
crime (फोटो सौजन्य: social media)
ठाणे: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथून हत्येची एक धक्कदायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून वाद झाला आणि या वादातून हत्या झाली. हत्या झालेला व्यक्ती हा मुंबईतील कॉल सेंटरमध्ये कर्मचारी आहे. त्याचे नाव आकाश सिंग असे आहे. आकाशावर धारधार शास्त्राने वार करत संपवण्यात आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Crime News: वारसा नोंद करण्यासाठी लाच मागितली अन् तलाठी फसला; ACB ने थेट…
काय घडलं नेमकं?
आकाश सिंग हा तरुण कामावरून सुट्टी घेऊन डोंबिवलीला आला होता. शनिवारी रात्री सुमारे १ वाजता तो हॉटेलमधून बाहेर पडला. तेव्हा त्याचा हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या एका अनोळखी तरुणाला किरकोळ धक्का लागला. हा किरकोळ धक्का लागल्यामुळे त्या दुसऱ्या तरुणाने तात्काळ आकाश सिंगसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
हा वाद इतका वाढला की, संतप्त झालेल्या त्या तरुणाने आपल्या साथीदारांना त्वरित घटनास्थळी बोलावून घेतले. त्याचे साथीदार येताच, त्यांनी कोणताही विचार न करता आकाश सिंगवर हल्ला चढवला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यात जागीच त्यांचा मृत्यू झाला. या हल्य्यास आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळून गेले.
या घटनेमुळे मानपाडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी धाव घेतली. पंचनामा केल्यांनतर पोलिसांनी हत्येचा (कलम ३०२) गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी हॉटेल परिसरातील आणि रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तातडीने जप्त केले. त्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे आणि त्यांच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न वेगाने सुरु आहेत. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत.
धक्कादायक! मैत्रिणीशी भांडण झालं, रागाच्या भरात १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीला जाळलं
ठाण्यातून एक संतापजनक आणि धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनने ठाणे शहर हादरून गेला आहे. एका १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीसोबत झालेल्या वादामुळे तिला पेटवून दिल्याचे समोर आले आहे. या घटनेत मुलगी ८० टक्के भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. कापूरबावडी पोलिसांनी याप्रकरणात १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.
कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. यापूर्वी ती मुंबईतील चेंबूर भागात कुटुंबासोबत वास्तव्यास होती. त्यावेळी तिची ओळख त्या भागात राहणाऱ्या एका मुलासोबत झाली होती. काही दिवसांपूर्वी मुलगी भाऊबीज निमित्ताने चेंबूर येथे गेली होती. त्या दरम्यान मुलाने तिच्यासोबत वाद घालून तिला मारहाण केली. तिच्या नातेवाईकांना याबाबत माहिती मिळताच, तिच्या बचावासाठी ते गेले. त्यांनी त्या मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने मुलीला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. या प्रकरणानंतर मुलगी खूप घाबरली होती.
Ans: डोंबिवली
Ans: आकाश
Ans: पोलिस