Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: ‘अंतर ठेवा’ म्हणताच संतापला; पाठलाग, वाद अन् अचानक धडक,महिला बाईकरसोबत धक्कादायक प्रकार

आधी फक्त अंतर ठेवण्यास सांगितले, पण काही क्षणांतच परिस्थिती इतकी बिघडली की महिला बाईकर थेट रस्त्यावर फेकली गेली. कारने धडक दिल्यानंतर चालक थांबला नाही; या घटनेचा VIDEO आता सोशल मीडियावर संतापाची लाट निर्माण करत आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 14, 2026 | 12:08 PM
Accident News: ‘अंतर ठेवा’ म्हणताच संतापला; पाठलाग, वाद अन् अचानक धडक,महिला बाईकरसोबत धक्कादायक प्रकार

Accident News: ‘अंतर ठेवा’ म्हणताच संतापला; पाठलाग, वाद अन् अचानक धडक,महिला बाईकरसोबत धक्कादायक प्रकार

Follow Us
Follow Us:
  • महिला बाईकरला कारची जोरदार धडक
  • धडकेनंतर कारचालक घटनास्थळावरून फरार
  • गुरुग्राम पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी
गुरुग्राम : गुरुग्रामच्या गोल्फ कोर्स रोडवर महिला स्पोर्ट्स बाईकरला कारने जोरदार धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ बाईकरच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. धडक दिल्यानंतर कारचालक घटनास्थळी न थांबता फरार झाल्याचा आरोप आहे. ‘rebelwheels_sia_’ या नावाने सोशल मीडिया पेज चालवणारी सिया ही महिला रायडर तिच्या रायडिंग ग्रुपसोबत जात होती. तिच्याकडे Aprilia RS 457 ही स्पोर्ट्स बाईक होती. सियाच्या माहितीनुसार, एका कारमधील काही तरुण सुरुवातीपासूनच तिचा पाठलाग करत होते. कार अतिशय आक्रमक पद्धतीने चालवली जात असल्याने तिने कारचालकाला आपल्या बाईकपासून अंतर ठेवण्यास सांगितले.

हेही वाचा:स्टॉक रजिस्टर प्रकरणाने सावंतवाडी पालिकेत खळबळ; ‘मोठे मासे लपले आहेत’ नगरसेविकांचा आरोप

वादानंतर बाईकला धडक

सियाने दिलेल्या माहितीनुसार, कारमधील तरुणांनी तिला बाईक थांबवण्यास सांगून धमकी दिली. कारमधील तरुण नशेत असल्याचा संशयही तिने व्यक्त केला आहे. परिस्थिती वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर सिया आणि तिच्यासोबत असलेल्या मित्राने कारला पुढे जाण्यापासून रोखण्याचा आणि तिचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान कारचालकाने अचानक बाईकला कट मारला आणि सियाच्या Aprilia RS 457 ला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की सिया रस्त्यावर फेकली गेली, तर तिची बाईक काही मीटरपर्यंत फरफटत गेली. हा संपूर्ण प्रकार तिच्या बाईकवर बसवलेल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला.

अपघातानंतर चालकाचा पळ

अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळी थांबून मदत करण्याऐवजी तेथून पळ काढल्याचा आरोप आहे. सियाच्या एका मित्राने पुढे ट्रॅफिक सिग्नलवर कारचालकाला गाठून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने आपली चूक नाकारली आणि तेथून निघून गेल्याचे सियाने सांगितले. घटनेनंतर सियाने सोशल मीडियावर अपघाताचा व्हिडिओ शेअर केला. तसेच कारचा क्रमांक आणि मालकाचे नावही सार्वजनिक करत गुरुग्राम पोलिसांकडे संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा:Crime News: मोबाइलवरून ओळख; भेटण्यास नकार दिला, रात्री मागच्या दाराने घरात घुसून धक्कादायक कृत्य

सोशल मीडियावर संताप

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. दिल्ली-हरियाणा पोलिसांसह ट्रॅफिक पोलिसांना टॅग करत संबंधित कारचालकाविरुद्ध एफआयआर दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, या घटनेतील आरोपांची अधिकृत पोलिस कारवाई आणि तपासाबाबतची माहिती समोर येणे बाकी आहे.

 

Web Title: Enraged after being told to keep a distance chase argument and sudden collisionshocking incident involving a female biker

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 12:08 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.