Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डेक्कन पोलिसांची मोठी कारवाई; मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला घेतले ताब्यात

मोबाईल हिसकावणाऱ्या सराईताला डेक्कन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून चार मोबाईल जप्त केले असून, तीन गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 17, 2025 | 04:04 PM
डेक्कन पोलिसांची मोठी कारवाई; मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला घेतले ताब्यात
Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. रात्रीच्यावेळी कॅबची वाट पाहणाऱ्या तसेच रस्त्याच्या कडेला उभारलेल्या नागरिकांचे अंधाराचा फायदा घेऊन मोबाईल हिसकावणाऱ्या सराईताला डेक्कन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून चार मोबाईल जप्त केले असून, तीन गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

हबीब अबालु इराणी (वय २४, रा. पुणे-मुंबई रोडजवळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून डेक्कनमधील दोन व बाणेरमधील एक असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्हे निरीक्षक प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश भोसले, अजय भोसले यांच्या पथकाने केली आहे.

पुणे शहरात मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पादचारी, दुचाकीस्वार व वाहनांची वाट पाहत थांबलेल्या नागरिकांकडील मोबाईल हिसकावून नेल्याच्या घटना घडत आहेत. डेक्कन परिसरात देखील दोन घटना घडल्या होत्या. यापार्श्वभूमीवर डेक्कन पोलीस हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा हबीब इराणी याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानूसार, पथकाने त्याला सापळा कारवाई करून पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून चार मोबाईल मिळाले.

सखोल तपास केला असता त्याने डेक्कन तसेच बाणेर व येरवड्यात मोबाईल हिसकावल्याची कबूली दिली. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले असून, त्याने आणखी कोठे मोबाईल हिसकावले आहेत का याबाबत पोलीस तपास करत आहेत. त्याच्यावर यापुर्वीचे देखील गुन्हे नोंद असून, यापुर्वी त्याच्यावर लोहमार्ग पोलीस, यवत तसेच हडपसर पोलिसांत गुन्हे नोंद असल्याचे सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा : पुण्यातील बुधवार पेठेत एकाच्या खुनाचा प्रयत्न; डोक्यात वीट घातली अन्…

पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?

पुण्यात सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Web Title: Deccan police has arrested a mobile phone thief nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 04:04 PM

Topics:  

  • Deccan Police
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.