अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ ठप्प (Photo Credit- Social Media)
पुणे, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४४.५१ टक्के विद्यार्थ्यांना ४५ ते ६० टक्क्यांच्या आतच गुण मिळाले आहेत. तर केवळ ०.६ टक्के विद्यार्थी ९० टक्क्यांच्या पुढे असून, ४५ टक्क्यांच्या आत म्हणजे काठावर पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी १३.३९ इतकी आहे.
शिक्षण मंडळाकडील आकडेवारीनुसार, ६ लाख २ हजार २२७ विद्यार्थ्यांनी ४५ ते ६० टक्क्यांच्या आत गुण मिळविले आहेत. ९० टक्क्यांच्या पुढे गुण मिळविणारे ८ हजार ३५२, ८५ ते ९० टक्के गुण मिळविणारे २२ हजार ३१७, ८० ते ८५ टक्के गुण मिळविणारे ४६ हजार ३३६, ७५ ते ८० टक्के गुण मिळविणारे ७४ हजार १७२, ७० ते ७५ टक्के गुण मिळविणारे १ लाख ३ हजार ७०, ६५ ते ७० टक्के गुण मिळविणारे १ लाख ३१ हजार ८१२, ६० ते ६५ टक्के गुण मिळविणारे १ लाख ८१ हजार ७५५ विद्यार्थी आहेत. बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या १३ लाख ४८ हजार ५८८ इतकी आहे.
खेळाडू, एन.सी.सी. व स्काऊट गाईड असलेल्या राज्यातील २० हजार ९४३ खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळाले आहेत. राज्यात अशा प्रकारे गुण मिळविणारे सर्वाधिक विद्यार्थी हे मुंबई विभागात असून ही संख्या ४ हजार ७७१ इतकी आहे. तर सर्वात कमी सवलतीचे गुण प्राप्त करणारे विद्यार्थी हे कोकण विभागात असून, ही संख्या १ हजार १९१ इतकी आहे.
राज्यातील ९ विभागातील परीक्षा केंद्रांवर १८ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा दिली असून, हे सर्व विद्यार्थ्री उत्तीर्ण झाले आहेत.
Bandra मध्ये आता घेऊ शकता घर, कितीची SIP देईल तुम्हाला नफा; किती वेळ लागेल जाणून घ्या एका क्लिकवर
परीक्षा देताना काही हरकती घेतलेल्या, काही समस्या असलेल्या अथवा अन्य कारणास्तव आक्षेप घेणा-या १४७ विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक राखून ठेवलेला निकाल हा नागपूर विभागातील असून, आक्षेप घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या ही १३७ इतकी आहे. या सर्व विद्यार्थ्यांना मंडळाकडून सुनावणीसाठी बोलवून घेण्यात येणार असून, त्यावेळी त्यांची बाजू समजून घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. दरम्यान राज्यात परीक्षा काळात एकूण् १३० विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास बंदी घालण्यात आली.