Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहशतवादी कारवायांसाठी दाऊदकडून आर्थिक मदत, एनआयएच्या आरोपपत्रातून खुलासा

दहशतवाद्यांना होणाऱ्या आर्थिक मदतीबाबत केंद्रीय तपास यंत्रणांकडून तपास सुरू आहे. या तपासादरम्यान तपास यंत्रणांनी काहींना अटक केली असून चौकशीदेखील सुरू आहे. त्यातून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने हवाला रॅकेटचा वापर करून दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवला असल्याचे समोर आले आहे. दाऊद इब्राहिमने दहशतवादी कारवायांसाठी मुंबईत २५ लाख रुपये पाठवले होते.

  • By Ganesh Mate
Updated On: Nov 08, 2022 | 11:11 AM
दहशतवादी कारवायांसाठी दाऊदकडून आर्थिक मदत, एनआयएच्या आरोपपत्रातून खुलासा
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – केंद्रीय तपास संस्था राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) टेरर फंडिंग प्रकरणात मोठा दावा केला आहे. भारतातील दहशतवादी कारवायांसाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमकडून (Dawood Ibrahim) पैसे पाठवण्यात येत होते. त्यासाठी हवाला मार्गाचा (Hawala Route) वापर दाऊदकडून करण्यात आला. मागील चार वर्षांत हवालाद्वारे दहशतवादी कारवायांसाठी (Terrorist Activities) सुमारे १२ ते १३ कोटी रुपये दाऊदने भारतात पाठवल्याचे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे.

दहशतवाद्यांना होणाऱ्या आर्थिक मदतीबाबत (Financial Help) केंद्रीय तपास यंत्रणांकडून तपास सुरू आहे. या तपासादरम्यान तपास यंत्रणांनी काहींना अटक केली असून चौकशीदेखील सुरू आहे. त्यातून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने हवाला रॅकेटचा वापर करून दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवला असल्याचे समोर आले आहे. दाऊद इब्राहिमने दहशतवादी कारवायांसाठी मुंबईत २५ लाख रुपये पाठवले होते.

मुंबईत दहशतवादी कारवाया आणि मोठे हल्ले घडवण्यासाठी दाऊद इब्राहिमसह त्याचा साथीदार छोटा शकीलने दुबईमार्गे पाकिस्तानातून २५ लाख रुपये पाठवले. हा पैसा सुरतमधून भारतात आला होता. त्यानंतर तेथून मुंबईला पोहोचला होता. हे पैसे हवालाद्वारे आरिफ शेख आणि शब्बीर शेख यांच्यापर्यंत पोहोचवले गेले.

मागील चार वर्षात हवालाद्वारे दहशतवादी निधीसाठी जवळपास १२ ते १३ कोटी रुपये भारतात पाठवण्यात आले असल्याचे एनआयएने म्हटले आहे. पाकिस्तानातून भारतात आणलेले २५ लाख रुपये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाठवण्यात आले होते असेही एनआयएने आरोपपत्रात म्हटले. शब्बीरने ५ लाख रुपये ठेवले होते आणि उर्वरित रक्कम एका साक्षीदारासमोर आरिफला दिली होती. शब्बीरच्या घराची ९ मे २०२२ रोजी झडती घेतली असता त्याच्याकडून ५ लाख रुपये जप्त करण्यात आल्याचे एनआयएने म्हटले आहे.

Web Title: Dawoods financial support for terror activities so nia chargesheet reveals nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2022 | 11:11 AM

Topics:  

  • dawood ibrahim
  • Terrorist Activities

संबंधित बातम्या

Encounter Specialist Pradeep Sharma: राज ठाकरेंच्या हत्येचा कट…; एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचे Untold किस्से
1

Encounter Specialist Pradeep Sharma: राज ठाकरेंच्या हत्येचा कट…; एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचे Untold किस्से

मोठी बातमी! रांचीमधून ISIS च्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या; ATS ची मोठी कारवाई
2

मोठी बातमी! रांचीमधून ISIS च्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या; ATS ची मोठी कारवाई

Infiltration Via Nepal : भारतात पुन्हा जैशच्या 3 टेररिस्ट ची घुसखोरी; नेपाळच का ठरतोय दहशतवाद्यांसाठी ‘गोल्डन गेटवे’?
3

Infiltration Via Nepal : भारतात पुन्हा जैशच्या 3 टेररिस्ट ची घुसखोरी; नेपाळच का ठरतोय दहशतवाद्यांसाठी ‘गोल्डन गेटवे’?

JeM 313 Bases : भारतासाठी नवी कसोटी? ऑनलाइन फंडिंग, मशिदींतून देणग्या; पाकिस्तानला पुन्हा लागलेत दहशतवादाचे डोहाळे
4

JeM 313 Bases : भारतासाठी नवी कसोटी? ऑनलाइन फंडिंग, मशिदींतून देणग्या; पाकिस्तानला पुन्हा लागलेत दहशतवादाचे डोहाळे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.