Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील निंबूत गावाच्या परिसरात ओढ्यालगत सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 28, 2026 | 12:30 AM
निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Follow Us:
  • निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा
  • तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
  • हातभट्टी दारू निर्मितीला आळा बसणार
वडगाव निंबाळकर : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील निंबूत गावाच्या परिसरात ओढ्यालगत सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ३ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार प्रमोद प्रकाश नवले (रा. लक्ष्मीनगर, निंबूत, ता. बारामती, जि. पुणे) हा बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. कारवाईदरम्यान ३ लोखंडी बॅरलमध्ये कच्चे रसायन, जमिनीत खोदलेल्या खड्ड्यात साठवलेले कच्चे रसायन, २ प्लास्टिक टाक्या, २४ नग (प्रत्येकी ३५ लिटर क्षमतेची) हातभट्टी गावठी दारू, ४ विद्युत मोटार पंप तसेच इतर साहित्य असा एकूण ३,५९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल (पुणे ग्रामीण), अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर दारू निर्मितीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा : बारामती नगरपरिषदेचा 551 कोटी 73 लाखांच्या खर्चाचा अर्थसंकल्प सादर; नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर

‘एएनटीएफ’चा जोरदार धडाका

राज्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीला आणि सेवनाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्सने (एएनटीएफ) अल्पावधीतच कात टाकत धडाकेबाज कामगिरी बजावण्यास सुरूवात केली आहे. राज्यभरात पथकाने काही महिन्यांत तब्बल २१ गुन्हे उघडकीस आणले असून, ४४ आरोपींना अटक देखील केली आहे. या कारवाईत अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात हे टास्क फोर्स ड्रग्ज तस्करांसाठी ‘काळ’ बनणार आहे.

Web Title: Police have taken a major action by raiding hatbhatti liquor bar in pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Pune Crime : आळेफाट्यात बेकायदा दारू विक्रीवर पोलिसांचा छापा, एकाला अटक; तब्बल…
1

Pune Crime : आळेफाट्यात बेकायदा दारू विक्रीवर पोलिसांचा छापा, एकाला अटक; तब्बल…

पैशाच्या जुन्या वादातून रक्तरंजित संघर्ष, करडे घाटातील गोळीबारात सराईताची हत्या; एक जण गंभीर जखमी
2

पैशाच्या जुन्या वादातून रक्तरंजित संघर्ष, करडे घाटातील गोळीबारात सराईताची हत्या; एक जण गंभीर जखमी

30 हून अधिक घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी पाठलाग करुन पकडले
3

30 हून अधिक घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी पाठलाग करुन पकडले

आरोपी दिसताच फुगेवाडीकरांचा संताप अनावर! सीआयडीच्या ताफ्यासमोर गोंधळ, दगडफेकीचाही प्रयत्न
4

आरोपी दिसताच फुगेवाडीकरांचा संताप अनावर! सीआयडीच्या ताफ्यासमोर गोंधळ, दगडफेकीचाही प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.