Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! रांचीमधून ISIS च्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या; ATS ची मोठी कारवाई

दिल्ली पोलिसांनी कारवाई करत इसिस दहशतवादी संघटनेच्या एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. झारखंड आणि दिल्ली पोलिस तसेच एटीएसने ही कारवाई केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 10, 2025 | 02:38 PM
मोठी बातमी! रांचीमधून ISIS च्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या; ATS ची मोठी कारवाई
Follow Us
Follow Us:

राजधानी दिल्ली हायअलर्ट जारी 
ईसिसशी संबंधित नागरिकांना अटक 
दिल्ली पोलिसांची देशभरात छापेमारी

Delhi Police Arrested ISIS Terrorist: दिल्ली पोलिसांनी देशभरात मोठी कारवाई केली आहे. देशभरातील अनेक भागात छापेमारी केली आहे. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत इसिस दहशतवादी संघटनेच्या एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. तसेच त्याच्या 8 ते 10 जणांना ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिस आणि झारखंड पोलिस यांनी एकत्रितपणे कारवाई केली आहे.

झारखंड आणि दिल्ली पोलिस तसेच एटीएसने रांचीमधील एका लॉजमधून isis चा संशयित दहशतवादी दानिशला अटक केली आहे. हा संशयित दहशतवादी अनेक दिवसांपासून या लॉजमध्ये राहत असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई दिल्ली पोलिस स्पेशल सेल आणि झारखंड एटीएस यांनी एकत्रितपणे केली आहे.

दरम्यान दानिशला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिस त्याचा ताबा घेणार आहेत. त्यानंतर त्याला घेऊन पोलिस दिल्लीला रवाना होणार आहे. एक संशयित रांचीत लपला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळताच त्यांनी झारखंड एटीएसशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी एकत्रितपणे लॉजवर छापेमारी केली व दानिशला अटक केली आहे.

पोलिसांनी काय काय केले हस्तगत?

दानिशला अटक करण्यात आलेल्या लॉजवरील खोलीतून बरेच सामान जप्त करण्यात आले आहे. आपत्तीजनक वस्तु व केमिकल आणि काही नकाशे जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या वस्तूंची तपासणी केली जात आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी एका आयसिस दहशतवाद्याला अटक केली आहे. त्यानंतर देशभरात १२ हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. देशभरातून आठ हून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्य आरोपी आफताब हा मुंबईचा रहिवासी आहे. अशर दानिश नावाच्या संशयित दहशतवाद्यालाही रांचीमध्ये अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिस, झारखंड एटीएस आणि रांची पोलिसांनी संयुक्त कारवाईत ही अटक करण्यात आली आहे. सध्या अटक केलेल्या सर्व संशयितांची चौकशी सुरू आहे.

अग्निवीर जवानाकडून रायफल आणि जिवंत काडतूसं चोरी केल्याप्रकरणी दोन संशयितांना अटक

देशभरातील विविध राज्यांमध्ये १२ हून अधिक ठिकाणी विशेष सेल आणि केंद्रीय एजन्सींनी छापे टाकले आहेत. या दरम्यान, टीमने वेगवेगळ्या ठिकाणांहून एकूण ८ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणात, दिल्ली स्पेशल सेलचे म्हणणे आहे की संपूर्ण प्रकरणात अजूनही तपास आणि चौकशी सुरू आहे.

Web Title: Delhi police major operation and arrested 8 isis terrorist alert latest breaking marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 02:11 PM

Topics:  

  • delhi
  • Delhi Police
  • Terrorist Activities
  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक
1

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक

दिल्ली हादरली! इस्कॉन मंदिराजवळ १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित सामूहिक बलात्कार; एक आरोपी चकमकीनंतर अटकेत
2

दिल्ली हादरली! इस्कॉन मंदिराजवळ १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित सामूहिक बलात्कार; एक आरोपी चकमकीनंतर अटकेत

Youth Innovation : DTU ची नवी योजना जाहीर! गावातील समस्यांवर शोधा उपाय अन् मिळवा कोटींचे बक्षीस
3

Youth Innovation : DTU ची नवी योजना जाहीर! गावातील समस्यांवर शोधा उपाय अन् मिळवा कोटींचे बक्षीस

DUSU Election Result 2026: DUSU निवडणुकीत ABVPचे यश; अध्यक्ष, सचिव अन् संयुक्त सचिवपद जिंकले, उपाध्यक्षपदी दीपांशु शौकीन
4

DUSU Election Result 2026: DUSU निवडणुकीत ABVPचे यश; अध्यक्ष, सचिव अन् संयुक्त सचिवपद जिंकले, उपाध्यक्षपदी दीपांशु शौकीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.