उत्तर प्रदेशातील रायबरेलीत एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. रायबरेलीतील एका दलित तरुणाला जमावाने बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. मृत्यू झालेल्या दलित तरुणाचे नाव हरिओम असे आहे. धक्कादायक म्हणजे, हरिओमला मारहाण करतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल घेत रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांनी मृत तरुणाचे वडील आणि त्याच्या भावाशी मोबाईलवरून संवाद साधला आणि त्यांचे सांत्वनही केले. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी छापेमारी सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
Gautami Patil Pune: पुण्यातील ‘त्या’ अपघातावेळी गौतमी पाटील कारमध्ये होती? समोर आली धक्कादायक माहिती
या अन्यायाविरुद्धच्या लढाईत काँग्रेस त्यांच्यासोबत उभी राहील. दलित समुदायावरील अशा क्रूरता आणि अत्याचार कोणत्याही किंमतीत सहन केले जाणार नाहीत, असे सांगत राहुल गांधी यांनी यावेळी काँग्रेस या लढाईत त्यांच्यासोबत असल्याचे आश्वासनही दिले. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मृताच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी फतेहपूर येथील मृताच्या घरी भेट दिली आणि तेथे माध्यमांशी संवाद साधला. अजय राय म्हणाले, “तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. हे योगी बाबांनी चालवलेले जंगल राजचे सरकार आहे. ते त्याला मारहाण करत आहेत आणि बाबांचे अनुयायी असल्याचा दावा करत आहेत.”
2 ऑक्टोबरला रायबरेलीतील युवक हरिओम नावाच्या तरुणाची निर्घृण हत्या कऱण्यात आली. हरिओमवर चोरी केल्याच्या संशयावरून काही जणांनी त्याला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. मारहाण होत असताना हरिओमने मदतीसाठी खासदार राहुल गांधी यांचे नाव घेतले, असा दावा काँग्रेसने केला. पण या प्रकरणाला आता राजकीय वळण लागल्याचे दिसू लागले आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने युपीतील योगी सरकावर निशाणा साधला आहे. हल्लेखोरांचे ‘बाबा’ म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असल्याचा आरोप आता विरोधकांकडून केला जात आहे.
स्त्रीशक्तीचा उत्सव होणार साजरा, “लग्न आणि बरंच काही” चित्रपटातून दिसणार ‘महिलाराज’!
उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यात उंचाहार परिसरात जमावाने एका तरुणाला संशयित चोर समजून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिओम नावाचा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेला तरुण दांडेपूर जमुनापूर येथील सासरच्या घरी जात असताना जमावाने त्याला घेरले. ड्रोनद्वारे घरांना लक्ष्य करणाऱ्या चोरीच्या टोळीचा तो सदस्य असल्याचा संशय उपस्थित करण्यात आला. संतप्त जमावाने त्याला बेल्ट आणि काठ्यांनी मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्याची प्रकृती बिघडली आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात काही लोक तरुणाला मारहाण करताना आणि एका व्यक्तीला त्याच्या मानेवर पाय ठेवताना दिसत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप करत संताप व्यक्त केला. मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल केला. आरोपी वैभव सिंग, विपिन कुमार, विजय मौर्य, सुरेश कुमार आणि सहदेव यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.