Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: Instagram मुळे घर सोडलं, राजस्थानमध्ये नेऊन कामाला लावलं; 3 महिन्यांनी मुंबई पोलिसांनी 14 वर्षीय मुलाची सुटका

मुंबईयेथे वडिलांच्या ओरडण्यामुळे घर सोडून गेलेल्या 14 वर्षीय मुलाचे अपहरण झाले. मुंबई पोलीस यांनी तांत्रिक तपास करत तीन महिन्यांनी सिरोही येथे छापा टाकून मुलाची सुटका केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 10, 2026 | 03:06 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मुंबईमधील 14 वर्षीय मुलगा वडिलांच्या ओरडण्यामुळे घर सोडून निघाला.
  • चर्चगेटहून दोन जणांनी फसवून त्याला गुजरातमार्गे सिरोही येथे नेले.
  • मुंबई पोलीस यांनी तांत्रिक तपास करून तीन महिन्यांनी मुलाची सुटका केली.
मुंबई: मुंबईतील दिंडोशीमधून १४ वर्षीय मुलगा आई वडील ओरडले म्हणून घरा बाहेर पडला होता. तो सतत मोबाईल वर रील्स बघत असायचा. त्याला वडील ओरडले म्हणून त्याने रागा रागात घर सोडल आणि तो गायब झाला. मात्र हा मुलगा घर सोडून आला आहे हे हेरून त्या मुलाच अपहरण करण्यात आल. मुंबई पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली. अपहरणाची केस आहे हे लक्षात येता मुंबई पोलिसांनी चक्र फिरवली आणि तब्बल तीन महिन्यानंतर त्या मुलाचा शोध लागतो. तो पोलिसांना थेट राजस्थानात मिळाला. तिथे त्याला एका कामाला जुंपण्यात आल होत. मात्र पोलिसांनी एकदम फिल्मी स्टाइल तपास केला.

Bihar Crime: शिक्षकानेच अल्पवयीन विद्याथीनिवार केला लैंगिक अत्याचार; पुस्तके दाखवण्याच्या बहाण्याने गेला आणि…

गोरेगावच्या रेल्वे स्थानकात दिसला…

तो घरातून बाहेर पडल्यावर गोरेगाव रेल्वे स्थानकात आला. फेस रिकॉग्निशन सिस्टममध्ये तो कैद झाला. त्या नंतर तो मरीन लाईन्स मध्ये आला. चर्चेगेटला आल्यावर त्याला दोघे जण हेरतात आणि त्याला फसवून चर्चगेट मधून थेट गुजरातच्या दिशेने घेवून जातात. पोलिसांनी अतिशय टेक्निकल पद्धतीने त्यांचे मोबाईल नंबर मिळवले आणि त्या नंतर त्यांचे लोकेशन शोधून काढले. जेव्हा माहिती मिळाली तेव्हा ते केटरिंग व्यवसायाला मूल पुरवतात ही माहिती समोर अली. चक्क या मुलाचा यांनी सौदा केला आणि त्याला राजस्थानला घेवून गेले. पोलिसांनी थेट राजस्थान मध्ये धाड टाकली आणि या मुलाला ताब्यात घेवून मुंबई मध्ये दाखल झाले. तब्बल तीन महिन्यानंतर त्यांना त्यांचा मुलगा मिळाला .त्याला राजस्थान मध्ये सिरोही मध्ये नेण्यात आल आणि एका केटरिंग कामाला जुंपण्यात आल होत.

मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांचा आदेश!

मुलगा गायब झाल्यानंतर पोलीस ठाण्यात अपहरण तक्रार देण्यात आली. दोन महिने उलटून गेले तरी मात्र मुलाचा शोध लागत नव्हता. मुलाच्या आठवणीत आई वडील व्याकुळ होवून गेले होते. त्यांनी मुंबई चे पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली आणि त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्या नंतर त्यांनी गुन्हे शाखेला हे प्रकरण वर्ग केल आणि तपास करायला सांगितल. त्याला अखेर तीन महिन्यानंतर मुंबई पोलिसांनी सुखरुप घरी दाखल केल. मुलाला पाहताच आई वडील भावुक झाले होते.

Porsche Car Accident प्रकरणातील विशाल अग्रवालला दिलासा? सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुलगा कसा गायब झाला?

    Ans: मोबाईलवर रील्स पाहण्यावरून वडिलांनी ओरडल्यामुळे तो रागात घर सोडून बाहेर पडला.

  • Que: मुलाला कुठे नेण्यात आले होते?

    Ans: अपहरणकर्त्यांनी त्याला गुजरातमार्गे Sirohi येथे नेऊन केटरिंग कामाला लावले होते.

  • Que: मुलाची सुटका कशी झाली?

    Ans: Mumbai Police यांनी फेस रिकग्निशन आणि मोबाईल लोकेशनच्या मदतीने तपास करून राजस्थानमध्ये छापा टाकत मुलाची सुटका केली.

Web Title: Mumbai crime left home due to instagram taken to rajasthan and put to work mumbai police rescue 14 year old boy after 3 months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
1

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
2

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
3

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.