Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 06.10.2026
Maharashtra to World Breaking News :
१२ दिवसांच्या गणेशोत्सवाची ढोल ताशांच्या गजरात सांगता झाली. २४ तासांच्या प्रदीर्घ मिरवणुकीनंतर मुंबईत ‘लालबागचा राजा’चे गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले. राज्यासह देशभरातील गणेश भक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थनाही केली.
हवामान खात्याकडून (IMD) महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सहकारी साखर कारखाना निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या उपस्थितीत ‘सिल्व्हर ओक’वर महत्त्वाची राजकीय बैठक होणार आहे.
येत्या २८ सप्टेंबरपासून बँक कर्मचाऱ्यांचा ३ दिवसांचा देशव्यापी संप; ग्राहकांची सोय लक्षात घेता रविवारी (२७ सप्टेंबर) बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेस व विरोधक आक्रमक पवित्रा घेतला असून CJP सह विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
26 Sep 2026 05:59 PM (IST)
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. सरकारने राज्यातील मोठ्या भागात दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आणि भरीव आर्थिक मदत कधी मिळणार, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आधी थेट मदत जमा करा आणि त्यानंतर पंचनाम्याचे सोपस्कार करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
26 Sep 2026 05:50 PM (IST)
भारतीय स्टेट बैंक (SBI) मध्ये कंत्राटी तत्त्वावर स्पेशलिस्ट केडर ऑफिसर (SCO) पदांच्या भरतीसाठी नवीन अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण २०७ रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे.
या २०७ रिक्त पदांमध्ये झोनल हेड (रिटेल) चे १, रीजनल हेड (आरएच) चे ५, रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीडचे २४, इन्व्हेस्टमेंट स्पेशालिस्टचे ९, इन्व्हेस्टमेंट ऑफिसरचे ४, व्हीपी वेल्थचे ९१ आणि एवीपी वेल्थच्या ७३ पदांचा समावेश आहे.
26 Sep 2026 05:40 PM (IST)
कल्याणमधील व्यावसायिक जयराम नेहलानी यांचे 50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याच्या प्रकरणाचा उल्हासनगर पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधार आणि इस्टेट एजंट सचिन शिरसाट याच्यासह पाच आरोपींना अटक केली आहे. आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.
26 Sep 2026 05:24 PM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त (maharashtra drought) शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. राज्यातील 358 तालुक्यांपैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली असून सरकारने सरसकट मदतीचे आश्वासन दिले होते, मात्र तसे केले नसल्याचे मत व्यक्त केले आहे. सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचेही वडेट्टीवार यांनी आरोप केला असून सहकार मंत्र्यांवरही निशाणा साधला आहे.
26 Sep 2026 04:57 PM (IST)
जपानमधील ऐची नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतासाठी २६ सप्टेंबर हा दिवस ऐतिहासिक ठरला. भारतीय लष्कराचा जवान सावन बरवालने मॅरेथॉनमध्ये रौप्य पदक जिंकले. पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये रौप्य पदक जिंकण्यासोबतच सावनने एक नवीन राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला. याशिवाय, आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या मॅरेथॉन प्रकारात भारताला ४४ वर्षांनंतर मिळालेले हे पहिले पदक आहे. २८ वर्षीय खेळाडू बरवालने ४२.१९५ किलोमीटरची मॅरेथॉन २ तास ११ मिनिटे ३७ सेकंदात पूर्ण करून रौप्य पदक पटकावले. जपानच्या इचिताका यामाशिताने जवळपास एका मिनिटाच्या फरकाने सुवर्ण पदक जिंकण्यात यश मिळवले.यापूर्वी भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत मॅरेथॉनमध्ये १९८२ साली पदक जिंकले होते. वाचा सविस्तर...
26 Sep 2026 04:47 PM (IST)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसह विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठीचे बहुचर्चित बेमुदत धरणे आंदोलन २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून एस. एम. जोशी पूल, नवी पेठ येथे सुरू होणार आहे. आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत विद्यार्थी प्रतिनिधींची एक संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीमध्ये तांत्रिक कारणांमुळे २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनाला परवानगी देता येत नसली, तरी २ ऑक्टोबर रोजी (गांधी जयंती) मात्र आंदोलनास परवानगी देण्याबाबत पोलिसांनी सहमती दर्शविली आहे.
26 Sep 2026 04:37 PM (IST)
महाराष्ट्रात अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांच्या समस्या अधिकच गंभीर झाल्या असताना, राज्य सरकारने महत्त्वपूर्ण दिलासा दिला आहे. दुष्काळग्रस्त भागांना भेट दिल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. २६५ तालुक्यांमध्ये राज्य सरकारने ‘ट्रिगर १’ लागू केला आहे, तिथे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. एकूण, महाराष्ट्रातील ३५८ पैकी २६५ तालुके दुष्काळाचा सामना करत आहेत, म्हणजेच राज्याचा ७५% भाग दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला आहे. सरकारने दुष्काळातून दिलासा देण्यासाठी अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. वाचा सविस्तर...
26 Sep 2026 04:33 PM (IST)
“पावसाचा खंड पडल्यामुळे राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, शासनाने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पंचनामे व पाहणीनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही,” अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज येथे दिली.
26 Sep 2026 04:27 PM (IST)
निवडणूक आयोगाच्या कारभारावर देशभरात मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे. मुख्य निवडणूक अधिकारी ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांनीही निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून मोठे जनआंदोलन उभारले जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. आता पुन्हा त्यांनी नव्याने पोस्ट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून येत्या 4 ऑकटोबर रोजी मुंबईत मोठा जनमोर्चा काढला जाणार असल्याचे नमूद केले आहे.
26 Sep 2026 03:59 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाने आणि महायुतीने आज दुष्काळाची जी घोषणा केली आहे, त्याचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे आणि आभारही मानले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी जे दौरे केले, त्या दौऱ्यांमध्ये त्यांना दुष्काळाची वास्तविक परिस्थिती जाणवली. काही लोकांचा असा संभ्रम होता की, ५ तारखेनंतर पंचनामे होतील आणि त्यानंतर दुष्काळ जाहीर केला जाईल. पण सरकारने त्याची वाट न पाहता २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
26 Sep 2026 03:55 PM (IST)
Pune Ganpati Visarjan : आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी लाखो भाविकांनी काल २५ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. यंदाही विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात सुरू असल्याचे पाहण्यास मिळत आहे. पण यंदा पुण्यात २४ तास उलटून गेले तरी मिरवणूक संपण्यासाठी रेकॅार्ड ब्रेक गर्दी पाहण्यास मिळत आहे.
26 Sep 2026 03:50 PM (IST)
पुणे – इंदूर महामार्गावर नाशिक जिल्ह्यात भीषण अपघात, तिघे ठार
नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या कानडगावजवळ अपघात
दोन ट्रकची टक्कर होऊन तिघे ठार, दोघे जबर जखमी
जखमींवर चांदवडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
26 Sep 2026 03:39 PM (IST)
कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मधमाशांचा हल्ला
गणपती विसर्जन मिरवणुकीत पंचगंगा नदी पुलावरील घटना
मधमाशांच्या पोळयाजवळ फटाके फोडल्यामुळे मशमाशांचा हल्ला
26 Sep 2026 03:30 PM (IST)
ठाणे महापालिका क्षेत्रात अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुका भक्तीमय आणि उत्साही वातावरणात पार पडल्या. महापालिकेने उभारलेल्या विविध विसर्जन सुविधांचा वापर करत ११ व्या दिवशी शहरात एकूण १०,२८१ गणेशमूर्तींचे विसर्जन
26 Sep 2026 03:20 PM (IST)
छत्रपती संभाजीनगरमध्ये काल गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गुलाल उधळण्यावरून बंदोबस्तामध्ये असलेल्या पोलीस आणि गणेश भाविकांमध्ये वाद झाला. दरम्यान शाब्दिक बाचाबाचे रुपांतर हाणामारीत झाले.
26 Sep 2026 03:10 PM (IST)
महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या अमेरिकेतील Toledo येथेही गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळाला. मूळ महाराष्ट्रातील नागरिकांनी ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला
26 Sep 2026 03:02 PM (IST)
Mushtaq Khan: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मुश्ताक खान आता आपल्यात नाहीत. २४ सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले. २५ सप्टेंबर रोजी मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूडमधील प्रमुख कलाकारांची अनुपस्थिती असल्याबद्दल अभिनेते रझा मुराद यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
26 Sep 2026 02:59 PM (IST)
पिंपरी-चिंचवड आणि मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय जमिनींवर १ जानेवारी २०११ पर्यंत झालेली निवासी अतिक्रमाणे नियमानुकूल करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सर्वंकष धोरण ठरवून पुढील ३ महिन्यांत स्पष्ट शिफारशींसह अहवाल सादर करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यांच्या विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे.
26 Sep 2026 02:50 PM (IST)
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेदरम्यान पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपचे नेते प्रीतम म्हात्रे यांचे पनवेल आणि उरण या दोन्ही मतदारसंघांच्या मतदार यादीत नाव असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कथित दुबार नोंदीची निवडणूक आयोगाने चौकशी करावी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.
26 Sep 2026 02:39 PM (IST)
राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
26 Sep 2026 02:30 PM (IST)
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे सोमवारी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांची भेट घेऊन बाधित तलावांची पाहणी करणार आहेत.
26 Sep 2026 02:20 PM (IST)
सुप्रिया सुळे यांनी राज्यातील दुष्काळाबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळेल, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे.
26 Sep 2026 02:11 PM (IST)
DCM सुनेत्रा पवार आज नांदेड दौऱ्यावर असून दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्या आहेत. लोहा तालुक्यातील बारूळ फाटा आणि सोनखेड येथे त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून पिकांची परिस्थिती आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
26 Sep 2026 01:55 PM (IST)
प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं आलिशान घर असावं आणि आपण सुखाचं आयुष्य जगावं. पण अशी आलिशान खरं नेमकी कोणत्या शहरांत जास्त वसली आहेत तुम्हाला माहिती आहेत का? भारतातील स्वप्नाची नगरी असं म्हटलं जाणारं मुंबई शहराचं ही या यादीत नाव आहे. चला तर मग जाणून घेऊयात जगातील अशी कोणती शहरं आहेत जी आलिशान घरांच्या यादीत येतात आणि कोणत्या शहराचा कितवा नंबर लागतो.
26 Sep 2026 01:50 PM (IST)
सार्वजनिक क्षेत्रातील बँका पुढील ३ दिवस संपावर जाणार आहेत. त्यामुळे 28 सप्टेंबरपासून 30 सप्टेंबरपर्यंत बँकेतील तुमचे व्यवहार कोळंबणार आहेत. या तीन दिवसीय देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. पण यादरम्यान एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. देशभरातील सहकारी बँका सुरुच राहणार असल्याचं समोर येत आहे. बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपात त्यांचे कर्मचारी सहभागी होणार नाहीत.
26 Sep 2026 01:45 PM (IST)
जागतिक पर्यटन क्षेत्राचा सातत्याने विकास होत असताना डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे पर्यटनाच्या भविष्यातील महत्त्वाचे घटक ठरत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे पर्यटनाचा अनुभव घेण्याची आणि त्याचे व्यवस्थापन करण्याची पद्धत बदलत आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे पर्यटकांना माहिती आणि सेवा अधिक सहज उपलब्ध होत असतानाच, पर्यटनाचे नियोजन आणि व्यवस्थापन अधिक कार्यक्षमपणे करणे शक्य होत आहे.
26 Sep 2026 01:40 PM (IST)
शाळा-कॉलेजच्या दिवसांत खाकी किंवा ऑलिव्ह ग्रीन रंगाचा गणवेश घालून शिस्तीत मार्च करणे हे मुलांमध्ये एक वेगळा उत्साह आणि अभिमानाची भावना निर्माण करते. राष्ट्रीय कॅडेट कोर (NCC) मधील हे आकर्षण तरुणांमध्ये देशभक्ती, एकता आणि नेतृत्वाची भावना मोठ्या प्रमाणावर रुजवण्याचे काम करते. अभ्यासासोबतच एनसीसीशी जोडले जाणे हा एक रोमांचक प्रवास आहे, ज्याच्या माध्यमातून पुस्तकी ज्ञानाशिवाय जीवनातील खरे धडे शिकायला मिळतात.
26 Sep 2026 01:35 PM (IST)
सुझुकीच्या नवीन तंत्रज्ञानासंबंधीच्या घोषणांचा मारुती सुझुकीच्या भारतीय लाइनअपवर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो. हे बदल एंट्री-लेव्हल हॅचबॅकपासून ते मोठ्या फॅमिली एसयूव्हीपर्यंत असू शकतात. कंपनी मिनी-वाहनांसाठी ४८V हायब्रीड प्रणाली विकसित करत आहे. कॉम्पॅक्ट कारसाठी सिरीज हायब्रीड आणि प्लग-इन रेंज एक्स्टेंडर तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. याव्यतिरिक्त, कंपनी भारतासारख्या बाजारपेठांसाठी एक नवीन टर्बो-पेट्रोल इंजिन विकसित करत आहे.
26 Sep 2026 01:30 PM (IST)
जावळी तालुक्यात अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने आठ ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त केली. या कारवाईत दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, संबंधित ठिकाणच्या बीट अंमलदारांवर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे कारवाई होणार का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तर व्यसनमुक्त संघाचे राज्यअध्यक्ष यांनी संबंधित बिटअंमलदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
26 Sep 2026 01:25 PM (IST)
राजस्थानमध्ये संघटित गुन्हेगारी आणि बेकायदा शस्त्रांविरोधात कारवाई करणाऱ्या अँटी गँगस्टर टास्क फोर्सने (AGTF) मोठी कारवाई केली आहे. लॉरेन्स-आरजू बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या दोन शार्प शूटर्सच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन पिस्तुले, चार मॅगझिन आणि 36 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
26 Sep 2026 01:15 PM (IST)
वेलकम चित्रपटामधला बल्लू आठवतोय का? मेरी एक टांग नकली है” हा डायलॉग बोलणारे मुश्ताक खान यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्य अश्या अचानक जाण्याने अख्या बॉलिवूडला धक्का बसला. 300 अधिक सिनेमे 50 वर्ष इंडस्ट्रीत राहिलेला असा कलाकार अचानक गेला सिनेसृष्टीमध्ये एक पोकळी निर्माण झाली. त्यांचा मुलगा डायरेक्टर मोहसीन खानने वडीलांच्या शेवटच्या दिवसांबद्दल सांगितले. त्याचे शब्द ऐकून डोळ्यांत पाणी येईल.
26 Sep 2026 01:05 PM (IST)
राजस्थानमध्ये संघटित गुन्हेगारी आणि बेकायदा शस्त्रांविरोधात कारवाई करणाऱ्या अँटी गँगस्टर टास्क फोर्सने (AGTF) मोठी कारवाई केली आहे. लॉरेन्स-आरजू बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या दोन शार्प शूटर्सच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन पिस्तुले, चार मॅगझिन आणि 36 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
26 Sep 2026 12:48 PM (IST)
बीड शहरातील पेठ बीड परिसरातील सराईत गुन्हेगार सफवान खान मेहबूब खान आणि त्याच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बीड ग्रामीण पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावाला छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी मंजुरी दिली आहे. टोळीतील आरोपींवर पेठ बीड, बीड ग्रामीण आणि बीड शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, अवैध अग्नीशस्त्रे बाळगणे, दंगा, अपहरण, घरात घुसून मारहाण आणि जबरी वसुलीचे गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
26 Sep 2026 12:36 PM (IST)
पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकल्पाला पुढे नेताना पवना धरणग्रस्तांचे प्रलंबित पुनर्वसन, जमीन मोबदला, पर्यायी जमीन, मावळच्या पाण्याचा हक्क तसेच स्थानिक गावांच्या विविध मागण्यांचा प्राधान्याने विचार करावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेत मांडण्यात आली आहे. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार सुनील शेळके यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, धरणग्रस्त आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.
26 Sep 2026 12:24 PM (IST)
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या समर्थनार्थ तालुक्यातील ७२ मतदार प्रतिनिधी एकत्र आल्याचा दावा करण्यात आला असून, त्यांच्या उपस्थितीत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकताच सत्कार समारंभ पार पडला. खेड तालुक्यातील विविध सहकारी संस्थांमधून नव्याने निवडून आलेल्या मतदार प्रतिनिधींचा यावेळी फेटे बांधून सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित प्रतिनिधींनी मोहिते पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा शब्द दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आगामी जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील गटाने आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिल्याची चर्चा सहकार क्षेत्रात सुरू झाली आहे.
26 Sep 2026 12:12 PM (IST)
बीड जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी तालुकाप्रमुख आणि बीडमधील बडे नेते शिवाजीराव शिंदे यांनी आपल्या राहत्या घरी जीवन संपवले आहे. या घटनेमुळे बीड आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवाजीराव शिंदे यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे हे टोकाचे पाऊल उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच बीड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागील कारणांचा सखोल तपास सुरू केला आहे.
26 Sep 2026 11:25 AM (IST)
बॉलिवूडचा हिरो नंबर 1 गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून गोविंदा त्याच्या खाजगी आयु्ष्यामुळे चर्चेचा विषय ठरला. गेल्या काही दिवसांपासून गोविंदा आणि एक मराठी अभिनेत्री कोमल रानी स्वर्णकार यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू असतानाचा नुकतेच दोघांनी एकत्र लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्याचे व्हिडिओ सोशलमीडियावर व्हायरल झाले आणि चर्चेंना उधाण आले. नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया म्हणाले की, गोविंदाचं सुनीता सोबतचं लग्न मोडणार का? गोविंदा कोमलला डेट करतोय का? सोशल मीडियावर तर वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या. आता या सर्व चर्चांवर स्वतः गोविंदाने अखेर मौन सोडलं आणि नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. Govinda on After Lalbaugcha Raja Visit:
26 Sep 2026 11:15 AM (IST)
Hardik Pandya Injury Update: स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा टीम इंडियाच्या चिंतेत भर घातली आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड झालेला हार्दिक पुन्हा जखमी झाला आहे. सरावादरम्यान त्याच्या उजव्या पायाच्या पोटरीला दुखापत झाली, ज्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. पांड्या २० सप्टेंबरला संघात परतणार होता आणि निवड समितीने ६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारत ‘अ’ संघात त्याचे नाव समाविष्ट केले होते.
26 Sep 2026 11:05 AM (IST)
सोशल मिडिया क्रिएटरने हा व्हिडिओ @Two_generations_one_vlog नावाच्या आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून व्हिडिओला सध्या जबरदस्त व्ह्यूज मिळत असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये, चहाचा थर्मॉस घेतलेल्या एका तरुणाला क्रिएटक विचारतो की, दिवसाला तुम्ही किती कप चहाची विक्रि करता? यावर चहा विकणारा तरुण २५०० ते ३००० पर्यंतची कमाई दररोज होते असे सांगतो. यावर क्रिएटर पुन्हा त्याला प्रश्न करतो की, यातून किती पैशांची बचत होते ज्यावर चहा विकणारा तरुण सांगतो की, दिवसाला १५०० पर्यंतची तो बचत करतो.
26 Sep 2026 10:55 AM (IST)
२६ सप्टेंबरच्या सकाळी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ दिसून आली आहे. डॉलरची कमजोरी आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत, २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,५३,००० वर पोहोचला आहे, तर २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,४०,२६० नोंदवला गेला आहे.
सोन्याच्या दरात घसरण
मुंबई, कोलकाता, चेन्नई, पुणे आणि बंगळूरु यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये, २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,५२,८५० आहे. तथापि, जागतिक दबावामुळे साप्ताहिक आधारावर सोन्याच्या दरात २.५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. दरम्यान, चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. चांदीचा भाव प्रति किलो ₹२,४४,९०० पर्यंत घसरला आहे, म्हणजेच एका आठवड्यात सुमारे १०,००० रुपयांची घट झाली आहे.
26 Sep 2026 10:50 AM (IST)
जपानमध्ये आयोजित होत असलेल्या आशियाई क्रिडा स्पर्धा २०२६ मध्ये क्रिकेटच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आता समोर आली आहे. आशियाई क्रिडामध्ये पुरुष क्रिकेट स्पर्धामध्ये भारतीय टीमने आपले स्थान मिळवले असून आता विरूद्ध संघाचे नावही समोर आले आहे. भारतीय संघाचा २८ सप्टेंबर रोजी हाय वॉल्टेज ड्रामा असणारा हा सामना ठरणार आहे.
26 Sep 2026 10:40 AM (IST)
व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूब पुन्हा एकदा त्यांच्या यूजर्सचा अनुभव बदलण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनीने त्यांच्या मेड ऑन युट्यूब ईव्हेंटमध्ये अनेक नवीन फीचर्सची घोषणा केली आहे. यामध्ये कंपनीने कस्टम फीड्स नावाचे एक फीचर देखील सादर केले आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स एआयची मदत घेऊन त्यांच्या आवडीनुसार एक वेगळी व्हिडीओ फीड तयार करू शकणार आहेत. याव्यतिरिक्त, कमेंट सेक्शनमध्ये जिआयएफ पोस्ट करण्याचा पर्याय देखील लवकरच मिळणार आहे.
26 Sep 2026 10:40 AM (IST)
AFSPA Extended Manipur : देशाच्या गृह मंत्रालयाने (Ministry of Home Affairs - MHA) शुक्रवारी ईशान्य भारतातील मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड या तीन राज्यांमधील संवेदनशील भागांमध्ये सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा १९५८ म्हणजेच 'अफ्स्पा' (AFSPA) ला पुन्हा एकदा ६ महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ही मुदतवाढ १ ऑक्टोबर २०२६ पासून ते ३१ मार्च २०२७ पर्यंत लागू राहील. विशेष म्हणजे, या कायद्यांतर्गत 'अशांत क्षेत्र' (Disturbed Area) म्हणून घोषित केलेल्या पोलीस ठाण्यांच्या आणि जिल्ह्यांच्या सीमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून पूर्वस्थिती (Status Quo) कायम ठेवण्यात आली आहे.
26 Sep 2026 10:30 AM (IST)
राज्याचे ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पुतणी नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या (Sweden) ३४९ सदस्यांच्या संसदेत खासदार (MP) म्हणून निवड झाली आहे. नीला विखे खासदार झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना फोन करून अभिनंदन केले आणि सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. मात्र, या सर्व घडामोडींवर आता थेट स्वीडनहून नीला विखे पाटील यांनी एका मुलाखतीदरम्यान धक्कादायक खुलासे करत काका राधाकृष्ण आणि चुलत भाऊ सुजय विखे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
"माझे काका आणि चुलत भाऊ यांना मी गेल्या 10 ते 12 वर्षात बोलणे झालेले नाही. आमच्यात साधा संवादही कधी होत नाही. त्यातच सुजय म्हणतो की, भारतात तिचा पक्ष असता तर ती निवडून येऊ शकली नसती. पण मी त्यांच्यासारखे वारंवार पक्ष बदलत नाही. मी माझ्या पक्षासोबत प्रामाणिक आहे आणि शेवटपर्यंत मी माझ्या पक्षाला बांधिल राहिल. मी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मला काकांचा फोन आला होता. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या… त्या पलिकडे काहीच नाही, ही वस्तूस्थिती आहे.
26 Sep 2026 10:30 AM (IST)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा १५०० रुपयांचा हफ्ता लवकरच जमा केला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ₹३३९ कोटी १४ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. हा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. यामुळे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात लकवरच हप्ता जमा होणार आहे.
26 Sep 2026 10:20 AM (IST)
इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून उडी घेत एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. निनाद यतिंद्र विश्वकर्मा (वय १४) याने आत्महत्या केली. ही घटना बेलतरोडी पोलिस ठाण्यांतर्गत पृथ्वीराजनगर येथील मॅक्स ग्लोरी अपार्टमेंटमध्ये घडली. त्याच्या मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
26 Sep 2026 10:10 AM (IST)
CJP on Gyanesh Kumar : एसआयआर (SIR) प्रक्रियेतील कथित गैरप्रकार आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) आणि केंद्रीय निवडणूक आयोग (ECI) यांच्यातील संघर्ष आता अत्यंत तीव्र झाला आहे. ४८ तासांचा अल्टिमेटम संपल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने आपल्या पुढील रणनीतीची घोषणा करताना अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना तयार राहण्याचे आवाहन करताना म्हटले आहे की, "सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाज़ुए-क़ातिल में है... तुम्ही सर्वजण तयारीला लागा, आता थेट २ ऑक्टोबर रोजी भेटू." अल्टिमेटम संपल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यावर काय भूमिका घेतात किंवा निवडणूक आयोग यावर काही स्पष्टीकरण जारी करतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
26 Sep 2026 10:10 AM (IST)
एयर फ्रायरमुळे जेवण बनवण्याची पद्धत अधिक सोपी झाली आहे. यामुळेच अनेकजण एअर फ्रायर खरेदी करण्याला प्राधान्य देतात. एअर फ्रायर जितके फायद्याचे ठरते, तेवढीच त्याची स्वच्छता राखणं देखील गरजेचे आहे. एअर फ्रायरची स्वच्छता करताना काही विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या छोट्या चुकीमुळे मशीनच्या परफॉर्मंसवर परिणाम होऊ शकतो.
26 Sep 2026 10:00 AM (IST)
Hardik Pandya Injury Update: भारतीय क्रिकेट संघातील (Team India) स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्या दुखापतीबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि चिंतेची माहिती समोर आली आहे. आयपीएल २०२६ (IPL 2026) चा हंगाम संपल्यापासून हार्दिक पांड्या मैदानापासून दूर आहे. आधीच भारतीय संघातील स्टार खेळाडूंच्या दुखापतींचे सत्र सुरू असताना, हार्दिक पांड्याची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही, ज्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
26 Sep 2026 10:00 AM (IST)
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पहिल्याच दिवशी गृहनिर्माण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पक्षीय राजकारण आणण्यास स्पष्ट विरोध दर्शविला. ‘बँक टिकवायची की मोडकळीस काढायची?’ असा सवाल उपस्थित करत सहकार संस्थांच्या निवडणुका पक्षीय चौकटीबाहेर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.






