Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाळ-मृदंगाच्या गजरात पुणे-अक्कलकोट पालखी मार्गस्थ; 750 तरुणांनी केला व्यसनमुक्तीचा संकल्प

पुणे ते अक्कलकोट पायी पालखी सोहळ्याने शुक्रवारी ( ता. १३ नोव्हेंबर) रोजी सकाळी १० च्या सुमारास नवा बुधवार पेठ येथील स्वामी समर्थ मठापासून प्रस्थान केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 14, 2026 | 04:53 PM
टाळ-मृदंगाच्या गजरात पुणे-अक्कलकोट पालखी मार्गस्थ; 750 तरुणांनी केला व्यसनमुक्तीचा संकल्प

टाळ-मृदंगाच्या गजरात पुणे-अक्कलकोट पालखी मार्गस्थ; 750 तरुणांनी केला व्यसनमुक्तीचा संकल्प

Follow Us
Follow Us:
  • ‘श्री स्वामी समर्थ’च्या जयघोषात पुणे-अक्कलकोट पालखीचे प्रस्थान
  • ७५० तरुणांचा व्यसनमुक्तीचा संकल्प
  • पुणे-अक्कलकोट पालखीला तरुणाईचा मोठा प्रतिसाद
पुणे : “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे,” असा भक्तांना अभय देणाऱ्या श्री स्वामी समर्थांच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि अतिशय भक्तिमय वातावरणात महाराष्ट्रातील मानाची पहिली पालखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे ते अक्कलकोट पायी पालखी सोहळ्याने शुक्रवारी ( ता. १३ नोव्हेंबर) रोजी सकाळी १० च्या सुमारास नवा बुधवार पेठ येथील स्वामी समर्थ मठापासून प्रस्थान केले. शिक्षण महर्षी डाॅ. पी.डी. पाटील यांच्या शुभहस्ते विधिवत पादुका पूजन आणि महाआरती झाल्यानंतर हा भव्य सोहळा अक्कलकोटच्या दिशेने मार्गस्थ झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ आण्णा देशमुख  यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या पदयात्रेला यंदा तरुणांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे.

 

७५० तरुणांनी घातल्या माळा, व्यसनमुक्तीचा अनोखा संदेश

या पालखी सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तरुण पिढीचा सहभाग. अध्यक्ष राजेंद्र आण्णा देशमुख हे सातत्याने तरुणांना व्यसनापासून परावृत्त करून आध्यात्माचा मार्ग दाखवण्याचे मोलाचे कार्य करत आहेत. त्यांच्या या प्रेरणेतून यंदाच्या पालखी सोहळ्यात तब्बल ७५० तरुणांनीई विधिवत माळा घालून व्यसनमुक्तीचा आणि स्वामी सेवेचा संकल्प केला आहे. तरुणाईला भक्तीच्या मार्गाशी जोडणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मान्यवरांच्या हस्ते पूजन आणि सत्कार

प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने शिक्षण महर्षी डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते पादुका पूजन संपन्न झाले. यावेळी आयोजकांच्या वतीने डॉ. पी. डी. पाटील आणि नगरसेविका स्वप्नाली पंडित यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ३५ वर्षांपासून अखंडित सुरू असलेल्या या सोहळ्याच्या नियोजनात प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त आणि सेवेकरी परिश्रम घेत आहेत.

अक्कलकोट येथे २ कोटींची भव्य स्वागत कमान आणि भक्त निवासाचा संकल्प

केवळ पायी वारीपुरते मर्यादित न राहता, भाविकांच्या कायमस्वरूपी सोयीसाठी अध्यक्ष राजेंद्र आण्णा देशमुख यांनी मोठा पुढाकार घेतला आहे. त्यांच्या प्रयत्नांतून अक्कलकोट येथे तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून भव्य स्वागत कमान उभारण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. यासोबतच, अक्कलकोटला येणाऱ्या हजारो भाविकांची निवासाची उत्तम सोय व्हावी, यासाठी एक भव्य भंक्त निवास बांधण्याच्या हालचालींनाही वेग आला आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे शहरात 31 किमीचे दोन भुयारी मार्ग उभारण्याची तयारी; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन

१२ दिवस आणि ३०० किलोमीटरचा भक्तीमय प्रवास

पुणे ते अक्कलकोट हा संपूर्ण पायी प्रवास सोलापूरमार्गे सुमारे २९० ते ३१० किलोमीटरचा असून तो तब्बल १२ दिवस चालणार आहे. दररोज २० ते २५ किलोमीटरचा टप्पा पार करत हा सोहळा मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी अक्कलकोट नगरीत दाखल होणार आहे. मार्गातील प्रत्येक गावात निवासाची, न्याहारीची आणि महाप्रसादाची चोख व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण मार्ग ‘श्री स्वामी समर्थ’ नामाच्या गजराने दुमदुमून गेला आहे.

“तरुण पिढी व्यसनाच्या आहारी न जाता त्यांनी आध्यात्म आणि राष्ट्रनिर्माणाच्या मार्गावर चालावे, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. यंदा ७५० तरुणांनी माळा घालून व्यसनमुक्तीचा निर्धार केला, हेच स्वामींच्या कृपेचे फळ आहे. तसेच, अक्कलकोट येथे दोन कोटींची स्वागत कमान आणि भव्य भक्त निवास उभारून भाविकांची सेवा करण्याचा आमचा संकल्प आहे.” — राजेंद्र देशमुख (अध्यक्ष, पालखी सोहळा आयोजन समिती)
💡

Frequently Asked Questions

  • Que: पुणे-अक्कलकोट पालखी सोहळ्याचे प्रस्थान कधी आणि कुठून झाले?

    Ans: पुणे-अक्कलकोट पायी पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता नवा बुधवार पेठेतील स्वामी समर्थ मठातून अक्कलकोटकडे प्रस्थान झाले.

  • Que: यंदा पालखी सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य काय आहे?

    Ans: यंदा तब्बल ७५० तरुणांनी माळा घालून व्यसनमुक्ती आणि स्वामी सेवेचा संकल्प केला आहे. तरुणांना आध्यात्माच्या मार्गाशी जोडण्याचा हा उपक्रम आहे.

  • Que: पुणे ते अक्कलकोट पायी प्रवास किती दिवसांचा आहे?

    Ans: सुमारे २९० ते ३१० किलोमीटरचा हा प्रवास १२ दिवसांचा असून दररोज २० ते २५ किलोमीटरचा टप्पा पार केला जाणार आहे. पालखी सोहळा २४ नोव्हेंबरला अक्कलकोटमध्ये दाखल होणार आहे.

Web Title: The palkhi from pune to akkalkot has set off amidst a devotional atmosphere nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • maharashtra
  • Palkhi Sohala
  • pune news

संबंधित बातम्या

Sugarcane Price Protest: ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल, हेक्टरी १ लाख दुष्काळी मदतीची मागणी
1

Sugarcane Price Protest: ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल, हेक्टरी १ लाख दुष्काळी मदतीची मागणी

Vaishali And Rupali Hotel: शी! पुरुषांच्या टॉयलेटजवळ डोसा, उत्तप्पाचा तवा अन्…; FDA कडून लायसन्स रद्द
2

Vaishali And Rupali Hotel: शी! पुरुषांच्या टॉयलेटजवळ डोसा, उत्तप्पाचा तवा अन्…; FDA कडून लायसन्स रद्द

३५व्या किल्ले स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; महाबळेश्वरमध्ये बालचमूंच्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती
3

३५व्या किल्ले स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; महाबळेश्वरमध्ये बालचमूंच्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती

Water Issue: ‘पाणी द्या, अन्यथा…’ मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अडवले कुणासाठी? नीरा–भीमा, जेऊर बोगद्यांची कामे ठप्प
4

Water Issue: ‘पाणी द्या, अन्यथा…’ मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अडवले कुणासाठी? नीरा–भीमा, जेऊर बोगद्यांची कामे ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.