हुक्का पार्लरवर राज्यातील सर्वात मोठी कारवाई, दीड कोटींचा मुद्देमाल जप्त (फोटो सौजन्य-X)
सावन वैश्य, नवी मुंबई: कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीतील सेक्टर 1मधील मित्तल टॉवर मध्ये ताज कॅफे नावाचं हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती कोपरखैरणे पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीस पथकाने सदर ठिकाणी धाड टाकून हुक्का पार्लर मधील हुक्क्याचे साहित्य तसेच तीन गाळे जप्त करून त्याला सील लावले आहे. यामध्ये ताज कॅफे चालक हेमंत पंडित व त्याचा सहकारी नदा झूमानी या दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हुक्का पार्लर वर कारवाई करून एवढ्या मोठ्याप्रमाणात मुद्देमाल जप्त करणारे कोपरखैरणे हे राज्यातील पहिलेच पोलीस ठाणे ठरले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हुक्का पार्लरवर कारवाईबाबत पोलिसांना आदेश दिले होते. त्याप्रमाणे नवी मुंबईतील जवळपास सर्वच हुक्का पार्लर पोलिसांनी कारवाई करत बंद केले आहेत. मात्र लपून-छपून सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर देखील पोलीस शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करत आहेत. कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीतील सेक्टर 1मधील मित्तल टॉवर मध्ये ताज कॅफे नावाचं हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती कोपरखैरणे पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीस पथकाने सदर ठिकाणी धाड टाकून हुक्का पार्लर मधील हुक्क्याचे साहित्य जप्त केले.
नशा मुक्त नवी मुंबई या अभियानांतर्गत पोलिसांनी अमली पदार्थ तसेच नशिली पदार्थ सेवन व विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा फास आवळल्याच दिसून येत आहे. कोपरखैरणे पोलिसांनी सेक्टर 1 मधील ताज कॅफे या हुक्का पार्लरवर कारवाई केली आहे. या कारवाईत कोपरखैरणे पोलिसांनी हुक्का पार्लरमधील त्याला लागणारे फ्लेवर्स, हुक्का पोट, टेबल, खुर्ची, सोफा तसेच इतर साहित्य असा एकूण तब्बल दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केला असून, ज्या गळ्यात हे हुक्का पार्लर चालत होते ते गाळे देखील कोपरखैरणे पोलिसांनी सील केले आहे. यामध्ये ताज कॅफे चालक हेमंत पंडित व त्याचा सहकारी नदा झूमानी या दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हुक्का पार्लर वर कारवाई करून एवढ्या मोठ्याप्रमाणात मुद्देमाल जप्त करणारे कोपरखैरणे हे राज्यातील पहिलेच पोलीस ठाणे ठरले आहे.