Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन वर्षे करत होता पाठलाग, अपहरण अन् अखेर खून… शिक्षिकेची हत्या करणाऱ्या सनकीची संपूर्ण कहाणी

फरिदाबादमधील शिक्षिकेच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी गेली दोन वर्षे शिक्षिकेचा पाठलाग करत होता आणि अखेर पूर्वनियोजित कट रचून शाळेच्या आवारात तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 06, 2026 | 11:15 AM
दोन वर्षे करत होता पाठलाग, अपहरण अन् अखेर खून... शिक्षिकेची हत्या करणाऱ्या सनकीची संपूर्ण कहाणी

दोन वर्षे करत होता पाठलाग, अपहरण अन् अखेर खून... शिक्षिकेची हत्या करणाऱ्या सनकीची संपूर्ण कहाणी

Follow Us
Follow Us:
  • आरोपी दोन वर्षांपासून शिक्षिकेचा सातत्याने पाठलाग करत असल्याची माहिती तपासात समोर आली.
  • पूर्वीही त्रास दिल्याप्रकरणी तक्रार आणि वाद झाल्यानंतरही आरोपीने तिचा छळ सुरूच ठेवला.
  • शाळेत बनावट कारण सांगून प्रवेश घेत आरोपीने शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
फरिबादच्या सिकरोना गावात सरस्वती सीनियर सेकेंडरी स्कूलमध्ये सोमवारी एका नकाबपोशाद्वाने शाळेच्या शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. आरोपीने शिक्षिकेला भेटण्यासाठी वर्गाबाहेर बोलावले आणि असंख्य वेळा चाकूने वार करत दिवसाढवळा शाळेच्या आवारात शिक्षिकेची निघृण हत्या केली. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यातील दृष्ये पाहून सर्वच हादरुन गेले. या घटनेने परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण केले असून शाळेतील सुरक्षेवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. २६ वर्षांय शिक्षिकेचा तडफडत मृत्यू झाला आणि ही हत्या चूक नसून एक पूर्वनियोजित कट होता. हत्येमागचं कारण आणि आरोपी शाळेत घुसला कसा याची संपूर्ण माहिती आता समोर आली आहे. चला सविस्तर जाणून घेऊया.

दिवसाढवळ्या शाळेत शिक्षिकेची हत्या; 20 हून अधिक चाकूने वार अन् नकाबपोशाचा हल्ला CCTV कॅमेरात कैद

दोन वर्षांपासून पाठलाग करत होता…

माहितीनुसार, हत्या करणारा आरोपी जवळपास २ वर्षांपासून महिला शिक्षिकेचा पाठलाग करत होता. अखेर आपल्या प्रयत्नात तो यशस्वी झाला. शिक्षिकेच्या कुटुंबाने सांगितले की, आरोपी साधारण दोन वर्षांपासून संध्याचा पाठलाग करत होता. यावर्षीच्या सुरुवातीलाच त्याने कथितरित्या संध्याचे तिच्या घरातून अपहरण देखील केले होते. यानंतर संध्याच्या पतीसोबत त्यांची हाणामारी झाली आणि कुटुंबाने आरोपीला दूर राहण्याचा इशारा दिला. इतकं करुनही आरोपी अमित संध्याचा पाठलाग सोडत नव्हता. तिने एकदा पोलिस ठाण्यास तक्रार दाखल करण्याचीही धमकी आरोपी अमितला दिली होती.

संध्यासोबत करायचे होते लग्न…

संध्या विवाहित असूनही आरोपी अमित पुन्हा पुन्हा संध्याला फोन करुन तिला त्रास देत असायचा. या सर्वांना कंटाळून संध्याच्या पतीने एक वर्षांआधी तिचा फोन देखील तोडून टाकला. यानंतरही अमित तिचा पाठलाग करु लागला. संध्या आधीपासून विवाहित आहे हे माहिती असूनही अमितला तिच्यासोबत लग्न करायाचे होते ज्यासाठी तो तिला गेल्या दोन वर्षापासून त्रास देत होता.

एकतर्फी प्रेमात झाला सनकी

आरोपी अमिक एकतर्फी प्रेमात इतका बुडाला होता की अखेर संध्याला मारण्याचा त्याने निर्णय घेतला. ती आपली होऊ शकत नाही तर तिला इतर कुणाचीही होऊ देणार नाही या विचाराने तो शाळेत घुसला आणि चाकूच्या धारदार वाराने त्याने शिक्षिकेचा खून केला. मिळालेल्या माहितीनुसार, तोंडावर कापड गुडांळून तो शाळेत घुसला आणि संध्याला भेटण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. आरोपीने संध्याच्या पतीचे नाव (विक्की) सांगत शाळेत प्रवेश घेतला होता. ३ ऑगस्टच्या सकाळी ही घटना घडली. संध्या जशी बाहेर आली तसेच आरोपीने तिला जवळ ओढले आणि हातातील चाकूने तिच्यावर वार करायला सुरुवात केली. आरोपीने २० हून अधिक वेळा शिक्षिकेवर चाकूने वार केले ज्यात ती रक्तबंबाळ होत जमिनीवर पडली. यानंतर आरोपी तिथून चाकूसहित फरार झाला.

UP Crime: अनैतिक संबंधातून थरकाप! प्रियकराने 6 महिन्यांच्या चिमुकल्याचा गळा आवळून खून, मृतदेह फेकला नाल्यात

पोलिसांनी तक्रार दाखल केली

पतीच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी २१ वर्षीय अमितवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. चाैकशीत समोर आले की, संध्या आणि अमित यांची गावातील एका प्रायव्हेट स्कूलमध्ये ओळख झाली. अमितचे तिच्यावर प्रेम जडले पण संध्या त्याच्यापासून दूर राहत होती. अमितच्या त्रासाला कंटाळून तिने पोलिस ठाण्यात यापूर्वी तक्रार देखील दाखल केली होती. तथापि, जाहीररित्या माफी मागितल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य झाले आणि प्रश्न तिथेच सोडवण्यात आला. पुन्हा त्रास देणार नाही असे खोटे आश्वासन देत अमितने त्यावेळी माफी मागितली पण यामुळे त्याच्या मनातील द्वेष आणखी वाढला होता. हाच राग मनात घेऊन तो शाळेत पोहचला आणि चाकूने वार करत त्याने संध्याचा खून केला.

Web Title: Faridabad teacher murder case two years stalking one sided love accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • crime news
  • faridabad
  • Murder Case

संबंधित बातम्या

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
1

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा
2

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले
3

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून
4

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.