गौतमी पाटीलला अपघात प्रकरणात क्लीनचीट (फोटो- सोशल मीडिया)
पुण्यातील अपघात प्रकरणात गौतमी पाटीलच्या अटकेची मागणी
पोलिसांनी वेगाने फिरवली तपासाची चक्रे
चंद्रकांत पाटलांचा व्हिडिओ झाला होता व्हायरल
Pune Gautami Patil Accident: गौतमी पाटील एका वेगळ्याच प्रकरणात चर्चेत आली आहे. हे प्रकरण पुण्यातील आहे. हे प्रकरण एका अपघाताशी सबंधित आहे. गौतमी पाटीलच्या कारने पुण्यात एका रिक्षाला जोरदार धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचालकासह ३ जण जखमी झाले होते. याबाबत आता रिक्षा चालकाच्या कुटुंबाने काही आरोप केले होते. त्यावर आता पुणे पोलिसांच्या तपासात महत्वाची माहिती समोर आली आहे. अपघात घडला तेव्हा गौतमी पाटील गाडीत होती की नाही याबाबत माहिती समोर आली आहे.
अपघात झाला तेव्हा गौतमी पाटील तिच्या गाडीत होती असा आरोप रिक्षा चालकाच्या कुटुंबाने केला होता. तसेच त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे पोलिसांचा जो अहवाल समोर आला आहे, त्यातून आता महत्वाची बातमी समोर आली आहे.
पुणे पोलिसांनी या प्रकरणात वेगाने तपास केला. यामध्ये गौतमी पाटीलला क्लीन चीट देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करताना अनेक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यावेळी गौतमी पाटीलचा कार ड्रायव्हरच गाडीत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात गौतमी पाटीलला क्लीनचीट देण्यात आल्याचे समजते आहे.
नेमके प्रकरण काय?
पुण्यातील पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळ गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षा चालक आणि बसलेले प्रवासी जखमी झाले. रिक्षा चालकावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हा अपघात घडला तेव्हा गौतमी पाटील गाडीत बसलेली नव्हती असे समोर येत आहे. या प्रकरणात चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना फोन केला आणि गौतमी पाटीलला उचलायचं की नाही अशी विचारणा केली आहे. त्याबाबतच चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना त्याबाबत कारवाई करण्याच्या सूचना देखील केल्या होत्या.
Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार
या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवासी जखमी झाले आहे. अपघात झाल्यानंतर तातडीने लोक धावून आले. त्यांनी जखमी रिक्षाचालक आणि प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आणि आता त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लिसांनी गौतमी पाटील हिच्या कार चालकाला ताब्यात घेतले आहे.