Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Crime: नवीन क्रेडीट कार्डचा बहाणा अन्…; तरूणासोबत घडले तरी काय?

तक्रारदार हे कोथरूडमध्ये राहायला आहेत. दरम्यान १८ जुलै २०२५ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क केला. नवीन क्रेडीट कार्ड देण्याची बतावणी करीत एपीके फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 27, 2026 | 02:35 AM
Cyber Crime: नवीन क्रेडीट कार्डचा बहाणा अन्...; तरूणासोबत घडले तरी काय?

Cyber Crime: नवीन क्रेडीट कार्डचा बहाणा अन्...; तरूणासोबत घडले तरी काय?

Follow Us
Close
Follow Us:

५० वर्षीय नागरिकाला एपीके फाईल लुटले
नवीन क्रेडिट कार्ड देण्याचा केला बहाणा
अज्ञात मोबाईल वापरकर्त्यावर गुन्हा दाखल

पुणे: नवीन क्रेडीट कार्ड देण्याच्या बहाणा करीत सायबर चोरट्यांनी ५० वर्षीय नागरिकाला एपीके फाईल पाठवून त्यांच्याकडून पावणे पाच लाख रुपये उकळले.  ही घटना १८ जुलै २०२५ मध्ये कोथरूडध्ये घडली आहे. याप्रकरणी तक्रारदाराने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानुसार अज्ञात मोबाईल वापर कर्ता तसेच बँक खातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोथरूडमध्ये राहायला आहेत. दरम्यान १८ जुलै २०२५ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क केला. नवीन क्रेडीट कार्ड देण्याची बतावणी करीत एपीके फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्यानुसार तक्रारदाराने फाईल डाउनलोड केल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून रक्कम वर्ग करून घेतली. जवळपास पावणेपाच लाख रूपये खात्यातून कमी झाल्यानंतर संबंधिताने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी तपास करीत आहेत.

Cyber Crime: व्यावसायिकाला ३६ लाखांचा गंडा; एका लिंकवर क्लिक करणे पडले महागात

तरुणाला नोकरीचे आमिष

वैभववाडी तालुक्यातील एका उच्चशिक्षित तरुणाला वर्क फ्रॉम होम नोकरीचे आमिष दाखवून १५ हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी संबंधित तरुणाने राष्ट्रीय सायबर विभागाकडे तक्रार नोंदवली आहे. पीडित तरुणाच्या व्हॉट्स अॅपवर एका अनोळखी क्रमांकावरून मेसेज आला होता. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी कंपनीने त्याला केवळ २०० रुपये जमा करण्यास सांगितले.

तरुणाने २०० रुपये भरल्यानंतर त्याला परतावा म्हणून ३०० रुपये मिळाले कंपनीवर विश्वास बसारेत्या तरुणाला त्यानंतर ५ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले, तरुणाने यूपीआयद्वारे ५ हजार रुपये भरले, मात्र त्याचा मोबदला मागितला असता कंपनीने पुन्हा १० हजार रुपये भरण्याची अट घातानी, अशा प्रकारे तरुणाने एकूण १५ हजार रुपये कंपनीकडे जमा केले. या बदल्यात त्याला २१ हजार ६९९ रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, जेव्हा त्याने या रक्कमेची मागणी केली, तेव्हा कंपनीने त्याला पुन्हा ३० हजार रुपये भरण्यास सांगितले. यावेळी आपली फसवणूक होत असल्याचे तरुणाच्या लक्षात आले.

ई-चलनाची ‘ती’ फाईल डाऊनलोड केली अन् क्षणांत 18 लाख गेले; सायबर चोरट्यांचे कारस्थान

पुण्यातील धक्कादायक प्रकार

आयटी क्षेत्रातील नोकरी म्हणजे मोठा पगार आणि स्थिर करिअर, अशी (Pune Crime) सर्वसाधारण धारणा असताना पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नोकरी देण्याच्या आमिषाने उमेदवारांकडून १ ते ३ लाख रुपये उकळून प्रत्यक्षात पगार व प्रकल्प न देण्याचा प्रकार उघडकीस आला असून अनेक तरुणांची फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

Web Title: Fraud of rs 50 lakhs on the pretext of a new credit card pune cyber crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case
  • pune news

संबंधित बातम्या

गुंतवणूकीच्या आमिषाने पुण्यातील ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल दीड कोटींना घातला गंडा
1

गुंतवणूकीच्या आमिषाने पुण्यातील ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल दीड कोटींना घातला गंडा

पहिल्या पत्नीला भेटतो म्हणून वाद; दुसऱ्या पत्नीचा नाक अन् तोंड दाबून खून
2

पहिल्या पत्नीला भेटतो म्हणून वाद; दुसऱ्या पत्नीचा नाक अन् तोंड दाबून खून

पैशासाठी पोलिसांचा बनाव करून तरुणाचे अपहरण; बळजबरीने कारमध्ये नेले अन्…
3

पैशासाठी पोलिसांचा बनाव करून तरुणाचे अपहरण; बळजबरीने कारमध्ये नेले अन्…

पुणे जिल्हा परिषद काँग्रेसमुक्त; पराभवानंतर संघटना बांधणीसाठी तालुकास्तरीय दौरे सुरू
4

पुणे जिल्हा परिषद काँग्रेसमुक्त; पराभवानंतर संघटना बांधणीसाठी तालुकास्तरीय दौरे सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.