पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
Skin Care Tips: सुंदर दिसण्यासाठी त्वचेची खूप जास्त काळजी घेतली जाते. कधी महागडे फेशिअल करून घेतले जातात तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून चेहऱ्यावरील ग्लो वाढवला जातो. त्वचेची काळजी घेताना कायमच योग्य स्किन केअर फॉलो करणे फार आवश्यक आहे. अन्यथा त्वचेच्या समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू शकतात. चेहऱ्यावरील टॅनिंग, काळे डाग, पिगमेंटेशन किंवा निस्तेजपणा घालवण्यासाठी फेसपॅक आणि महागडे स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरले जातात. पण वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे, मानसिक तणाव, पोषक घटकांचा अभाव, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे त्वचा निस्तेज होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
त्वचेवरील ग्लो कमी झाल्यानंतर त्वचा खूप जास्त काळी आणि रखरखीत वाटते. त्यामुळे कायमच महागड्या स्किन ट्रीटमेंट करण्यासाठी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर त्वचेसाठी करावा. यामुळे त्वचा आतून सुंदर आणि चमकदार दिसू लागते. आज आम्ही तुम्हाला संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरच्या घरी विटामिन सी फेसपॅक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला फेसपॅक त्वचेवर वाढलेले काळे डाग, पिगमेंटेशन, डेड स्किन कमी करण्यास मदत करतात.
मोसंबी किंवा संत्राच्या सालींचा रस
मुलतानी माती
टोमॅटोचा रस
कस्तुरी हळद
विटामिन ई कँप्सूल
विटामिन सी फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात संत्री किंवा मोसंबीची साल घालून बारीक पेस्ट बनवा आणि त्याचा रस काढून घ्या. वाटीमध्ये मुलतानी माती घेऊन त्यात तयार केलेला सालींचा रस, टोमॅटोचा रस, कस्तुरी हळद, विटामिन ई कँप्सूल घालून व्यवस्थित पेस्ट तयार करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ब्रशच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर लावून २० मिनिटं तसेच ठेवून द्या. चेहरा पूर्णपणे कोरडा झाल्यानंतर थंड पाण्याने फेसपॅक स्वच्छ करा. हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे त्वचेच्या वाढत्या समस्यांपासून सुटका मिळेल.
Lifestyle News: सकाळी उठताच हात-पाय सुन्न पडतात? शरीर देतंय ‘हे’ संकेत, दुर्लक्ष करू नका!
मोसंबी किंवा संत्राच्या सालीमध्ये विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स घटक आढळून येतात. ज्यामुळे त्वचेवर वाढलेला टॅन, काळे डाग आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते. त्वचेवरील नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी संत्र्याच्या सालीचा वापर करावा. टोमॅटोमधील गुणधर्म त्वचेवरील ओपन पोर्स बंद करुन त्वचा घट्ट करतात आणि त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करतात. मुरुमे, डाग आणि जळजळ कमी करण्यासाठी कस्तुरी हळद प्रभावी ठरते.
Ans: संत्र्याच्या सालीमध्ये काही अँटिऑक्सिडंट घटक आणि व्हिटॅमिन C असते. योग्य पद्धतीने वापरल्यास त्वचेला ताजेतवाने आणि उजळ दिसण्यास मदत होऊ शकते.
Ans: मोसंबीची साल स्वच्छ धुऊन पूर्णपणे वाळवून त्याची पावडर करा. त्यात योग्य प्रमाणात दही किंवा साधे पाणी मिसळून पेस्ट तयार करू शकता.
Ans: हा फेसपॅक त्वचेवरील मृत पेशी आणि अतिरिक्त तेलकटपणा कमी करण्यास मदत करू शकतो. मात्र टॅनिंग कमी होण्यासाठी नियमित सनस्क्रीन वापरणेही महत्त्वाचे आहे.






