State Women's Commission Chairperson Rupali Chakankar has a clear opinion on resignation.
पुणे : अभिनेता एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ या रिअॅलिटी शोमध्ये लैंगिक कृतींशी संबंधित दृश्यांमुळे वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावर आता कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने (MSWC) राष्ट्रीय महिला आयोगाला एक पत्र पाठवून, अश्लील कंटेंट प्रसारित करणारे वेब शो आणि ऑनलाइन अॅप्स, विशेषतः ‘उल्लू’ अॅपवरून अशी सामग्री हटवण्याची मागणी केली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले की, अनेक वेब सिरीज अधिक प्रेक्षक मिळवण्यासाठी अश्लील व्हिडिओ वापरतात. “आम्ही यासंदर्भात राष्ट्रीय महिला आयोग तसेच पोलिस महासंचालक (DGP) कार्यालयाला पत्र लिहून अशा प्रकारच्या व्हिडिओंवर त्वरित कारवाई करण्याची विनंती केली आहे,” असे त्यांनी पीटीआयला सांगितले.
Manoj Jarange Patil: “हे तर नुसती विमाने पळवत…”; मनोज जरांगे पाटलांची मोदी सरकारवर टीका
राज्य सरकारनेदेखील डीजीपी कार्यालयाला पत्र पाठवून, ‘हाऊस अरेस्ट’ या वेब शोमधील व्हिडिओ, ऑडिओ आणि एकूणच मजकुराची चौकशी करावी, तसेच संबंधित अॅपविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी सूचना केली आहे. या शोमध्ये अश्लीलता दाखवल्याच्या आरोपावरून अभिनेता एजाज खान, निर्माता राजकुमार पांडे आणि अन्य व्यक्तींवर अंबोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकणकर यांनी नमूद केले की अशा व्हिडिओंचा तरुणांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम होतो.
‘हाऊस अरेस्ट’वर बंदीची मागणी
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या सदस्य चित्रा वाघ यांनी देखील ‘हाऊस अरेस्ट’वर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, शोमधील अश्लील मजकूर समाजासाठी, विशेषतः लहान मुलांसाठी अत्यंत हानिकारक आहे. त्यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून, अशा प्रकारचा कंटेंट दाखवणाऱ्या अॅप्सवर कडक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
Maharashtra HSC 12th Result: बारावीच्या परीक्षेत राज्यात ४५ टक्के विद्यार्थी ६० टक्क्यांच्या आत
वाद वाढल्यानंतर ‘उल्लू’ अॅपवरून ‘हाऊस अरेस्ट’ हा शो हटवण्यात आला आहे. शुक्रवारी या शोसाठी शोध घेतला असता, अॅपवर तो उपलब्ध नव्हता. प्रौढांसाठी कंटेंट देणाऱ्या उल्लू अॅपने शो हटवल्याचे हे संकेत मानले जात आहेत, विशेषतः सोशल मीडियावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आणि राजकीय दबाव लक्षात घेता. राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली असून, उल्लू अॅपचे सीईओ विभू अग्रवाल आणि शोचे मुख्य पात्र असलेल्या एजाज खान यांना समन्स बजावले आहेत. आयोगाने शोतील असभ्य आशयाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.