
crime (फोटो सौजन्य: social media)
दिल्ली:दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अकरावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. तिला जीवे मारण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले. कॅब ड्रॉयव्हरच्या सतर्कतेमुळे यातून १६ वर्षीय मुलीची सुटका झाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी दोन महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर नुह येथील रहिवासी साबीर नावाच्या तरुणाच्या संपर्कात आली होती. वारंवार होणाऱ्या गप्पांमधून त्यांची मैत्री झाली.साबीरने एका मोठ्या कंपनीत काम करत असल्याचा दावा केला. यानंतर, १ नोव्हेंबर रोजी आरोपीने पीडितेला वजीरपूर येथील मित्राच्या फ्लॅटवर भेटण्यासाठी बोलावले. आरोपीने मुलीला त्याच्या फ्लॅटमध्ये नेले, तिला जीवे मारण्याची धमकी दिली, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि मोबाईल फोनवर तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो बनवले, असा आरोप आहे. आरोपीने विद्यार्थिनीला व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले आणि तिला पुन्हा काश्मिरी गेट परिसरात भेटण्यासाठी बोलावले.
कॅब ड्रॉयव्हरला संशय आणि…
ती काश्मिरी गेट परिसरात आली आणि आरोपीने मुलीला त्याच्या कॅबमध्ये कमला नगरमधील एका हॉटेलमध्ये नेले. दरम्यान, कॅब ड्रायव्हरला त्याच्यावर संशय आला आणि त्याने त्यांना हॉटेलमध्ये सोडल्यानंतर तो थेट जवळच्या रूप नगर पोलिस स्टेशनमध्ये गेला. तिथे कॅब ड्रायव्हरने पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि ते ताबडतोब हॉटेलमध्ये पोहोचले.
आरोपी अटकेत
पोलिसांनी हॉटेलमधून आरोपी साबीर याला अटक केली. पोलिसांनी मुलीला त्याच्या ताब्यातून सोडवले आणि तिच्या कुटुंबाला या घटनेची माहिती दिली. पोलीस पुढील तपास करत असून कारवाई करत आहे.
पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
Ans: वजीराबाद
Ans: ड्रायव्हर
Ans: अकरावी