
crime (फोटो सौजन्य: social media)
दिल्ली: दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राच्या दुसऱ्या लग्नावरून दोन्ही मित्रांमध्ये मोठा वाद झाला. हे भांडण एवढं वाढलं की दोघांनी एकमेकांवर चाकूने हल्ला केला. काय घडलं, नेमकं प्रकरण काय? चला जाणून घेऊया.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणाचं नाव जगदीश असे आहे. त्याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याच्या वैवाहिक जीवनात बऱ्याच अडचणी होत्या. पती आणि पत्नीमध्ये सतत वाद व्हायचे. याच कारणामुळे, जगदीशने आपल्या पत्नीला तिच्या माहेरी सोडून येण्याचा निर्णय घेतला. तो ६ ऑक्टोबर रोजी आपल्या पत्नीला तिच्या माहेरच्या घरी सोडून पुन्हा ७ ऑक्टोबर रोजी दिल्लीला परत आला.
Haryana Crime: तापाच्या बहाण्याने नवऱ्याला माहेरी बोलावलं, नंतर प्रियकरासह गळा आवळून केली हत्या
त्यांनतर त्याने त्याच्या मित्राला आपल्या वैवाहिक आयुष्यातील अडचणींबद्दल सांगितलं. आनंदी जीवनासाठी त्याची दुसरं लग्न करण्याची इच्छा असल्याचं त्याने त्याच्या मित्राला सांगितलं. त्यावेळी जगदीशसाठी मित्र दिपकने चांगली मुलगी बघणार असे सांगितले. मात्र त्याला या कामासाठी पैसे लागतील असे म्हंटले. पीडित जगदीशने चांगली मुलगी मिळणार या आनंदात आपल्या मित्राला ३० हजार रुपये दिले. संध्याकाळी आणखीन ३० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. एकूण 60 हजार रुपये दिल्यानंतर, जगदीश लग्नासाठी चांगली मुलगी मिळणार या आशेत होता.
मात्र, ७ ऑक्टोबरला संध्याकाळी जवळपास ११ वाजताच्या सुमारास दीपकने जगदीशला रिठाला बस स्टँडजवळ बोलवलं. जगदीश तिथे पोहोचला आणि त्याने दिपकला मुलीबद्दल विचारले. तेव्हा आरोपी दीपक यावर प्रचंड संतापला. दरम्यान, दिपकने रागाच्या भरात चाकू बाहेर काढला आणि जगदीशच्या छातीवर वार केला. हल्ल्यानंतर, जगदीशने आपला छातीत रुतलेला चाकू बाहेर काढला आणि त्याच चाकूने दिपकवर हल्ला केला. यात दिपकसुद्धा गंभीर जखमी झाला आणि तो घटनास्थळावरून फरार झाला.
आरोपींवर गुन्हा दाखल
या घटनेबाबत स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आहे. त्यानंतर, पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या जगदीशला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी आरोपी दिपकवर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 109 (1) अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच जगदीशवर सुद्धा धोकादायक शस्त्राने जखम पोहोचवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपकला 10 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. संबंधित घटना ही ७ ऑक्टोबर रोजी रात्री रिठाला बस स्टँडजवळ घडली. सध्या, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.
Ans: रिठाला
Ans: दीपक
Ans: दुसरं लग्न ठरवण्यासाठी