Father and sisters beaten up over land dispute, incident in Kendur, case registered Crime News
केंदूर : तालुका शिरुर येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून कुटुंब वाद झाला. या कौटुंबिक वादाचे रुपांतर अगदी हाणामारीपर्यंत गेले. एका सख्ख्या बहिणीसह वडिलांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फक्कड ठकाराम साकोरे, रवींद्र फक्कड सामोरे, राजेंद्र फक्कड साकोरे, सुलोचना फक्कड साकोरे, संभाजी सुदाम साकोरे, ललिता संभाजी साकोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंदूर ता. शिरुर येथे छबुबाई आदक यांच्या वडिलांची वडिलोपार्जित शेतजमीन असून सदर जमिनीचे वाटप झालेले नाही. यामुळे छबुबाई त्याच्या बहिणींसह वडिलांकडे जमिनीच्या वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी गेलेल्या असताना त्यांचा भाऊ फक्कड साकोरे सह त्याच्या मुलाने वाद घालत शिवीगाळ, दमदाटी केली. यामुळे वाद आणखी चिघळला. शिवीगाळ केल्यामुळे सर्वजण पुन्हा घरी गेले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्यांनतर १४ एप्रिल रोजी पुन्हा छबुबाई आदक त्यांच्या बहिणी शकुंतला ननवरे, अंजनाबाई तांबे, भाऊ पांडुरंग साकोरे, मुलगा स्वप्नील आदक हे वडिलांच्या घरी माहेरी जाऊन भाऊ फक्कड याला बोलावून घेत आम्हाला त्या दिवशी शिवीगाळ का केली याबाबत विचारणा केली असता फक्कड साकोरे, भाचा रवींद्र साकोरे, राजेंद्र साकोरे, सुलोचना साकोरे, संभाजी साकोरे, ललिता साकोरे यांनी सर्वांना शिवीगाळ, दमदाटी करत काठीने मारहाण करत जखमी केले, याबाबत छबुबाई साहेबराव आदक वय ५२ वर्षे रा. कान्हुर मेसाई ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी फक्कड ठकाराम साकोरे, रवींद्र फक्कड सामोरे, राजेंद्र फक्कड साकोरे, सुलोचना फक्कड साकोरे, संभाजी सुदाम साकोरे, ललिता संभाजी साकोरे सर्व रा. महादेववाडी केंदूर ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वढू बुद्रुक ता. शिरुर येथील राजाराम गाडेकर हे घरात असताना बराच वेळ घरातून बाहेर न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी घरात पाहणी केली असता राजाराम यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले, यावेळी शेजारील नागरिक व कुटुंबीयांनी त्यांना खाली घेत रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी राजाराम सुदाम गाडेकर वय ६३ वर्षे रा. वढू बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले, याबाबत संजय सुदाम गाडेकर वय ४५ वर्षे रा. वढू बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार नवनाथ नाईकडे हे करत आहे.