Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिल्या पत्नीला भेटतो म्हणून वाद; दुसऱ्या पत्नीचा नाक अन् तोंड दाबून खून

घटस्फोटीत पत्नीला पती सातत्याने भेटत असल्याचा संशय घेऊन त्याच्याशी वाद घालणाऱ्या पत्नीचा पतीने खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ब्लँकेटने नाक तसेच तोंड दाबून हा खून करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 26, 2026 | 08:00 PM
तडीपार गुंडाचा पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न; हातात चाकू घेतला अन्...

तडीपार गुंडाचा पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न; हातात चाकू घेतला अन्...

Follow Us
Follow Us:
  • पहिल्या पत्नीला भेटतो म्हणून वाद
  • दुसऱ्या पत्नीचा नाक अन् तोंड दाबून खून
  • खडकीतील चिखलवाडी भागातील प्रकार
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घटस्फोटीत पत्नीला पती सातत्याने भेटत असल्याचा संशय घेऊन त्याच्याशी वाद घालणाऱ्या पत्नीचा पतीने खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ब्लँकेटने नाक तसेच तोंड दाबून हा खून करण्यात आला आहे. खडकी भागातील चिखलवाडी भागात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

 

बिंदु दिलीप कंडाथील (वय ५३) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी दिलीप नंबुरी कंडाथील (वय ५६, रा. चिखलवाडी, खडकी) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दिलीप याची बिंदु ही दुसरी पत्नी आहे. पहिल्या पत्नीपासून त्याने घटस्फोट घेतलेला आहे. दरम्यान घटस्फोटानंतर दिलीपने बिंदु हिच्याशी विवाह केला. दोघेही चिखलवाडीत राहत होते. दरम्यान, बिंदु पती दिलीप पहिल्या पत्नीला भेटत असल्याचा संशय होता. त्यावरून ती सातत्याने दिलीप याच्याशी वाद घालत. त्यावरून सातत्याने त्यांच्यात वादविवाद होत होते. या रागातून दिलीप याने झोपेत असलेल्या पत्नीचा ब्लँकेटने नाक तसेच तोंड दाबून खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी पती दिलीप याला अटक केली आहे. अधिक तपास खडकी पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण; इमारतीच्या तळमजल्यावर नेले अन्…

तिघांनी केला तरुणाचा खून

बिबवेवाडी परिसरात कटींग दुकानात काम केल्‍यानंतर गावाला जातो अस म्हणून स्वतःचे सलूनचे दुकान सुरू करणाऱ्या तरूणाचा तिघांनी मिळून खून केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खून करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या आहेत. मोहमद्द शमी (वय २५, अप्पर जुना बसस्‍टॉप, बिबवेवाडी मुळ रा. प्रयागराज, उत्‍तरप्रदेश) असे खून झालेल्‍या तरूणाचे नाव आहे. याबाबत मोहम्‍मद सलमान फिरोज कुरेशी (वय १८, रा. साई स्मार्ट, तिरूपती भेळ शेजारी, जुना बसस्‍टॉप, बिबवेवाडी) याने बिबवेववाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी खुन करणारे आरोपी सौरभ चोरगे, अनिकेत सराटे, रोहित बालशंकर या तिघांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार गुरूवारी सायंकाळी घडला आहे.

Web Title: A shocking incident has taken place in pune where a husband murdered his wife 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

मोखाड्यात मध्यरात्री घरात घुसून दरोडा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास; दाम्पत्याला धाक दाखवून लूटले
1

मोखाड्यात मध्यरात्री घरात घुसून दरोडा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास; दाम्पत्याला धाक दाखवून लूटले

बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा आढळला मृतदेह
2

बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा आढळला मृतदेह

शिरूर हादरलं! नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; हॉटेलमध्ये नेले अन्…
3

शिरूर हादरलं! नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; हॉटेलमध्ये नेले अन्…

१२ हजाराची लाच मागणं भोवलं! तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
4

१२ हजाराची लाच मागणं भोवलं! तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.