धक्कादायक ! बागेतच अल्पवयीन मुलावर नराधमाकडून अनैसर्गिक अत्याचार; चॉकलेटचं आमिष दाखवलं अन्...
चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे प्रकार घडत आहेत. असे असताना आता चंद्रपुरात धक्कादायक घटना उघडकीस आली. वरोरा शहरातील जुन्या नगरपरिषद समोरील तलावामधील उद्यानात चॉकलेटचे आमिष दाखवून सहा वर्षीय बालकावर नराधमाने अनैसर्गिक अत्याचार केला. ही घटना सोमवारी (दि.21) रात्री साडेआठच्या सुमारास समोर आली.
साहिल सुरेंद्र तेलंग (रा. साई मंगल कार्यालय, वरोरा) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी साहिलवर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. वरोरा शहरातील गांधी तलाव येथे काही वर्षाआधी रोटरी क्लबद्वारे तलावाच्या मधोमध उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर काही महिने हे उद्यान रोटरी क्लबने चालवल्यानंतर नगरपरिषदेला हस्तांतर करण्यात आले. नगर परिषदेच्या दुर्लक्षितपणामुळे या तलावातील उद्यानात अनैसर्गिक कृत्य करणारे व्यसनाधीन मुले-नागरिकांचा येथे वावर असतो.
हेदेखील वाचा : Sangali Girl Suicide: आटपाडीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; बाबर यांच्यासह पडळकर बंधुंच्या हस्तक्षेपाचा आरोप
दरम्यान, सोमवारी रात्री साडेआठच्या दरम्यान साई मंगल कार्यालय येथील साहिल सुरेंद्र तेलंग या आरोपीने एका लहान मुलावर अनैसर्गिक कृत्य केले. ही घटना तेथील काही नागरिकांना माहीत होताच नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप देत पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल
पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ही कारवाई चंद्रपूर शहर पोलिसांनी केली.
शहरात संतापाची लाट
बालकावर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस येताच वरोरा शहरात संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि बालहक्क संरक्षण समित्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी केली जात आहे.
हेदेखील वाचा : Jalgao crime news: महिलेला घरी सोडतो म्हणत नेले निर्जन जंगलात; आळीपाळीने केला तिघांनी लैंगिक अत्याचार; जळगाव हादरला!
जालन्यात महिलेवर सामूहिक अत्याचार
दुसऱ्या एका घटनेत, जालना जिल्ह्यात ३५ वर्षीय महिला आपल्या लहान मुलासह रात्रीच्या सुमारास जात होती. त्यावेळी तिला घरी सोडतो, असे म्हणत दुचाकीवरून जंगलात नेले. तेथे तिघांनी मिळून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. ही घटना भुसावळ तालुक्यातील ग्रामखेडी रोडवर घडली.