
हुंड्यासाठी विवाहितेला खोलीत कोंडून सासरच्यांनी सोडला साप (Photo Credit- X)
कर्नलगंज येथे राहणाऱ्या रेशमाचे लग्न १९ मार्च २०२१ रोजी शहनवाज खान उर्फ अयानसोबत झाले होते. लग्नानंतर काही दिवस सर्वकाही सुरळीत होते, मात्र नंतर सासरच्यांनी हुंड्यासाठी तिचा छळ सुरू केला. सुरुवातीला घर बांधण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यावेळी रेशमाच्या कुटुंबीयांनी तिच्या सासूच्या बँक खात्यात दीड लाख रुपये जमा केले.
🚨📍कानपुर से हैरान करने वाली घटना! दहेज न मिलने पर विवाहिता को कमरे में बंद कर सांप छोड़ दिया गया 🐍
⚠️ सांप के काटने से महिला गंभीर रूप से घायल
👮 पीड़िता की बहन की तहरीर पर पति समेत 7 ससुराल वालों पर मुकदमा दर्ज@Uppolice @kanpurnagarpol#Kanpur #Dowry #crime pic.twitter.com/UCkofDTPJ6 — Greater Kanpur (@GreaterKanpur) September 21, 2025
त्यानंतरही पती अयान, सासू शमशाद बेगम, सासरे उमर, दीर इमरान आणि नणंदा आफ्रिन, अमरीन, समरीन यांनी रेशमाला मानसिक आणि शारीरिक त्रास देणे सुरू ठेवले. त्यांनी कमी हुंडा मिळाल्याचा टोमणा मारत आणखी पाच लाख रुपयांची मागणी केली.
१९ सप्टेंबर रोजी रात्री रेशमाला तिच्या तीन वर्षांच्या मुलीपासून वेगळे करून पतीने आणि सासरच्यांनी एका खोलीत बंद केले. पहाटे पाच वाजता रेशमाच्या बिछान्यावर एक काळा साप दिसला. काही कळण्याआधीच सापाने तिच्या उजव्या पायाला दंश केला. ती वेदनेने किंचाळत होती आणि मदतीसाठी दरवाजा ठोठावत होती, मात्र सासरची मंडळी हसत होती. काही वेळाने त्यांनी दार उघडले असता रेशमाने तेथून पळ काढला.
तिने कशातरी तिच्या माहेरी धाव घेतली. तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. कर्नलगंज पोलिसांनी याप्रकरणी रेशमाच्या बहिणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. सध्या रेशमावर रुग्णालयात उपचार सुरू असून, तिचा जबाब नोंदवल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.