Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘या’ तारखेला एकदिवसीय संप

महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या २३ नोव्हेंबर २०२६ रोजी संपूर्ण राज्यात एक दिवसीय संप पुकारण्यात येणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 15, 2026 | 05:39 PM
रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी 'या' तारखेला एकदिवसीय संप

रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी 'या' तारखेला एकदिवसीय संप

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी-कॅबचा एकदिवसीय संप
  • डॉ. बाबा कांबळे यांची संपाची घोषणा
  • चालक-मालकांना सहभागी होण्याचे आवाहन
पिंपरी : महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या २३ नोव्हेंबर २०२६ रोजी संपूर्ण राज्यात एक दिवसीय संप पुकारण्यात येणार आहे. आळंदी येथे झालेल्या राज्यव्यापी संयुक्त बैठकीत सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी संपाची अधिकृत घोषणा केली आहे.

 

आळंदी येथील समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळेत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर ही बैठक पार पडली. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, सातारा, सांगली, चंद्रपूर यांसह राज्यातील विविध भागांतील संघटनांचे पदाधिकारी, कायदेशीर सल्लागार आणि हजारो चालक-मालक उपस्थित होते. कर्नाटकातील प्रतिनिधींनीही सहभाग घेतला.

या बैठकीत महाराष्ट्रात सुरू असलेल्या विनापरवाना बाईक टॅक्सी सेवांवर पूर्ण बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑनलाइन ॲप कंपन्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भूमिका मांडण्यात आली. तसेच शासनाने घोषित केलेल्या ऑटोरिक्षा-टॅक्सी-कॅब चालक-मालक कल्याणकारी महामंडळाची तातडीने स्थापना करून आवश्यक आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली.

हे सुद्धा वाचा : शिक्रापूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 13 दुकाने फोडली; गुन्हे शाखेकडून एकाला अटक

परवाना नूतनीकरण, फिटनेस तपासणीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी आणि चालकांसाठी सुरक्षित पार्किंग स्टँड उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. ऑनलाइन कंपन्यांची मनमानी आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे चालक-मालक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांच्या हक्कांसाठी पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रात २३ नोव्हेंबरला तीव्र आंदोलन करण्यात येणार असून, सर्व चालक-मालकांनी संपात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. कांबळे यांनी केले.

हे सुद्धा वाचा : अतुल बोऱ्हाडे आत्महत्या प्रकरणाला गंभीर वळण; पत्नीच्या फिर्यादीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांचा संप कधी होणार आहे?

    Ans: महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी संपूर्ण राज्यात एक दिवसीय संप पुकारला आहे.

  • Que: या संपाची घोषणा कोणी केली आहे?

    Ans: ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी संपाची अधिकृत घोषणा केली आहे.

  • Que: रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत?

    Ans: विनापरवाना बाईक टॅक्सी सेवांवर बंदी, नियम मोडणाऱ्या ऑनलाइन ॲप कंपन्यांवर कारवाई, चालक-मालक कल्याणकारी महामंडळाची स्थापना, परवाना नूतनीकरणातील अडचणी दूर करणे आणि सुरक्षित पार्किंग स्टँड उपलब्ध करून देणे या प्रमुख मागण्या आहेत.

Web Title: Auto rickshaw taxi and cab drivers and owners are set to protest over their pending demands nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • auto rickshaw
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

10 स्वीकृत नगरसेवकांचा तिढा शुक्रवारी सुटणार? भाजपच्या सात जागांसाठी दीडशेहून अधिक इच्छुक
1

10 स्वीकृत नगरसेवकांचा तिढा शुक्रवारी सुटणार? भाजपच्या सात जागांसाठी दीडशेहून अधिक इच्छुक

अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा; पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले
2

अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा; पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले

Amravati News: आमगावात विदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन! ५० प्रजातींचे पक्षी; स्थलांतरित पक्ष्यांचा चार महिने मुक्काम
3

Amravati News: आमगावात विदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन! ५० प्रजातींचे पक्षी; स्थलांतरित पक्ष्यांचा चार महिने मुक्काम

Pune Metro ची सुसाट घोडदौड! आठ दिवसांत तब्बल ‘इतक्या’ लाख प्रवाशांचा प्रवास; वाहतूक कोंडीवर…
4

Pune Metro ची सुसाट घोडदौड! आठ दिवसांत तब्बल ‘इतक्या’ लाख प्रवाशांचा प्रवास; वाहतूक कोंडीवर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.