Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur Accident: महाशिवरात्रीची यात्रा ठरली दुर्दैवी! दर्शनाहून परतताना वाहन पलटी; एकाच मृत्यू तर १७ जखमी

महाशिवरात्रीनिमित्त दर्शनावरून परतताना मालवाहू वाहन पलटी होऊन चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा मृत्यू झाला, तर १७ प्रवासी जखमी झाले. यापैकी १२ जणांची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 16, 2026 | 10:57 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दर्शनावरून परतताना वाहनाचा अपघात
  • एका १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
  • एकूण १७ जण जखमी, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
चंद्रपूर: चंद्रपूर येथून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. महाशिवरात्री निमित्ताने महादेवाचे दर्शन करून परत येताना भाविकांच्या गाडीवर काळानं घात केला. भाविनकांची वाहन परत येतांना पलटी झाल्याने अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून १७ प्रवासी जखमी झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील पाटाळा जवळ ही दुर्दैवी घटना घडली.

Nanded Crime: पूर्व वैमानस्यातून रक्तरंजित शेवट! १६ वर्षीय मुलाची खंजीराने हत्या; नांदेडमध्ये खळबळ

कसा झाला अपघात?

पाटाळा परिसरातील शिवभक्त मालवाहक वाहनातून भटाळा येथे त्रिशूल घेऊन दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यानंतर ते पाटाळा जवळील राळेगाव येथील जगन्नाथ मठावर दर्शनासाठी जात होते. त्यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात भूषण विजय दोडके (वय १७, रा. पाटाळा) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. यात एकूण १७ जण जखमी झाले आहेत. यापैकी १२ जण गंभीर जखमी आहेत तर ५ जण किरकोळ जखमी झाले आहे. गंभीर जखमींवर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. माजरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन वाहनाचा पंचनामा करून पुढील तपास करीत आहेत.

गंभीर जखमी प्रवाश्यांचे नाव

या अपघातातील जखमींची नावे मयूर वनशिंगे (१६), राजू किसन शिवरकर (४२), राजू जाधव (४०), मंथन डाहूले (१३), लकी भडके (२०), नानाजी मरस्कोल्हे (७०), गणेश खापणे (४०), मारोती शिवरकर (४५), विनोद गौरकर (५०), रोशन माडवे (१७), मारोती बदखल (५०) आणि सोहम भोयर (१६) या १२ जणांचा समावेश असून त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

तर किरकोळ जखमींमध्ये प्रवीण आवारी, गुरुवेश राजेश जाधव (१४), ओंकार शिवशंकर मांढरे (९), प्रतीक पारखी आणि रोहित झाडे असे नावे आहेत.

Nagpur Crime: नागपुर हादरलं! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी

तीन वर्षांचे प्रेम, मात्र लग्न दुसऱ्याशी; प्रियकराने नवऱ्याला ते फोटो पाठवले आणि…

चंद्रपूर येथून एक धक्कादायक प्रकार समोर आले आहे. एका तरुणाने प्रेयसीच्या होणाऱ्या नवऱ्याला व्हॉट्सअॅपद्वारे फोटो पाठवले त्यामुळे तरुणीचा विवाह देखील मोडीत निघाला आहे. संतापलेल्या कुटुंबीयांनी फोटो पाठवणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केली आहे. तरुणाला आधी दोरीने बांधलं नंतर त्याला बेदम मारहाण केली. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी बाळापूर येथील आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: किती जण जखमी झाले?

    Ans: एकूण १७ जण जखमी झाले, त्यापैकी १२ जण गंभीर आहेत.

  • Que: मृत व्यक्ती कोण?

    Ans: १७ वर्षीय भूषण विजय दोडके यांचा मृत्यू झाला.

  • Que: अपघाताचे कारण काय?

    Ans: चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.

Web Title: Chandrapur accident mahashivratri yatra turned out to be unfortunate vehicle overturned while returning from darshan one dead 17 injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

घृणास्पद! ४ वर्षीय निष्पाप जीवाचा काय दोष? अपहरण करून अत्याचार, जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह ; नराधम अटकेत
1

घृणास्पद! ४ वर्षीय निष्पाप जीवाचा काय दोष? अपहरण करून अत्याचार, जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह ; नराधम अटकेत

Nagpur Crime: जन्मदात्या वडिलानेच केले पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत
2

Nagpur Crime: जन्मदात्या वडिलानेच केले पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

Ketan Agrawal Muder Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड; चेतन चौधरीने लोहगडावर केलं सीन रिक्रिएशन, पुतळा दरीत ढकलला
3

Ketan Agrawal Muder Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड; चेतन चौधरीने लोहगडावर केलं सीन रिक्रिएशन, पुतळा दरीत ढकलला

Ketan Agarwal Muder Case: केतन-सियाच्या कुटुंबाचा आनंदी डान्स व्हिडिओ व्हायरल; हत्याकांडानंतर जुन्या आठवणींनी डोळे पाणावले
4

Ketan Agarwal Muder Case: केतन-सियाच्या कुटुंबाचा आनंदी डान्स व्हिडिओ व्हायरल; हत्याकांडानंतर जुन्या आठवणींनी डोळे पाणावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.