धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू
सातारा : अनवडी (ता. वाई) येथील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला. या हत्येप्रकरणानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लालासो बाबुराव शिंदे यांच्या विहिरीत सोमवारी (दि.2) अंदाजे 25 वर्षे वयाच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृत तरुणाच्या अंगात फक्त जीन्स पँट असून, एका मोठ्या पोत्यात दगड टाकून मृतदेह व मृतदेह असलेले ते पोते तारेने बांधून विहिरीमध्ये टाकल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधिताचा गळा आवळून व डोक्यात मारुन खून केल्याचे दिसून आले.
हेदेखील वाचा : Amravati Crime : दारू मुलगा प्यायला म्हणून बापाने केला मुलाचा खून; अमरावती जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना
दरम्यान, विहिरीत सापडलेल्या या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी वाई पोलीस उपअधीक्षकांसह भुईंज पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. मृतदेहाच्या हातावरील टॅटूसह घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंमुळे खुनाचा संशय व्यक्त होत आहे.
भुईंज पोलिस घटनास्थळी दाखल
घटनास्थळी भुईंज पोलीस आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, फॉरेन्सिक पथक यांच्यासह वाईचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम, भुईंजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पतंग पाटील, सूरज शिंदे हे रात्री उशिरापर्यंत ओळख पटवण्यासाठी तपास करत होते.
हेदेखील वाचा : Navi Mumbai Crime : हुक्का पार्लरवर राज्यातील सर्वात मोठी कारवाई, दीड कोटींचा मुद्देमाल जप्त
भुईंज पोलिसांची तपास पथके परप्रांतीय कामगार, हॉटेल वेटर, अन्य कामातील तरुण कामगार व टॅटूच्या आधारे माहिती घेत आहेत. मंगळवारी रात्री भुईंज पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे करत आहेत.