Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बिग बॉस मराठी’ फेम रिलस्टार दिव्या शिंदेला दिलासा; कोर्टाने केला जामीन मंजूर

याबरोबरच तक्रारदार किंवा प्रत्यक्षदर्शींना भेटण्याचा, संपर्क करण्याचा किंवा प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नये. न्यायलयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये. पोलिसांना तपासात सहकार्य करावे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 16, 2026 | 12:29 PM
दिव्या शिंदेचा जामीन मंजूर

दिव्या शिंदेचा जामीन मंजूर

Follow Us
Follow Us:
  • दिव्या शिंदेचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने मंजूर
  • निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
  • बिग बॉसमधून पण हाकलं होतं
पुणे : ‘बिग बॉस मराठी‘ फेम रिलस्टार दिव्या शिंदेचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने मंजूर केला. तिच्यावर इतर साथीदारांसह निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आणि पाच लाख रूपये मागितल्याचा आरोप आहे. मागील महिन्यात २६ तारखेला तिला अटक करण्यात आली होती. दोन तारखेपासून ती न्यायालयीन कोठडीत आहे. 50 हजार रूपयांचा जातमुचलका आणि तेवढ्याच किंमतीच्या हमीवर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस डी कुलकर्णी यांनी जामीन मंजूर केला.

याबरोबरच तक्रारदार किंवा प्रत्यक्षदर्शींना भेटण्याचा, संपर्क करण्याचा किंवा प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नये. न्यायलयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये. पोलिसांना तपासात सहकार्य करावे. यासह इतर अटींवर जामीन मंजूर करण्यात आला. तपासाचा बहुतांश भाग पूर्ण झाला आहे. तक्रारदार रूग्णालयात असला तरी धोक्याबाहेर आहे. तक्रारदार आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले आहेत. तक्रारदार आणि कुटुंबाच्या जबाबानुसार दिव्याने स्वतः मारहाण केली नाही. याबरोबरच तिची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याच्या बाबी लक्षात घेत जामीन मंजूर करण्यात आला. दिव्याची बाजू अ‍ॅड. सुभाष हुल्याळकर यांनी मांडली. त्यांना ॲड जावेद जमादार यांनी सहाय्य केले.

दरम्यान, बिग बॉस मराठीमधून प्रसिद्ध झालेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदे पुन्हा वादात सापडली असून, यंदा ती मोठ्या प्रकरणामध्ये अडकली आहे. आता मात्र पुणे पोलिसांनी तिला अटक करण्यात आली. एका निवृत्त सरकारी डॉक्टरांच्या घरी घुसून त्यांना मारहाण करून खंडणी मागितल्याचा आरोप तिच्यावर असून काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तिला पकडून कोर्टात हजर केली.

बिग बॉसमधून पण हाकलं होतं

दिव्या शिंदे आधी रील्समुळे फेमस झाली होती. तिच्या रील्स खूप व्हायरल व्हायच्या, त्यामुळेच तिला बिग बॉस मराठीमध्ये जायची संधी मिळाली होती.पण बिग बॉसच्या घरात पण तिचं वागणं वादग्रस्तच होतं. फेब्रुवारी 2026 मध्ये तिने घरातल्या इतर स्पर्धकांना धमकावलं म्हणून तिला शो मधून बाहेर काढलं होतं. तेव्हा पण ती खूप चर्चेत आली होती.आता या खंडणी आणि मारहाणीच्या केस मुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. एक सोशल मीडिया स्टार असं कृत्य कसं करू शकते, यावर लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.सध्या काळेपडळ पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कोर्ट तिला काय शिक्षा देतंय हे बघावं लागेल.

Web Title: Divya shindes bail granted nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 12:29 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.