पत्नीची आत्महत्या, पतीवर गुन्हा दाखल
नांदेड : नांदेड शहरातील प्रसिद्ध गुरुद्वारा परिसर सोमवारी गोळीबारीच्या घटनेने हादरला. पूर्ववैमनस्यातून घडलेल्या या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.
हेदेखील वाचा : Rushiraj Sawant Update: 68 लाखांचं बील अन् बाबा रागावतील म्हणून…; ऋषिराजसोबत त्या दिवशी नेमकं काय घडलं?
शहरातील गुरुद्वारा गेट क्र. ६ भागात गुरमितसिंग राजसिंग सेवादार (वय ३५) व त्याचा मित्र रवींद्रसिंह दयालसिंह राठोड हे दोघेजण घराबाहेर थांबले होते. सोमवारी सकाळी ९ ते १० वाजताच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात दोघेही गंभीर जखमी झाले. या गोळीबारात गुरमितसिंघ सेवादार यास आठ गोळ्या लागल्या तर रवींद्र राठोड यास दोन गोळ्या लागल्या. गुरमितसिंग राजसिंग सेवादार याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, तो नुकताच पॅरोलवर सुटला आहे.
गेट क्र. ६ परिसरात वाहन पार्किंगमध्ये थांबलेल्या एका चारचाकी वाहनाच्या काचातूनही एक गोळी आरपार झाली. पोलिसांना येथे रिकामे शेल सापडले आहेत. दोन्ही जखमींना विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले आहे.
पुण्यातही गोळीबाराची घटना
चाकणजवळील महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्टील कंपनीच्या मालकावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. ही घटना सोमवारी (दि.२०) सकाळी घडली. आरोपी हेल्मेट घालून दुचाकीवरून आले होते. अचानक स्टील कंपनीच्या मालकासमोर येत फायरिंग केली. त्यानंतर आरोपींनी वराळे ते भांबोली या दिशेने पलायन केले आहे. उद्योजकांवर झालेल्या गोळीबाराची दखल वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घेतली असून त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
हेदेखील वाचा : Sindhudurg News: “कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा…’; शिवरायांच्या पुतळा उभारणीच्या कामाबाबत काय म्हणाले नितेश राणे ?