पाटणा येथे एक भयानक घटना घडली आहे. प्रियकराला आपल्या संतप्त प्रेयसीची समजूत काढणे अवघड झाले. प्रेयसीचे मन वळवण्यासाठी त्याने सोशल मीडियाची मदत घेतली जी त्याच्यासाठी जीवघेणी ठरली. रुसलेल्या गर्लफ्रेंडचा रुसवा घालवण्याच्या नादात पोराचा जीव गेला आहे. व्हिडिओ कॉल सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडचा LIVE मृत्यू पाहिला(Death by strangulation while starting video call).
मिळालेल्या माहितीनुसार, मयत नेहमीप्रमाणे जेवण करून आपल्या खोलीत गेला. घरातील लोकही आपापल्या खोलीत झोपायला गेले. खोलीत गेल्यानंतर मृताने प्रेयसीला व्हिडिओ कॉलद्वारे समजवण्याचा प्रयत्न केला. प्रेयसीने मान्य न केल्यास आत्महत्येची धमकी देत गळ्यात फास घातला. सुमारे तासभर हा तमाशा सुरू होता. लाइव्ह व्हिडिओदरम्यान त्याने फाशीची धमकी दिली.
यावेळी प्रियकराच्या हातातून अचानक मोबाईल खाली पडला. यावेळी मोबाईल पकडण्यासाठी त्याने टेबलावरून उडी मारली. त्याने उडी मारताच त्याच्या गळ्यातील फास घट्ट बसला आणि त्याचा मृत्यू झाला.
लाइव्ह व्हिडिओ पाहणाऱ्या प्रेयसीने प्रियकराच्या शेजारच्या व्यक्तीला फोन करून गळफास घेतल्याचे सांगितले. यानंतर शेजाऱ्यांनी त्याच्या घरी धाव घेत कुटुंबीयांना याची माहिती दिली. लोकांनी खिडकीतून पाहिले असता प्रियकर फासावर लटकत होता. हे संपूर्ण प्रकरण प्रेमप्रकरणाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
व्हिडिओ कॉलदरम्यान त्याने गळ्यात फास घातला. हे करून प्रेयसी राजी होईल अशी त्याला आशा होती पण तसे झाले नाही. उलट त्याचा मृत्यू झाला.
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]






