Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Crime: पुण्यात नेमकं चाललंय काय? गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल…

गुंतवणूकीबाबत चांगली माहिती देऊ असे सांगत खासगी क्लास चालकाने जादा परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेची तब्बल ५ कोटी ९६ लाख २१ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 13, 2024 | 07:05 PM
Cyber Crime: पुण्यात नेमकं चाललंय काय? गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरुणाला तब्बल...

Cyber Crime: पुण्यात नेमकं चाललंय काय? गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरुणाला तब्बल...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: शेअर बाजारातील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरुणाची २६ लाख रुपयांना फसवणूक केली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला. याबाबत ३१ वर्षीय तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कोंढव्यातील भाग्योदयनगर परिसरात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाशी मोबाइलवर सप्टेंबर महिन्यात संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी दाखविले. त्याचा विश्वास संपादन केला. नंतर तरुणाने गुंतवणूकस्वरूपात चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले.

सुरुवातीला चोरट्यांनी तरुणाला जाळ्यात ओढण्यासाठी परतावा देखील दिला. त्यामुळे तरुण आपसूकच सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकला. परतावा मिळत असल्याने त्याचाही यावर विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी त्याला आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. चार महिन्यात वेळोवेळी २५ लाख ९९ हजार रुपये खात्यात जमा केले. पैसे जमा झाल्यानंतर चोरट्यांनी मोबाइल बंद केले. त्यावेळी तरुणाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने महिलेची ६ कोटींची फसवणूक

हडपसर भागात शेअर मार्केटमधील गुंतवणूकीबाबत चांगली माहिती देऊ असे सांगत खासगी क्लास चालकाने जादा परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेची तब्बल ५ कोटी ९६ लाख २१ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून, क्लासचालक क्लासला कुलूप लावून फरार झाला आहे.  याप्रकरणी हडपसर पोलिसांनी महाराष्ट्रातील ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये प्रतिक कुमार चौखंडे (रा. स्वप्नलोक सोसायटी, पापडेवस्ती, फुरसुंगी, सासवड रोड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: Cyber Crime: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने तरूणाला लुटले; तब्बल २१ लाखांना घातला गंडा

शेअर बाजारातील कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्याने जेष्ठ नागरिकाला साडेआठ लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी मुंढवा पोलिसांत ६७ वर्षीय नागरिकाने तक्रार दिली आहे. पैसे गुंतवणूक केल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्याच्याशी संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानूसार, सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार कुटुंबिय मुंढव्यातील केशवनगर येथे राहण्यास आहेत. दरम्यान, तक्रारदारांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्याने शेअर बाजाराबाबत माहिती दिली. तसेच, आमच्या कंपनीच्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, असे सांगितले. आमच्या कंपनीकडून चांगला परतावा मिळेल, असे आमीष दाखवले. त्यानुसार तक्रारदार यांनी ८ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, पैसे गुंतवणूक केल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्याच्याशी संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

Web Title: Cyber crime with pune kondhva youth for 26 lakhs invest in share market crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2024 | 07:03 PM

Topics:  

  • cyber crime

संबंधित बातम्या

नाशिकचा दुसरा खरात! कार्यलयात सापडले 120 अश्लील व्हिडीओ अन् प्राण्यांचे अवयवही…; Ravindra Erande विरोधात धक्कादायक माहिती समोर
1

नाशिकचा दुसरा खरात! कार्यलयात सापडले 120 अश्लील व्हिडीओ अन् प्राण्यांचे अवयवही…; Ravindra Erande विरोधात धक्कादायक माहिती समोर

‘खुन्यालाही सुधारता येते, पण सायबर गुन्हेगारांना नाही’; सर्वोच्च न्यायालयाची कठोर टिप्पणी
2

‘खुन्यालाही सुधारता येते, पण सायबर गुन्हेगारांना नाही’; सर्वोच्च न्यायालयाची कठोर टिप्पणी

Ashok Kharat Part 2! नाशिकच्या व्यावसायिकाच्या टॅबलेटमधून २०० अश्लील व्हिडिओ जप्त
3

Ashok Kharat Part 2! नाशिकच्या व्यावसायिकाच्या टॅबलेटमधून २०० अश्लील व्हिडिओ जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.