crime news by up stf killed gangster anil dujana in encounter in meerut nrvb
कुख्यात गुंड अनिल दुजाना उर्फ अनिल नागर (Notorious gangster Anil Dujana alias Anil Nagar) याला एसटीएफने (STF) चकमकीत ठार केले आहे. युपी एसटीएफने मेरठमध्ये (Meerut) ही कारवाई केली आहे. अनिल हा मोठा गुन्हा करण्याचा कट आखत असल्याची माहिती एसटीएफला मिळाली होती. त्यामुळे त्याचा शोध सुरू झाला. याच कामानिमित्त तो मेरठमध्ये लपल्याची माहिती मिळाली.
[read_also content=”शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद, दोन मिनिटांच्या संवादात समजावत दिले ‘हे’ संकेत https://www.navarashtra.com/maharashtra/sharad-pawar-address-ncp-youth-workers-in-y-b-chavan-centre-mumbai-hint-for-his-future-ncp-president-post-nrvb-394919.html”]
दुजानावर राष्ट्रीय राजधानी दिल्ली (Delhi) आणि उत्तर प्रदेशमध्ये 60 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. यामध्ये दुजानाविरुद्ध नोएडा, गाझियाबाद, मुझफ्फरनगरसह उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये खून, दरोडा, लुटमार आणि खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 4 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-4-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
दिल्ली आणि युपीचे पोलीस त्याचा शोध घेत होते. गेल्या वर्षी दिल्ली पोलिसांनी दुजाना आणि त्याच्या दोन साथीदारांनाही अटक केली होती. दुजाना हा गौतम बुद्ध नगर येथील रहिवासी आहे. 2011 मध्ये साहिबााबादमध्ये एका लग्न समारंभात त्याच्या टोळीने गोळीबार केला, ज्यामध्ये तीन जण ठार झाले होते.