crime (फोटो सौजन्य: social media)
मुंबईच्या विरार पेशींचीम येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. एका डिलिव्हरी बॉयने बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये लघवी केली. हे कृत्य बिल्डिंगच्या लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेर्यात कॅमेऱ्यात कैद झाले. बिल्डींगच्या रहिवाशांनी या प्रकरणानंतर चांगलाच चोप दिला आहे. यानंतर त्याने पोलिसांच्या स्वाधीन केले. याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले आहे. ही घटना विरार पश्चिमेतील सीडी गुरुदेव बिल्डिंग येथे सोमवारी घडली.
नेमकं काय घडलं?
तर घडलं असं की, लिफ्टमध्ये सोसायटीतील लोकांना घाणेरडा वास येत होता. त्यामुळे सोसायटीतील लोकांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांना एक डिलिव्हरी बॉय लिफ्टमध्ये एकटाच होता. लिफ्ट सुरू झाल्यावर तो आधी इकडे-तिकडे पाहूलागला आणि मग लिफ्टच्या भिंतीला टेकून त्याने लघवी केली असं दिसलं. हे अतिशय घाणेरडे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. यानंतर रहिवाश्यांनी त्याला पकडले आणि फटकारले तेव्हा सुरुवातीला डिलिव्हरी बॉयने हे घाणेरडे कृत्य केल्याचे नाकारले. मात्र, काही लोकांनी त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवले आणि त्याला मारहाण केली. तेव्हा त्याने हे कृत्य केल्याचे कबुल केले.
गुन्हा दाखल
यानंतर रहिवाश्यांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी विरार पश्चिमच्या बोलिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा डिलिव्हरी बॉय ब्लिंकिटसाठी काम करतो.
Vasai Crime : चाकूचा धाक दाखवत अपहरण, मात्र गावकऱ्यांनी डाव उधळला
दरम्यान, मुंबईच्या वसई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळकरी मुले शाळेतून सुट्टी झाल्यावर घरी जात असतांना चाकूचा धाक दाखवत ३ तृतीयपंथांनी मुलांचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा डाव गावकऱ्यांनी उधळून लावला आहे. हे तिघे तृतीयपंथी नसून पुरुष होते. यांच्या सोबत १ रिक्षा चालक देखील होता. गावकऱ्यांनी या चौघांना बेदम मारहाण केली आहे.
नेमकं काय प्रकरण?
तृतीयपंथीयांचा वेश घेवून तीन पुरुष गावात आले होते. त्यांच्यासोबत एक रिक्षा चालक देखील होता. गावातल्या मुख्य रस्त्या लगत चालत शाळेतून मुलं घरी येत होते. त्यावेळी त्यांना चाकूचा धाक दाखवण्यात आला. शिवाय रस्त्यात अडवून पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी मुलांनी आरडाओरडा केला. त्यामुळे गावकरी सावध झाले. त्यांनी त्या मुलांच्या दिशेने धाव घेतली. या मुलांची त्यांच्या तावडीतून सुटका केली. सुटका करण्यात आलेल्यांमध्ये तीन मुली आणि एका मुलाचे समावेश होते. ही घटना वसई पश्चिमेच्या खोचिवडे गावातील कुरणवाडी इथे घडली आहे.
सुटका केल्यानंतर संतप्त जमावाने या चारही आरोपींना बेदम मारहाण केली. त्यानंतर वसई पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसही त्या ठिकाणी पोहोचले. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धक्कादायक ! बागेतच अल्पवयीन मुलावर नराधमाकडून अनैसर्गिक अत्याचार; चॉकलेटचं आमिष दाखवलं अन्…