गुन्हेगार बँका, डिलिव्हरी सर्व्हिसेस, सरकारी एजन्सीची हुबेहूब नक्कल करून करतात फसवणूक
मुंबई : भारतातील सायबरक्राइमच्या चित्राचा चेहरामोहराच बदलून टाकत असलेल्या एआय-संचलित चॅटबॉट घोटाळ्यांच्या वेगाने पसरण्याविषयी काही अस्वस्थ करणारी माहिती समोर आली आहे. जागतिक स्तरावर सायबरसिक्युरिटी उपाययोजना पुरविणारी कंपनी क्विक हील टेक्नोलॉजीज लिमिटेडने उघडकीस आणली असून चॅटबॉट स्कॅम्स हा २०२५ चा सर्वात लक्षणीय डिजिटल धोका ठरल्याचे निदर्शनास आले आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अधिकाधिक सफाईदार होत असताना गुन्हेगार बँका, डिलिव्हरी सर्व्हिसेस आणि सरकारी एजन्सीससारख्या विश्वासार्ह ब्रॅण्ड्सची अभूतपूर्व अशा अचूकतेने नक्कल करत एकाचवेळी हजारो लोकांना फशी पाडू शकतील अशा स्वयंचलित घोटाळ्यांचे कारखाने चालविण्यासाठी पूर्व-प्रशिक्षित लॅग्वेज मॉडेल्सचा गैरवापर करत आहेत.
सिक्युरिटी लॅब्जना आताच दर महिन्याला एआय-फ्रॉडची हजारो नवीन साधने सापडत असल्याचे भारताचे सर्वात मोठे मालवेअर विश्लेषण केंद्र, सेकराइट लॅब्जमधील रिसर्चर्सनी हाती घेतलेल्या एका सर्वसमावेशक तपासणीमधून उघड झाले आहे व चॅटबॉट स्कॅम्स हा २०२५ चा सर्वात लक्षणीय डिजिटल धोका ठरला आहे. पारंपरिक फिशिंग घोटाळ्यांच्या तुलनेत या स्वयंचलित यंत्रणांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या रिअल-टाइममध्ये चाललेल्या संवादाशी जुळवून घेऊ शकतात, आणि फसविल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या प्रतिसादांच्या आधारे खोट्या डिलिव्हरी फीपासून ते ग्राहकांना खोटा दंड लागू करण्यापासून किंवा फसवी तांत्रिक मदत पुरविण्यापर्यंत कोणतेही विषयांतर करू शकतात. ही औद्योगिक स्तरावरची स्वयंचलित यंत्रणा एकाच सर्व्हरवरून एकावेळी हजारो फसवे संवाद घडवून आणू शकते.
संवादात्मक इंटरफेसवर लोकांनी स्वाभाविकपणे टाकलेल्या विश्वासाचा पिळवणूकीसाठी वापर करणाऱ्या घोटाळ्यांचे अनेक प्रभावशाली प्रकार क्विक हील टेक्नोलॉजीज लिमिटेडच्या विश्लेषणातून ओळखले गेले आहेत. खात्यामध्ये कुणीतरी अवैधरित्या शिरकाव केल्याच्या संशयासारख्या मुद्दामहून घडवून आणलेल्या समस्येदरम्यान नकली कस्टमर सपोर्ट चॅटबॉट्स प्रकट होतात आणि आपण वैध बँकिंग वेबसाइटवर नसल्याचे फसविल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या लक्षात येण्याच्या आधी त्यांच्या माहितीचे तपशील काढून घेतात. रोमान्स स्कॅम्सने नवे रूप धारण केले आहे व त्यात “लोन्स”ची मागणी करण्याआधी किंवा फसविल्या जाणाऱ्या व्यक्तीला फसव्या क्रिप्टो एक्स्चेंजेसकडे वळविण्याआधीचे अनेक आठवडे एआय-निर्मित फोटोंचा साग्रसंगीत वापर असलेला भावनिक संवाद सुरू ठेवला जातो. व्हॉइस असिस्टंट घोटाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत सापडललेल्या कुटुंबातील सदस्यांच्या आवाजाची नक्कल करण्यासाठी व्हॉइस क्लीनिंग तंत्रज्ञानाचा वापर करत निरुपद्रही अॅप्सच्या मुखवट्यामागे लपून बदनामीकारक स्किल्स प्रसारित करतात.
गुन्हेगार एकसारख्या दिसणाऱ्या जसे की डीएचएल डॉटकॉम ऐवजी डीएचएआय डिलिव्हरीडॉटकॉम अशी नावे असलेल्या डोमेन्सची नोंदणी करतात आणि काही मिनिटांतच अधिकृत ब्रॅण्डच्या मालमत्ता काढून नेतात आणि आधीच्या घुसखोरीच्या वेळी मिळविलेला डेटा वापरून फसविल्या जाणाऱ्या व्यक्तीला त्याच्या/तिच्या नावाने अभिवादन करणारी आधीपासून तयार हॅण्डऑफ्स तयार करतात. फ्रॉडजीपीटीसारखी अंडरग्राऊंड एआय साधने सफाईदार फिशिंग किट्स निर्माण करतात आणि बँकिंगमध्ये लक्ष्य करायच्या व्यक्तींसाठी औपचारिक, गेमिंगच्या चाहत्यांसाठी अनौपचारिक असा आवाजाचा लेहजा स्वीकारत स्पॅम फिल्टर्सच्या ओलांडून जाणाऱ्या पर्सनलाइझ्ड हल्ल्यांची रचना करतात. याची अलीकडेच आढळून आलेली उदाहरणे म्हणजे शंकाही येऊ नये अशा ट्रॅकिंग इंटरफेसच्या माध्यमातून कस्टम फीजची मागणी करणारे डीएचएल-ब्रॅण्डेड तपशीलवार तयार केलेले चॅटबॉट्स, ‘मेटा सिक्युरिटी’ची छबी तंतोतंत वठवित पेजवरील वैयक्तिक माहिती आणि पेमेंट पद्धतींची माहिती चोरणारे व्हाट्सअॅप बॉट्स आणि सवलती आदींची फसवी माहिती देणारे कॉल्स करताना खोटी विश्वासार्हता तयार करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या खात्यामध्ये पूर्वी कधीतरी केलेल्या घुसखोरीतून मिळालेले अचूक वैयक्तिक तपशील वापरणारे व्हॉइस क्लोनिंग स्कॅम्स.
यूजर्सनी ओळखायला हव्यात अशा धोक्याच्या चिन्हांमध्ये ओटीपी, बँकिंग माहिती किंवा पासवर्ड मागणाऱ्या कोणत्याही चॅटबॉटचा समावेश होतो. वैध फर्म्स असा संवेदनशील डेटा चॅट इंटरफेसच्या माध्यमातून गोळा करणे टाळतात. विचित्र व्याकरण वापरण्याची पद्धत, विचारपूर्वक चर्चा होणे टाळण्याच्या दृष्टीने तयार केलेली तातडीची भाषा वापरणे आणि चुकीची स्पेलिंग्ज असलेल्या संशयास्पद यूआरएलकडे वळविणे या सर्व संभाव्य फसवणुकीची सूचना देणाऱ्या खुणा आहेत. यूजर्सना अशाप्रकारचा एक जरी रेड फ्लॅग दिसला तरीही त्यांनी तत्काळ संवाद थांबवावा असा सल्ला क्विक हील टेक्नोलॉजीज लिमिटेड देते.
भोळेपणाने विश्वास ठेवणाऱ्या यूजर्सना अशाप्रकार धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी भारताची पहिली एआय-संचलित फसवणूक प्रतिबंधक उपाययोजना – क्विक हील अँटिफ्रॉडडॉटएआय आपले सतत बदलत राहणाऱ्या या धोक्यांच्या विरोधात बहु-स्तरीय संरक्षण पुरविते. ही क्लाउड-आधारित यंत्रणा प्रत्येक चॅट यूआरएलची धोक्याविषयी प्रत्यक्ष त्या वेळी मिळत असलेल्या गुप्त माहितीशी फेर-पडताळणी करते, फसवी डोमेन्स रिअल-टाइममध्ये ब्लॉक करते आणि यूजरच्या छेडछाड करण्यात आलेल्या वैयक्तिक माहितीसाठी डार्क वेब बाजारपेठांवर देखरेख ठेवते. प्रगत वैशिष्ट्यांमध्ये ताबडतोब अलर्ट पोहोचवण्याची सोय असलेले फिशिंग डिटेक्शन, संशयास्पदरित्या मायक्रोफोन किंवा कॅमेरा सक्रिय झाल्याची धोक्याची सूचना देण्यासाठी अनधिकृत अॅक्सेसवर देखरेख ठेवण्याची सोय आणि ज्ञात डिजिटल फसवणूक पद्धतींच्या विरोधात अँड्रॉइड सिग्नेचर्सचे विश्लेषण करणारे फ्रॉड अॅप डिटेक्शन यांचा समावेश आहे.