Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar Pesa Reservation : पेसा आरक्षणाविरोधात कंत्राटी शिक्षकांचे आमरण उपोषण! आंदोलक महिलांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

Palghar Pesa Reservation : पालघरमधील PESA क्षेत्रातील आरक्षणावरून बिगर आदिवासी घटकातील कंत्राटी शिक्षकांचा लढा अधिक तीव्र झाला आहे. खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या निवासस्थासमोर ६६ दिवसांपासून धरणे आंदोलन केल्यानंतर आता कंत्राटी शिक्षकांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 28, 2026 | 11:38 AM
पेसा आरक्षणाविरोधात कंत्राटी शिक्षकांचे आमरण उपोषण! ( सौजन्य - Chatgpt )

पेसा आरक्षणाविरोधात कंत्राटी शिक्षकांचे आमरण उपोषण! ( सौजन्य - Chatgpt )

Follow Us
Follow Us:
  • पेसा आरक्षणाविरोधात कंत्राटी शिक्षकांचे आमरण उपोषण!
  • आंदोलक महिलांची प्रकृती खालावली
  • रुग्णालयात दाखल
Palghar Pesa Reservation : सन २०१४ पासून पालघरसहित महाराष्ट्रातील पेसा जिल्ह्यांतील आरक्षणाचा प्रश्न तयार झालेला आहे. यामध्ये ओबीसी, एस्सी, एनटी, व्हिजेएनटी, एसबीसी व इतर सर्व बिगर आदिवासी समाजाचे क व ड श्रेणीतील १७ संवर्गातील नोकरीतील संविधानिक आरक्षण शून्य झाले आहे. या अन्यायाविरोधात आतापर्यंत अनेक आंदोलने पालघर जिल्ह्यात झाली आहेत व सुरु आहेत. परंतु अजूनही ओबीसी, एस्सी, एनटी, व्हीजेएनटी, एसबीसी व इतर सर्व बिगर आदिवासी समाजाला न्याय मिळालेला नाही. ( Palghar Pesa Reservation ) 

Palghar Protest : गोळ्या घातल्या तरी जमिनी देणार नाही! प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा उद्रेक; उद्योगमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

लोकप्रतिनिधी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून (दि. २६) कंत्राटी शिक्षकांनी बेमुदत आमरण उपोषण आंदोलन सुरू केले असून रात्री यातील दोन आंदोलन कत्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सध्या शिक्षक भरती मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. पालघर या पेसा जिल्ह्यातही ती सुरु आहे.

पात्र असून झाले बाधित

नोकरीसाठी पात्र असलेल्या मात्र पेसा आरक्षणाने बाधित झालेल्या ओबीसी, एस्सी, एनटी, व्हीजेएनटी, एसबीसी व इतर सर्व बिगर आदिवासी प्रवर्गातील पालघर जिल्ह्यातील मानधन तत्वावरील कंत्राटी शिक्षकांचे नोकरीत कायम समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या निवासस्थासमोर दि. २१ ऑगस्ट पासून आंदोलन सुरु आहे. पैसा जिल्ह्यातील आरक्षणाने बाधित झालेल्या १७संवगपिकी शिक्षक हा संवर्गही बाधित आहे.

९० कंत्राटी शिक्षक सहभागी
६६ दिवस आंदोलन सुरू
१७संवर्गातील आरक्षण शून्य

खासदारांच्या निवासस्थासमोर धरणे

शासन स्तरावर फक्त चर्चा आणि आश्वासनापलिकडे कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने बिगर आदिवासी मानधन तत्वावरील स्थानिक कंत्राटी शिक्षकांनी धरणे आंदोलनातून न्याय मिळाला नाही. खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या निवासस्थासमोर ६६ दिवस धरणे धरुनही न्याय मिळत नसल्याने आंदोलन कर्त्यांनी सोमवारपासून (दि. २६) बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

एक महिला रुग्णालयात, एक महिला उपोषणस्थळी

आंदोलनात ९० कंत्राटी शिक्षक सहभागी झाले आहेत. यातील सुवर्णा साळुंखे व मनस्वी पाटील या दोन आदोलनकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्याना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील मनस्वी यांच्यावर उपचार करून पुन्हा त्या उपोषण स्थळी दाखल झाल्या. तर सुवर्णा यांच्यावर गंधे रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Vasai Virar Water Cut Crisis : वसई-विरारवर 10% पाणीकपातीचे सावट! 8 दिवसांत अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश

💡

Frequently Asked Questions

  • Que: पालघरमध्ये कंत्राटी शिक्षकांचे उपोषण कशासाठी सुरू आहे?

    Ans: पेसा क्षेत्रातील आरक्षणांमुळे ओबीसी, एस्सी, एनटी, व्हीजेएनटी आणि एसबीसी या १७ संवर्गातील नोकरीतील संविधानात्मक आरक्षण शून्य झाल्यामुळे, मानधन तत्त्वावरील कंत्राटी शिक्षकांना नोकरीत कायम सामावून घेण्यासाठी हे उपोषण सुरू आहे.

  • Que: आंदोलन कोणाच्या निवासस्थानासमोर सुरू आहे?

    Ans: आंदोलन खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या निवासस्थानासमोर सुरू असून, कंत्राटी शिक्षकांनी धरणे आंदोलनानंतर आता आमरण उपोषण सुरू केले आहे.

  • Que: उपोषणात किती कंत्राटी शिक्षक सहभागी झाले आहेत?

    Ans: बेमुदत उपोषण आंदोलनात सुमारे ९० कंत्राटी शिक्षक सहभागी झाले असून, त्यातील दोन महिला आंदोलकांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

Web Title: Palghar pesa reservation contract teachers hunger strike health deteriorates ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • hunger strike
  • palghar
  • reservation

संबंधित बातम्या

Palghar Protest : गोळ्या घातल्या तरी जमिनी देणार नाही! प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा उद्रेक; उद्योगमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
1

Palghar Protest : गोळ्या घातल्या तरी जमिनी देणार नाही! प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा उद्रेक; उद्योगमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.