Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…

माथेरान शहरात 16 जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास छत्रपती शिवाजी रोड परिसरात झालेल्या चोरी प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 27, 2026 | 09:43 PM
माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत

माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत

Follow Us
Follow Us:
  • माथेरान पोलिसांची दमदार कामगिरी
  • माथेरानमधील तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत
  • 2 आरोपीना अटक; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
संतोष पेरणे/ माथेरान: माथेरान शहरात 16 जानेवारी रोजी शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास छत्रपती शिवाजी रोड परिसरातील वन ट्री हिल पॉइंटजवळ असलेल्या कदम टी स्टॉलमध्ये थरारक जबरी चोरीची घटना घडली होती.

या दरोडा प्रकरणी माथेरान पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला कर्जत पोलिस ठाणे आणि नेरळ पोलिस ठाणे येथील तपासी पथकाने तांत्रिक तपास करीत या गुन्ह्याची उकल केली आहे. दरम्यान तब्बल पाच लाख 60 हजाराचा ऐवज तपासी पथकाने एकाला नवी दिल्लीतून तर दुसऱ्याला उत्तर प्रदेश मधून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे अशी माहिती पोलिस जिल्हा पोलिस उप अधीक्षक राहुल गायकवाड यांनी दिली.

Sangli Zilla Parishad: पंचायत समिती सभापती-उपसभापती निवड १० मार्चला; जिल्हाधिकाऱ्यांकडून अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती

माथेरान मधील शिवाजी महाराज रोड येथील कदम टी स्टॉल येथे रात्रीचा वेळी चार अज्ञात चोरट्यांनी सिगारेट पाहिजे या बहाण्याने दुकानात प्रवेश करत चाकू–सुऱ्याचा धाक दाखवून दुकानमालक नारायण मारुती कदम आणि त्यांच्या पत्नी चंदा नारायण कदम यांना दोराने बांधून ठेवले. त्यानंतर घरातील सुमारे एक लाख रुपये रोख तसेच सात ते आठ तोळे सोन्याचे दागिने लंपास करून चोरटे फरार झाले होते. कदम टी स्टॉल आणि त्यांचे घर एकाच ठिकाणी असल्याने नारायण कदम हे पत्नीसमवेत तेथेच वास्तव्यास आहेत. दुकान बंद करून दाम्पत्य घरी बसले असताना चार चोरटे दुकानात शिरले. काही क्षणांतच त्यांनी चाकू–सुऱ्याचा धाक दाखवत दोघांनाही बांधून घरात शोधाशोध केली आणि मौल्यवान ऐवज घेऊन पोबारा केला होता.

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीत यांचे विषयी काहीएक सुगावा नसताना गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणादवारे आरोपीत याचा उप विभागातील कर्जत, नेरळ, माथेरान पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी शोध घेवुन आरोपी पुष्पेन्दर राम धुलारी याला दिल्ली येथे यांस त्याच्या राहत्या घरातुन ताब्यात घेतले.त्याच्याकडे गुन्हयांचे अनुषंगाने कसुन चौकशी केली असता त्याने त्याचा साक्षीदार आरोपी वसीम महमद मेवाती, शिवम् बालवीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.वकील बली मोहंमद मेवाती याला अलीगड राज्य उत्तर प्रदेश यांचेसह माथेरान पोलिसांनी ताब्यात घेतले.

Ahilyanagar News: जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत लॉंग मार्च सुरूच, डॉ. नवले यांचा सरकारला इशारा

या गुन्ह्याचा तपास मध्ये माथेरान पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सरिता मुसळे यांच्यासह कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुशांत वरक तसेच नेरळ पोलिस ठाण्याचे आशू बेंद्रे, राजाभाऊ केकान,माथेरान पोलिस ठाण्याचे दामोदर खतेले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या कारवाईची माहिती जिल्हा पोलिस उप अधीक्षक राहुल गायकवाड यांनी कर्जत येथे घेतलेले पत्रकार परिषदेत दिली.माथेरान पोलीस ठाणेकॉ.गु.रजि. नंबर ०१/२०२५, बि.एन.एस. २०२३ चे कलम ३०९ (४) ३३१ (४) हा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानंतर आरोपीत याना गुन्हाचे कामी अटक करून न्यायालयात हजर केले असता या सर्व आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Matheran news businessman couple robbed in matheran police arrest two suspects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 09:43 PM

Topics:  

  • crime news
  • Matheran
  • matheran news

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.