Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Police News: अंबड पोलिस ठाण्यावरील ताण होणार कमी; नव्या ‘एमआयडीसी’ ठाण्याच्या हद्दीची प्रतीक्षा संपणार

जुलै २०१५ मध्ये गृह मंत्रालयाने पोलिस ठाणे मंजूर करुनही महासंचालक कार्यालयाची मंजूरी व  हद्दनिश्वितीअभावी अद्यापही 'बुंचाळे चौकी मध्ये 'मिनी पोलिस ठाणे' अंतर्गत कामकाज सुरू आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 09, 2026 | 04:59 PM
Kopargaon Police Station,

Kopargaon Police Station,

Follow Us
Follow Us:
  • नाशिककरांच्या ‘एमआयडीसी’ पोलिस ठाण्याच्या हद्दीचा पेच लवकरच सुटणार
  • १५ व्या ‘एमआयडीसी’ पोलिस ठाण्याच्या कामकाजाला वेग
  • एमआयडीसी पोलिसांच्या हद्दनिश्चितीचा प्रश्न ऐरणीवर
Nashik Police News:  अंबड पोलिस ठाण्यावरील ताण कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद निश्चितीची अधिसूचना अद्याप प्रसिद्धच झालेली नाही. त्यामुळे सध्या तक्रारदाराला गुन्हा दाखल करण्यासाठी अंबड पोलिस ठाण्यात तर तपासाकामी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जावे लागते. ‘एमआयडीसी’ पोलिसांच्या हद्दीत अंबड एमआयडीसी, घरकूल योजना, दत्तनगर, वरचे चुंचाळे, खालचे चुंचाळे, रामकृष्णनगर, आझादनगर, संजीवनगर, नवनाथनगर, म्हाडा कॉलनी, जाधव संकुल, मेदगेनगर, तिराडशेत, बेळगाव ढगा हा परिसर समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे.
हिंगोली शहर वाहतूक कोंडीत गुदमरतेय; प्रशासनाला नेमकी कधी जाग येणार ? नियोजनशून्य कारभार

हद्दनिश्चितीनुसार कार्यवाही

जुलै २०१५ मध्ये गृह मंत्रालयाने पोलिस ठाणे मंजूर करुनही महासंचालक कार्यालयाची मंजूरी व  हद्दनिश्वितीअभावी अद्यापही ‘बुंचाळे चौकी मध्ये ‘मिनी पोलिस ठाणे’ अंतर्गत कामकाज सुरू आहे. सिंहस्थापूर्वी ठाणे मंजुरीला मान्यता मिळाल्याने आता हद्दनिश्चितीनुसार पुढील कामकाजाला वेग येणार आहे. त्यानुसार शहरात सध्या तेरा पोलिस ठाणे व एक सायबर पोलिस ठाणे कार्यरत असून, नव्याने पंधराव्या ‘एमआयडीसी’ ठाण्याची हद निश्चित होत आहे.

शासनाकडे मंजुरीच्या प्रतिक्षेत प्रस्ताव

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये, परिमंडळ दोनचे उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन बारी, संबंधित पोलिस ठाण्यांचे सध्याचे व तत्कालीन निरीक्षकांच्या मदतीने हदनिश्चितीचा प्रस्ताव आयुक्तालयाने सादर केला होता. हा प्रस्ताव आता शासनाकडील अंतिम मंजुरीच्या प्रतिक्षेत असून, महासंवालक कार्यालयाच्या सूचनेनुसार आयुक्तालयाने ‘एमआयडीसी’ पोलिस ठाणे निर्मिती व पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.
Bangladesh Election 2026 : बांगलादेशमध्ये रंगला संसदीय निवडणुकीचा रणसंग्राम; ‘या’ नेत्याची प्रतिष्ठा लागली

एमआयडीसी पोलिस ठाण्याचा प्रवास

२८ मार्च २०२३ रोजी चुंचाळे चौकी स्वतंत्र, १० एप्रिल रोजी चौकीचे उद्घाटन.
१० ऑक्टोबर २०२२ रोजी तत्कालीन पालकमंत्री भुसे यांनी पोलिस ठाणे मंजुरीची ग्वाही दिली.
१३ मे २०२५ रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरीबाबत चर्चा.
८ जुलै २०२५ रोजी गृह विभागाच्या आदेशान्वये पोलिस ठाण्याला मंजुरी.
२७ नोव्हेंबर २०२५ रोजी महासंचालक कार्यालयातून पदनिर्मितीसह खर्चाला मंजुरी.

Web Title: Nashik police news the burden on ambad police station will be reduced the wait for the new midc police stations jurisdiction is about to end

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • Maharashtra Police
  • Nashik News
  • Nashik Police

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.