Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विरार-बरफ पाड्यात गर्दुल्यांची दहशत, भर रस्त्यात केला कोयत्याने जिवघेणा हल्ला

पालघरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. विरारमधील बरफ पाड्यात एक व्यक्तीवर गर्दुल्यांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 27, 2024 | 03:50 PM
विरार-बरफ पाड्यात गर्दुल्यांची दहशत, भर रस्त्यात केला कोयत्याने जिवघेणा हल्ला
Follow Us
Follow Us:

वसई । रवींद्र माने : पुण्याप्रमाणेच विरारमध्येही गर्दुल्यांची कोयता गॅंग सक्रीय झाली असून, एका नागरिकावर भर रस्त्यात जीवघेणा हल्ला करण्यात आल्यामुळे येथील नागरिक दहशतीखाली वावरत आहेत.

विरारच्या बरफपाड्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतियांची वसाहत उभी राहीली आहे. या बकाल वस्तीत काही गर्दुले आपली दहशत माजवण्यासाठी कंबरेला कोयता लटकवून फिरत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. शुक्रवारी सायंकाळी येथील रहिवाशी प्रवीण ठाकूर घराबाहेर पडले असता, त्यांच्यावर तीन जणांनी हल्ला केला. त्यापैकी एकाने आपल्या जवळील कोयत्याने त्यांच्यावर वार केले. हे वार चुकवण्यासाठी ठाकूर यांनी हात पुढे केल्यामुळे त्यांच्या दोन्ही हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या छातीलाही मुकामार बसला आहे. या हल्ल्यातून सुटका करुन ठाकूर यांनी पोलीस ठाणे गाठल्यावर फिर्याद न घेता त्यांना अगोदर हातावर उपचार करुन येण्यास पोलीसांनी सांगितले.

[read_also content=”शेतकऱ्यांच्या जागेवर बिल्डरची घुसखोरी, शेतकऱ्यांचा आक्रमक आंदोलनाचा इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/kalyan-builders-intrusion-on-farmers-land-warning-of-aggressive-agitation-by-farmers-539065.html”]

त्यामुळे ठाकूर यांनी वसईतील काही हॉस्पिटल पालथी घातल्यानंतर मुबंईतील नायर रुग्णालय गाठले. तिथे उपचार करुन परतल्यावर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रारीसाठी धाव घेतली. तिथेही त्यांना सकाळी 11 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत बसवून ठेवण्यात आले. लक्ष्मण जाधव, आशिष जाधव आणि दीपक जाधव या तिघांनी हा हल्ला केल्याची तक्रार ठाकूर यांनी केली असून, त्यानुसार अखेर 324, 504, 506, 34 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांना मात्र अटक करण्यात आली नसल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

या हल्ल्यामुळे बरफपाड्यात गर्दुल्यांची दहशत पसरली असून, कोयता घेऊन फिरणाऱ्यांपासून आपल्या मुलींचे, मुलांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना घरी सुखरुप आणण्यासाठी पालक रात्री-बेरात्री नाक्यावर जाऊन उभे रहात आहेत. आता तरी पोलीसांनी दखल घेऊन या दहशतीतून आमची सुटका करावी अशी मागणी येथील महिलांनी केली आहे.

Web Title: Fear of crowds in virar barf pada fatal attack by coyotes on the road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2024 | 03:50 PM

Topics:  

  • palghar
  • Virar Crime case

संबंधित बातम्या

Suicide Case News: विरारमध्ये सुन्न करणारी घटना! बंद फ्लॅटमधून दुर्गंधी आली अन् उघड झाला ३ भाऊ-बहिणींच्या मृत्यूचा थरार
1

Suicide Case News: विरारमध्ये सुन्न करणारी घटना! बंद फ्लॅटमधून दुर्गंधी आली अन् उघड झाला ३ भाऊ-बहिणींच्या मृत्यूचा थरार

Palghar Pesa Reservation : पेसा आरक्षणाविरोधात कंत्राटी शिक्षकांचे आमरण उपोषण! आंदोलक महिलांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
2

Palghar Pesa Reservation : पेसा आरक्षणाविरोधात कंत्राटी शिक्षकांचे आमरण उपोषण! आंदोलक महिलांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

Palghar Protest : गोळ्या घातल्या तरी जमिनी देणार नाही! प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा उद्रेक; उद्योगमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
3

Palghar Protest : गोळ्या घातल्या तरी जमिनी देणार नाही! प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा उद्रेक; उद्योगमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.