६२,३७० कोटी रुपये (कर वगळून) आहे. यात ६८ सिंगल-सीटर लढाऊ विमाने आणि २९ ट्विन-सीटर ट्रेनर विमानांचा, तसेच संबंधित उपकरणे आणि सपोर्ट सिस्टीमचा समावेश आहे.